जीवन केशरी
मराठी माहिती संकेतस्थळ नाशिक
विधान भवनातील मारहाण प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवेदन
● विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर आणि त्यांचे समर्थक ऋषिकेश टकले व साथीदारांवर संघटित कट रचून मारहाण केल्याचा आरोप
● आमदार नितीन देशमुख यांच्या कॉलरला पकडून धक्काबुक्की
● आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर धावून जाण्याचे कृत्य
● अमर कोळी नामक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली
या निवेदनात, विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर, तसेच त्यांचे समर्थक ऋषिकेश टकले व त्यांच्या साथीदारांवर संघटित कट रचून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या कॉलरला पकडून त्यांना धक्काबुक्की करताना, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही धावून जाण्याचे कृत्य झाले, जे अत्यंत निंदनीय असून, सामान्य नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भावना दुखावणारे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ऋषिकेश टकले हे MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत कारवाई झालेले व्यक्ती असून, अशा व्यक्तींसोबत विधीमंडळ सदस्याचा संबंध असणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करून, संबंधितांनी संगनमत करून कुठला कट रचला आहे का?, याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
● भारतीय दंड विधानाच्या कलम 506 (जीवे मारण्याची धमकी)
● कलम 323 (हानी पोहोचवणे)
● संगनमताबाबत कलम 120(B)
● MPDA कायद्यानुसार कारवाई
अमर कोळी नामक व्यक्तीने आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय दंड विधानाच्या कलम 506 (जीवे मारण्याची धमकी), कलम 323 (हानी पोहचवणे), आणि संगनमताबाबत कलम 120(B) अंतर्गत तसेच महाराष्ट्र MPDA कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश रामभाऊ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी ॲड. जी. पी. वंजारि, ॲड. शाम तावरे, संदीप दांडगव्हण, राजेंद्र शेळके, देविदास मंडलिक, राजाराम फड, गणेश कदम, अविनाश गायकवाड तसेच पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा