जीवन केशरी मराठी
माहिती संकेतस्थळ, नाशिक
माहिती संकेतस्थळ, नाशिक
© २०२५ जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ | सर्व हक्क राखीव
महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत गेल्या काही वर्षांत एक नव्या प्रकारचा मॉडेल वेगाने वाढत आहे — टाय-अप पद्धत, म्हणजेच मान्यताप्राप्त महाविद्यालय आणि खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) यांच्यातील अनधिकृत करार. विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष न जाता, फक्त खासगी क्लासेसमध्ये शिकतात आणि त्यांची उपस्थिती महाविद्यालयात दाखवली जाते. ही पद्धत शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण वाढवत असून, पारंपरिक महाविद्यालयांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहे.
खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) आणि मान्यताप्राप्त महाविद्यालय यांच्यात जो अनधिकृत करार होतो, त्याला टाय-अप असे म्हणतात. विद्यार्थ्यांचे नाव महाविद्यालयाच्या नोंदणीत दाखल असते, पण प्रत्यक्ष शिकवणी फक्त क्लासेसकडून दिली जाते. महाविद्यालय विद्यार्थी वर्गात हजर नसतानाही उपस्थिती दाखवते आणि फक्त परीक्षा वेळीच ते महाविद्यालयात येतात.
महाविद्यालय व क्लासेस यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेश व उपस्थितीबाबत गुप्त/अनधिकृत करार होतो.
विद्यार्थी अधिकृतपणे महाविद्यालयात प्रवेश घेतात, पण प्रत्यक्ष शिक्षण क्लासेसकडून होते.
महाविद्यालय विद्यार्थी हजेरी नसतानाही उपस्थिती दाखवते.
CET, NEET, JEE, CA-CPT तसेच बोर्ड अभ्यासक्रमाची तयारी एकाच ठिकाणी केली जाते.
शासकीय किंवा विद्यापीठाच्या परीक्षांना विद्यार्थी जणू ते महाविद्यालयात शिकले होते अशा नोंदीवर हजर होतात.
विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी १.५ ते २ लाख रुपयांपर्यंत घेतली जाते, ज्यात महाविद्यालय व क्लासेस यांच्यातील आर्थिक वाटप ठरलेले असते.
शासकीय परीक्षांसाठी (JEE, NEET, ११वी, १२वी बोर्ड इ.) मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रत्यक्ष हजेरी व प्रवेश असणे बंधनकारक आहे. टाय-अप पद्धतीत हे नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पात्रतेवर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
सध्या अनेक पारंपरिक महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीने त्रस्त आहेत —
हे सर्व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनातील दुर्लक्ष आणि स्पर्धात्मक तयारीतील अपयशामुळे घडत आहे.
यंदा प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे पारंपरिक महाविद्यालयांचा अभ्यास उशिरा सुरू झाला, तर टाय-अप क्लासेसने वेळेत सुरुवात केली.
स्मार्ट बोर्ड, डिजिटल क्लासरूम, ऑनलाइन टेस्ट सिरीज, वैयक्तिक मार्गदर्शन.
CET, NEET, JEE इ. परीक्षांची एकात्मिक तयारी.
क्लासेसमध्ये पालकांना हवे तसे नियम व अभ्यासावर लक्ष.
नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनी टाय-अप पद्धतीला विरोध दर्शविला आहे. जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह म्हणतो —
"शिक्षणामध्ये जर गुणवत्तेपेक्षा पैशाला प्राधान्य असेल तर अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास कमी होत चालला आहे. शिक्षण बाजारपेठ बनले आहे, महसूलवाढीचे साधन झाले आहे."
अदित्य रिकामे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणतात —
"टाय-अप म्हणजेच शिक्षणाचे साटेलोटे. हा अवैध आणि बेकायदेशीर प्रकार आहे. खासगी क्लासेस मोठ्या प्रमाणात फी वसूल करत आहेत, जी सामान्य नागरिकांना परवडत नाही. राज्य सरकारने लवकरात लवकर यावर कायदा अमलात आणावा."
टाय-अप पद्धती वाढण्यामागील एक मोठा घटक म्हणजे पारंपरिक महाविद्यालयांची स्वतःची निष्क्रियता. वर्गखोल्यांमध्ये डिजिटल साधनांचा अभाव, शिक्षकांचा कठोर किंवा उदासीन स्वभाव, करिअर मार्गदर्शनाचा अभाव, आणि मूलभूत सुविधा न मिळणे — यामुळे विद्यार्थी खासगी संस्थांकडे वळतात. कोविड-१९ नंतर आरोग्य आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढल्याने पालक अधिक सजग झाले आहेत. नाशिक शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये शिस्त नावाचा प्रकार उरलेला नाही. महाविद्यालयांमध्ये प्रेमी युगुलांचा उदय होतो , विद्यार्थी गुन्हेगारांसारखे वागतात, वाईट संगतीने अंमली पदार्थांचे विद्यार्थ्यांना व्यसन लागणे , महाविद्यालयात उपहारगृह असल्याने तासिकांवेळी उपहारगृहांमध्ये वेळ वाया घालवणे आदी प्रकार अनेक महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे सुरू आहेत.
टाय-अप पद्धत ही महाविद्यालयांच्या दुर्लक्ष, गुणवत्तेचा अभाव आणि शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरण यांचे थेट उत्पादन आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी व शिक्षणातील पारदर्शकता टिकवण्यासाठी, शिक्षण विभागाने कठोर अंमलबजावणी करणे आणि महाविद्यालयांनी आधुनिक सुविधा व गुणवत्तापूर्ण अध्यापन देणे अपरिहार्य आहे. शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून समाजघडणीचे साधन आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
मराठी माहिती संकेतस्थळ, नाशिक
📍 नाशिक प्रतिनिधी
शिक्षण तज्ज्ञांच्या मते, टाय-अप पद्धतीला विरोध करून व्यावहारिक उपयोग नाही कारण ही विद्यार्थ्यांची वैयक्तिक निवड आहे. भारत हा लोकशाही देश असल्याने प्रत्येक नागरिकाला आपल्या शिक्षणाच्या पद्धतीची निवड करण्याचे मूलभूत स्वातंत्र्य आहे.
🚨 महत्त्वाचे: अनेक प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे प्रवेश ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घटले आहेत!
या अभिनव पद्धतीत, एक खासगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लास) एखाद्या मान्यताप्राप्त महाविद्यालयाशी औपचारिक करार करतो. विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयाच्या परिसरात न जाता फक्त खासगी क्लासेसला नियमित उपस्थित राहतात, आणि या क्लासेसची उपस्थिती महाविद्यालयीन उपस्थिती म्हणून मान्य केली जाते.
सर्वेक्षणानुसार, महाविद्यालयांमध्ये मुख्यतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बहुतांश शहरी आणि मध्यमवर्गीय विद्यार्थी दहावी नंतरच खासगी कोचिंग क्लासेसचे फाउंडेशन कोर्स मोफत सुरू करतात.
विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना टाय-अप पद्धतीतून बोर्ड अभ्यासासोबत CET, NEET, JEE, CA-CPT, CLAT सारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची एकात्मिक तयारी एकाच ठिकाणी मिळते.
✨ खासगी संस्थांमध्ये अध्ययन साहित्य, मॉक टेस्ट, व्यक्तिगत मार्गदर्शन, करिअर काउन्सलिंग यांची व्यवस्था उत्तम प्रकारे केली जाते.
पारंपरिक महाविद्यालयांतील जुन्या पद्धतीच्या आणि रुक्ष स्वभावाच्या शिक्षकांपेक्षा, खासगी कोचिंग क्लासेसमधील तरुण, प्रेरणादायी आणि मैत्रीपूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांना जास्त भावतात.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी योग्य शिस्तीत असतात, मग महाविद्यालयांमध्ये शिस्त का नसावी, असा प्रश्न पालक विचारत आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये कॅन्टीन असून, तेथे विद्यार्थी अभ्यासाचा मौल्यवान वेळ वाया घालवतात.
राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मूलभूत स्वच्छतेचा गंभीर अभाव आहे. शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये, आरोग्यदायी वातावरण, हवेशीर वर्गखोल्या यांचा अभाव असल्याने जबाबदार पालक विद्यार्थ्यांना अशा अस्वच्छ ठिकाणी पाठवायला तयार नाहीत.
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाने अनेकदा स्पष्ट केले आहे की, टाय-अप करार विद्यमान शिक्षण कायद्यानुसार अनधिकृत आहेत.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ आणि UGC (University Grants Commission) नियमावली नुसार, मान्यताप्राप्त महाविद्यालयांना खासगी संस्थांशी अनधिकृत करार करण्याच्या स्पष्ट मर्यादा आहेत.
ताज्या बातम्या, शैक्षणिक माहिती आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा!
📱 WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा !जीवन केशरी - मराठी माहिती संकेतस्थळ, नाशिक
सूत्र: जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक
शिक्षण क्षेत्रातील असमानता आणि त्याचे दूरगामी परिणाम
विकसित महाराष्ट्राची स्वप्नं रंगवताना आपण आर्थिक, औद्योगिक, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा गौरव करतो. मात्र, त्याच वेळी एक गंभीर प्रश्न उठतो – "शिक्षण या मूलभूत गरजेकडे आपण कितपत गांभीर्याने पाहतो आहोत?" शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वोच्च साधन असूनही, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आजही शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत.
पण आज शिक्षण हे केवळ निवडक घटकांपुरतेच मर्यादित राहिल्याचं वास्तव डोळ्यांसमोर आहे. राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असून, येत्या काळात या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या पंधरा वर्षांच्या कालावधीत अनेक शिक्षणमंत्र्यांनी कार्यभार सांभाळला, परंतु शिक्षण क्षेत्रातील मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यात मर्यादित यश मिळाले आहे.
२०१० पासून लागू झालेला RTE कायदा (Right To Education Act 2009) फक्त इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची हमी देतो. नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी कोणताही समर्पित कायदा अस्तित्वात नाही.
या टप्प्यावर, विद्यार्थी करिअर निर्णय घेतात. पण पाठ्यपुस्तक, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया – सगळीकडे आर्थिक व सामाजिक अडथळे उभे राहतात. शिक्षण हा हक्क असूनही तो वास्तवात केवळ सवलत वाटते.
२०१०–२०२४ या काळात महाराष्ट्राने आर्थिक, औद्योगिक, आरोग्य व डिजिटल क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. पण शिक्षण क्षेत्रात काय?
दूर गावात शिक्षकच नाहीत, प्रयोगशाळा नाही, संगणक नाहीत. काही विद्यार्थ्यांना अजूनही शाळा गाठण्यासाठी ५–१० किमी पायपीट करावी लागते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तक नसल्यामुळे शाळा सोडल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधांचा अभाव हा एक गंभीर प्रश्न आहे. अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधा जसे की शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, विजेची व्यवस्था यांचाही अभाव आहे.
गरीब OPEN/OBC विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, कारण ते 'अनुसूचित' नाहीत. EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी, अपारदर्शकता आहे. अनेक SC/ST विद्यार्थ्यांना सर्व सवलती सहज मिळतात, पण गरजू OPEN विद्यार्थ्यांना नाहीत.
शिक्षण हे दया नाही, तर प्रत्येक नागरिकाचा संवैधानिक हक्क आहे. मुलगा असो वा मुलगी, SC-ST असो वा OPEN – प्रत्येकाला दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे.
जर आपण "विकसित महाराष्ट्र" घडवायचा असेल, तर शिक्षण क्षेत्रातील असमानता, अनुदानातील भ्रष्टाचार, आणि खासगीकरणाची प्रवृत्ती मोडून काढावी लागेल.
मराठी माहिती संकेतस्थळ नाशिक
या निवेदनात, विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर, तसेच त्यांचे समर्थक ऋषिकेश टकले व त्यांच्या साथीदारांवर संघटित कट रचून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या कॉलरला पकडून त्यांना धक्काबुक्की करताना, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही धावून जाण्याचे कृत्य झाले, जे अत्यंत निंदनीय असून, सामान्य नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भावना दुखावणारे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ऋषिकेश टकले हे MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत कारवाई झालेले व्यक्ती असून, अशा व्यक्तींसोबत विधीमंडळ सदस्याचा संबंध असणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करून, संबंधितांनी संगनमत करून कुठला कट रचला आहे का?, याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अमर कोळी नामक व्यक्तीने आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय दंड विधानाच्या कलम 506 (जीवे मारण्याची धमकी), कलम 323 (हानी पोहचवणे), आणि संगनमताबाबत कलम 120(B) अंतर्गत तसेच महाराष्ट्र MPDA कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश रामभाऊ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी ॲड. जी. पी. वंजारि, ॲड. शाम तावरे, संदीप दांडगव्हण, राजेंद्र शेळके, देविदास मंडलिक, राजाराम फड, गणेश कदम, अविनाश गायकवाड तसेच पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्यांसाठी जीवन केशरी वर भेट द्या
© जीवन केशरी - मराठी माहिती संकेतस्थळ नाशिक
के.टी.एच.एम. महाविद्यालय बायोब्रेन व केमियाड स्पर्धा - नाशिक के.टी.एच.ए...