Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेला नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

जय महाराष्ट्र!

शिवसेना सदस्य नोंदणीसाठी खास लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:
https://shivsenaconnects.in/rrc?GP2P0

शिवसेनेच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करणे, युवकांना कार्यक्षमतेने जोडणे, आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. या नोंदणी मोहिमेमुळे पक्षाची गढी अधिक भक्कम होईल, असा विश्वास प्रविण (बंटी) तिदमे, शिवसेना महानगर प्रमुख यांनी व्यक्त केला.

तसेच, शहरातील शिवसैनिक, पदाधिकारी, अंगीकृत संघटना व कार्यकर्ते यांनी घराघरात जाऊन जनतेला या उपक्रमाची माहिती द्यावी व सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचावे, असेही त्यांनी सुचवले.

नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी शिवसेनेचे बूथ, स्टॉल्स लावण्यात येत असून तिथे प्रत्यक्ष सदस्य नोंदणीसाठी सुविधा दिली जात आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या नागरिकांचीही उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचा हा उपक्रम नाशिकमध्ये यशस्वी होत असून लवकरच लाखो सदस्य नोंदणीकृत होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही सदस्य नोंदणी मोहीम शिवसेना पक्षाच्या भविष्यकालीन उभारणीसाठी एक मजबूत पाया ठरेल.


शिवसेना सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा:

WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राज्यभरात भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे थैमान ! Special Report डिजिटल इंडिया च्या उपक्रमा...