शासनाचे पॅट वार्षिक पेपर २०२५ फुटले?
शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न!
जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा पेपर फुटीच्या प्रकारामुळे धक्क्यात आले आहे. शासनाच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या पीरियॉडिक अस्सेसमेंट टेस्ट (PAT) २०२५ या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर लीक झाल्याचे समोर आले आहे.
प्रश्नपत्रिका लीक होण्यामागे काही यूट्यूब चॅनेल्स आणि स्थानिक व्हाट्सअप ग्रुप्सचा मोठा हात आहे. अनेक शाळांचे व्हाट्सअप ग्रुप्स हे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात माध्यम ठरत आहेत. त्यामुळे या पेपर लीक घटना केवळ एका शाळेपुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर झपाट्याने पसरत आहेत.
या प्रकारावर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ने तातडीने कारवाई करत यूट्यूब चॅनेल्सवर गुन्हे दाखल केले आहेत. SCERT चे संचालक राहुल रेखावर यांनी स्पष्ट केलं की, परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसारच होईल आणि प्रश्नपत्रिकांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत राहील आणि शिक्षण व्यवस्था अधिकच अस्थिर होईल.
संपादित आणि प्रकाशित: जीवन केशरी मराठी | संकेतस्थळासाठी विशेष बातमी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा