डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी
नाशिक, पंचवटी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांच्या उदय कॉलनी, पंचवटी येथील कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर ॲड. सुरेश आव्हाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांचे आयुष्य समर्पित होते."
त्यांनी पुढे सांगितले की, "बाबासाहेबांनी आपल्या संघर्षमय जीवनात अनेक सामाजिक विकृतींवर प्रहार करत, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. त्यांनी समाजातील छुआछूत, वर्णभेद दूर करत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य केले. कायद्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले. त्यामुळे आजच्या पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून त्यांच्या मार्गाने चालले पाहिजे, हेच त्यांच्या जयंतीचे खरे स्मरण आहे."
या कार्यक्रमात कविता आव्हाड, ॲड. रामचंद्र आहेर, बाळासाहेब मोरे, वसंत ढाकणे, रमेश कुमावत, मनोहर खेडकर, दत्तात्रेय भडांगे, ज्ञानेश्वर गवळी, देवराम बोडके, साहिल खेडकर, श्रीधर खेडकर, अविनाश पानसरे, गौरी लिंगायत, मंगेश सोनार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रोजच्या अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा:
Join WhatsApp Group