RIP काय असते...??
काही विचार न करता आपण ठोकून देत असतो...टाकलेल्या पोस्टचा नेमका अर्थ काय हे जाणून घ्यायला नको का..? सगळे टाकतात म्हणून आपणही टाकतो म्हणजे आपल्या डोक्याचे 'मंगल कार्यालय' झाले आहे असे समजायला हरकत नाही...!!
रेस्ट इन पीस ही संकल्पना आपली नाही...आत्म्याला शांती लाभो म्हणजे तो अशांत आहे याची कबुली नव्हे का..?? ख्रिश्चनांकडे 'डूम्स डे' आणि मुस्लिमांमध्ये 'कयामत का दिन' ही संकल्पना आहे...त्या दिवशी म्हणे त्यांचा देव, थडग्यात पडून राहिलेल्या सर्वांची त्यांच्या पाप-पुण्यहिशोबानुसार वासलात लावतो...त्यामुळे तो दिवस उगवेपर्यंत ते मुडदे व त्यांचे आत्मे अशांत असतात...ते शांत व्हावेत म्हणून RIP अर्थात रेस्ट इन पीस म्हणण्यात येऊ लागले...
आपल्याकडे इतकी खुळी कल्पना नाही...त्यामुळे गतात्म्यास सद्गती म्हणजे उत्तम गती लाभो असेच म्हणायला हवे...तीनच अक्षरे टाईप करता येतात म्हणून आपण अधिक टाईप करण्याचा आळस करत असू तर ते अक्षम्य आहे...त्यापेक्षा काही लिहूच नये...आपल्या भावना नीट व्यक्त व्हायला नकोत का..?? कोणाला श्रद्धांजली वाहायची असली तरी सभेत लोक २ मिनिटे नुसते शांत उभे का राहतात...? कारण रेस्ट इन पीस अशी प्रार्थना करायची असते अशी पाश्चिमात्य कल्पना आहे म्हणून...आपल्याकडे असे काही नाही का याचा आम्ही शोधच घेत नाही...आपण 'असतो मा सद्गमय,तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, ओम शांती: शांती: शांती:' या शान्तिमंत्राचा पाठ तर करू शकतो...सभेत उभे राहिलेल्यांना हात जोडायला सांगून आपल्यामागे हा मंत्र मोठ्यांदा म्हणायला सांगा...
फक्त एकदाच हं...नाहीतर कोणी १०८ वेळा म्हणायचे..!!