Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

१३०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया निविदेचा अहवाल

१३०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया निविदेचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश

10 एप्रिल 2025 | नाशिक

नगरविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी १३०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना या प्रक्रियेची सखोल तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे या निविदा प्रक्रियेविषयी तक्रार केली होती.

त्यांच्या म्हणण्यानुसार, निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आलेली नाही व विशिष्ट ठेकेदाराला लाभ मिळावा यासाठी इतर ठेकेदारांना समान संधी नाकारण्यात आली आहे.

परवानग्या आणि निधीची शंका

प्रविण तिदमे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ही निविदा प्रक्रिया सुरू करण्याआधी राज्य व केंद्र सरकार, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची परवानगी घेण्यात आली का?

जर या आवश्यक परवानग्या न घेताच प्रक्रिया राबवली गेली असेल, तर केंद्र सरकारकडून निधी बंद होण्याचा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

नवीन अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धान्य वितरणातील अनागोंदी विरोधात निवेदन धान्य वितरणातील अनागोंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंद...