मोक्षदा एकादशी विशेष :
रंगे विठूचा सोहळा
स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे
पंढरपूरातला विठ्ठल मायबाप सावळा ,
गळ्यात त्याच्या तुळशीच्या माळा,
कसं सांगू रे मी तूला
रंगे विठूचा सोहळा....
भरते विठ्ठल नामाची शाळा,
जीव आहे त्यात माझा सगळा,
मला छंद तुझा रे लागला,
रंगे विठूचा सोहळा...
भक्तांच्या हातात टाळ तर गळ्यात माळा,
देव तू आमचा विठू सावळा,
प्रसिद्ध देव तू माझ्या दडलेला,
रंगे विठूचा सोहळा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा