Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, १९ मे, २०२४

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी लेख!

 शिक्षणाचे महत्त्व : राष्ट्रहिताचे सुवर्ण स्वप्न !

Image By :- Prasad Bhalekar, Ai Art . 


“शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे . जो ते प्राशन करेल तो दहाडल्या शिवाय राहणार नाही ! ” हे उद्गार शिक्षणाचे अमृत प्राशन केलेले महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे आहे. आणि ते उद्गार अगदी सोन्यासम खरे आहे. “ शिक्षण ” ही एक अशी गोष्ट आहे जी अशक्यास शक्य करण्याची ताकद ठेवते . रंकाला राजा करण्याची शक्ती ह्या शिक्षणात आहे. शिक्षण हे एका अमृताहूनही श्रेष्ठ आहे. कारण , ज्याने योग्य शिक्षण घेतले त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. परंतु ह्या अमृताचे प्राशन करण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची क्षमता क्षणिक लोकांकडेच असते. आणि ज्या व्यक्तीला हे शिक्षणाचा लाभ घेता आला त्याचे जीवन सार्थक झालेच म्हणून समजा...! . आयुष्यात कोणतीही गोष्ट असो तिला प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे जिद्द असायला हवी आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची ताकद आणि तयारी असणे गरजेचे आहे तरच ती गोष्ट आपल्या पदरात पडते. ह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सर्वोत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांची शिक्षण घेण्याबद्दलची जिद्द , चिकाटी फार अतुलनीय आणि सर्वश्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे २८ पदव्या आहेत. त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे आज भारत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात त्यांच्या कर्तृत्वाची गाथा गायली जाते . असे अनेक धुरंधर आहे आपल्या भारत देशाचे ११ वे महान राष्ट्रपती , वैज्ञानिक मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सर. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी अपार कष्ट केले आहे. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी सायकल वरून जाऊन घरोघरी सकाळी सकाळी पेपर पोहचवत नंतर ते आपल्या शाळेत शिकण्यासाठी जात‌ . कलाम सर हे रामेश्वरम येथे राहत असत आणि त्यांचे विद्यालय रामनाथपुरम येथे होते. श्र्वार्ट्झ हायस्कूलमध्ये ते शिक्षण घेत होते. त्यांच्या घरापासून ते शाळेपर्यंतचे अंतर हे १५ किलोमीटर अंतर होते. त्यामुळे ह्या सर्व लोकांना शिक्षणाची किंमत आहे. कारण , त्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन यशाची गळाभेट घेतली आहे. 

  एकदा डॉ. ए.पी.जे . अब्दुल कलाम सर ह्यांची आणि युवा उद्योजक श्री. श्रीकांत बोला ह्यांची पहिल्यांदा जेव्हा विद्यालयात भेट झाली तेव्हा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा प्रश्न विचारला की “तुमचे सर्वोच्च स्वप्न काय आहे” तेव्हा श्रीकांत बोला हयाने उत्तर दिले की मी एका मोठा उद्योजक होणार आहे आणि अंध व्यक्तींसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. श्रीकांत हे एक अंध व्यक्ती आहे त्यांना शिकण्यासाठी अनेक कष्टांचा सामना करावा लागला. कॉलेजने त्यांना सायन्स विषय देण्यासाठी मनाई केली होती ह्यावेळी त्यांनी न्यायासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती व त्याने न्यायालयात अंध विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी केलेल्या व्यक्तव्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना तेथे सायन्स ला प्रवेश मिळाला. यामुळे त्यांना सुध्दा शिक्षणाची जाणीव आहे. तेही अंध होते पण त्यांनी हार न मानता शिक्षणासाठी झटले आणि ह्यामागे त्यांच्या शिक्षिका देविका भुयान  ह्यांनी त्यांना साथ दिली . ह्यानंतर त्यांनी अंध व्यक्तींसाठी एक उद्योग निर्माण करण्याचे ठरविले ह्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम सर ह्यांची व त्यांचे मित्र ह्यांची त्यांना मदत झाली. शिक्षण ही गोष्टच निराळी आहे ज्याला मिळाली तो व्यक्ती पावन होतोच पण ते शिक्षण घेण्यासाठी जिद्द आणि काहीतरी करुन दाखविण्यासाठी आपल्याला प्रेरणास्त्रोत असणे गरजेचे आहे. हे सर्व व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, श्रीकांत बोला आणि इतर अनेक ज्ञात - अज्ञात व्यक्ती ह्यांच्याकडे जिद्द होती आणि त्या जिद्दीमुळेच त्यांचे नाव आज विश्वात अभिमानाने झळकत आहेत. नुकताच १० मे २०२४ रोजी श्रीकांत बोला ह्यांच्या संघर्षमयी जीवनावर चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला असून तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. 


  यांशिवाय क्रांतिसुर्य महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले ह्या सर्व महान व्यक्तींचे शिक्षण दानासाठी अनमोल योगदान आहे. शाहू महाराज ह्यांनी सुध्दा कोल्हापुरात अनेक शाळां सुरू केल्या . ह्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठीचा संपूर्ण खर्च त्यांनी केला होता. सयाजीरावांनी कोलांबिया येथील विद्यापीठात शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती प्रदान केली होती. तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांचे कार्य तर अवघे विश्व जाणून आहे. मुलींना शिक्षण मिळावे यासाठी किती प्रयत्न केले. पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. ह्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. १९१४ ला नाशिक येथे कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मराठा विद्या प्रसारक समाज ही एक शैक्षणिक संस्था स्थापन केली . संस्थेचा उद्देश मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे . विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रशिक्षण दिले जाते. यानंतर १९१९ ला भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊराव पाटील यांनी "कमवा आणि शिका" ही संकल्पना राबवली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेनंतर श्रम करून पैसे कमवायचे आणि त्यातून शिक्षणाचा खर्च भागवायचा होता. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरता आणि श्रमाचा आदर शिकायला मिळाला. त्यांनी महिलांच्या शिक्षणालाही खूप महत्त्व दिले. त्यांच्या मते, स्त्रीशिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. 

  भारतातील सद्यस्थिती पाहता शिक्षण हाच एकमेव असा राजमार्ग आहे की जो भारतात चाललेल्या दडपशाहीला , अन्यायाला आळा घालण्यासाठी मदत करेल. आणि भारत देशाला एका उच्च शिक्षित, लढाऊ आणि निर्भिड युवा नेतृत्वाची भारताला गरज आहे की जे नेतृत्व देशाला सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक अश्या सर्व दृष्टीने सांभाळून ठेवू शकेल आणि देशाला खऱ्याखुऱ्या रूपाने विकसित बनवेल. राजकारण न करता समाजकारण करेल आणि पक्ष सोडण्यापेक्षा आपला स्वार्थ सोडून देशाच्या हितासाठी काम करेल. ह्या शिक्षणानेच राष्ट्रहिताचे सुवर्ण स्वप्न साकार होईल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही....!!!!! 


लेखक व माहिती संकलन: प्रसाद भालेकर, विद्यार्थी प्रतिनिधी, नाशिक शहर 

संचालक - जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल, नाशिक 

मो. ९५२९१९५६८८ | E-mail ID :  jivankeshrimarathi@gmail.com


 

शुक्रवार, १७ मे, २०२४

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे करणार हॅट्रिक ?

 नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे करणार हॅट्रिक ?

नाशिकमध्ये गोडसे व वाजेंची लढत रंगणार ! 

(संग्रहित छायाचित्र ) 


नाशिक :- नाशिक लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर  राजकरणातील देशाचा केंद्रस्थान बनला होता. महाविकास आघाडी कडून 48 ते 50 दिवसा अगोदरच उमेदवार जाहीर झाला होता तर महायुतीचा उमेदवार अतिशय उशिरा जाहीर झाला, यामुळे मोठ्या प्रमाणात महायुतीला फटका बसेल असं अनेकांचे मत होतं ; परंतु विद्यमान खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांचा पक्षापलीकडचे संबंध व त्यांनी या दहा वर्षांमध्ये निर्माण केलेला दांडगा जनसंपर्क याच्यामुळे त्यांना ही लढत सोपी जात असतानात दिसत आहे. त्यांचा अतिशय शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा जनतेशी अतिशय तळागाळापर्यंत नाळ जोडली गेली आहे. कोरोना काळामध्ये हेमंत गोडसे यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक देशात सहावा क्रमांक आला होता, हेच नाशिकच्या जनतेने लक्षात घेता त्यांची उमेदवारी जाहीर होताच मोठ्या मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आलं. मध्यंतरी राजाभाऊ वाजे यांनी स्वतः मागच्या पंचवार्षिक निवडणुकी वेळी खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी 50% पेक्षा जास्त निधी हा सिन्नरमध्ये दिल्याचं कबुली दिल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राजाभाऊ वाजेंच होम ग्राऊंड मानल जाणाऱ्या सिन्नरमध्ये गोडसे यांनी सिन्नरमध्ये भरघोस निधी वाटप केल्यामुळे त्यांना सिन्नर मध्ये सुद्धा महाप्रचंड असा प्रतिसाद भेटत आहे. 

महाराष्ट्र राज्यातील पहिली तर देशातील तिसरी टेस्टिंग लॅब , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 26000 परिवारांसाठी म्हणजेच एक लाख सहा हजारहून अधिक नाशिककरांसाठी त्यांनी सीजीएचएस सेंटर बांधले, कसंशील मला जाणाऱ्या नाशिक मध्ये यूपीएससी, एमपीएससी आणि नीट चे सेंटर नव्हते ते त्यांनी नाशिकमध्ये आणले, ९ वर्षापासून बंद पडलेल्या नाशिक साखर कारखाना त्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू करून 16000 शेतकऱ्यांना त्यांनी नवसंजीवनी दिली, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे चाक निर्मिती कारखान्याला त्यांनी गती दिली, मधील वाहतूक कोंडी आणि अपघात थांबवण्यासाठी जत्रा हॉटेल ते केके वाघ पर्यंतचा उड्डाणपूल बांधून तो कार्यान्वित देखील केला, पतीचे शेकडो कामांचा कार्य अहवाल त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे त्यांचं पारडं जड दिसत आहे. ताई येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाचा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये चालू असलेल्या रणधुमाळी अंतिम निर्णय काय लागतो ते बघणं रोमांचक ठरणार आहे.

शनिवार, ११ मे, २०२४

 २६ मे पासून ऑनलाईन एआय स्किल प्रशिक्षण शिबिराला होणार सुरूवात 

( By :- Prasad Bhalekar, Ai ) 




नाशिक:- आत्ताचे युग हे अत्यंत स्पर्धेचे आहे व डिजिटल झाले आहे त्यामुळे त्या युगाबरोबर आपण चालणे गरजेचे आहे. ह्याच पाश्र्वभूमीवर जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल तर्फे AI व इतर विविध डिजिटल स्किलचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना Chat Gpt, Bing, Google Gemini व अश्या विविध एआय सोफ्टवेअरची तोंडओळख तसेच त्यांचा वापर ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. इमेल आयडी बनविणे, ब्लॉगर ह्या प्लॅटफॉर्मचीही तोंडओळख तसेच त्यांच्या यंत्रणेचे स्पष्टीकरणासहीत प्रात्यक्षिक ऑनलाईन प्रशिक्षणामार्फत दाखविले जाणार आहे. ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये १३ वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे. प्रशिक्षण शिबिरामधील घटक शिकवून झाल्यानंतर शिकवलेल्या घटकांवर ५० गुणांची प्रात्यक्षिक व ५० मार्कांची ऑनलाईन टेस्ट अशी एकूण १०० गुणांची ऑनलाईनरीत्या परीक्षा घेण्यात येणार आहे. व त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र तसेच प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र+ पदक ( मेडल ) देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी २६ मे २०२४ ते ५ जून २०२४ ह्या कालावधीत होणार असून नावनोंदणीची शेवटची मुदत २२ मे २०२४ अशी आहे. अधिक माहितीसाठी मो. ९५२९१९५६८८ किंवा इमेल आयडी: jivankeshrimarathi@gmail.com ह्यावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षणाच्या आयोजकांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १००/- सहभागी शुल्क आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसांत मुलांचे फक्त आमरस पिऊन करीअर नाही बनणार तर काहीतरी डिजिटल स्किलचे प्रशिक्षण घेतल्याने करीअर घडेल नाहीतर एआय तुमच्या नोकऱ्यासुध्दा ताब्यात घेतील आणि बाकीचे  बेरोजगार बसतील आणि पश्चात्ताप करतील ह्यामुळे डिजिटल पाऊले आपण उचलली पाहीजेत आणि आपले भविष्य आपणच सुरक्षित करायला हवे असे प्रशिक्षण शिबिराचे आयोजक तसेच प्रशिक्षक प्रसाद भालेकर यांनी सांगितले. 

 महावितरणचा कारभार म्हणजे बापाची मोरी अन् मुतायची चोरी ! 

(संग्रहित छायाचित्र) 



नाशिक ( ११ मे ) :- नाशिकमध्ये सध्या महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू ह्यामुळे ग्राहकांना न कळविताच महावितरणकडून सलग चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित होतो. ग्राहकांना ह्या सर्व गोष्टींचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने दि. ११ मे रोजी सकाळी ९:१५ वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यामुळे एका ग्राहकांने ऑनलाईन प्रकारे तक्रार नोंदवली असता महावितरणच्या भद्रकाली येथील कार्यालयातून एका अधिकाऱ्याने ग्राहकांशी फोनवर हुज्जत घातली व माहिती घ्या , लोकल नंबर वर फोन करा, थोडं थांबत जा घरी बसल्या - बसल्या फक्त तक्रार नोंदणी का करतात ? असा सवाल केला . ह्याचे उत्तर महावितरणला जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून रोखठोक पणे देण्यात येते की ग्राहक हे विद्युत सेवा मिळविण्यासाठी पैसे भरतात आणि जर पैसे भरण्यासाठी दोन दिवस उशीर झाल्यास तुम्ही त्यांच्या विद्युत पुरवठाचे कनेक्शन बंद करतात तर ग्राहकांचा मान ठेवणे व त्यांना सेवा सुरळीत देणे प्रथम कर्तव्य आहे. सध्या नाशिकमध्ये उन्हाचे तापमान सुध्दा ४० पार आहे. ह्यामुळे लहान मुलांना गरमींमुळे त्रास होतो तसेच गृहीणींना स्वयंपाक करतांना गॅसजवळ प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ह्यामुळे महावितरणने त्वरित एक यंत्रणा उभारावी ज्यामध्ये भारनियमनासंदर्भात ग्राहकाला ४ तासांअगोदर कळविले गेले पाहिजे आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जर सुरळित करण्यासाठी उशीर होणार असल्यास त्याचीही माहिती त्याला मिळणे आवश्यक आहे.‌ ग्राहकांशी सुध्दा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर त्वरित आपली तक्रार दाखल करावी हि सेवा मोफत नव्हे आणि महावितरणचा सावळा गोंधळ आणि कारभार ग्राहकांनाच नडतो . ह्या विषयावर “ बापाची मोरी आणि मुतायची चोरी ” ही म्हण बरोबर बसते हे म्हणायला वावगे ठरणार नाही....! ह्या विषयावर काही कारवाई होईल का ? ग्राहकांना होणाऱ्या अत्याचारावर न्यानदाता न्याय देईल का ? की ग्राहकांना पैसे देऊनही वीजेशिवाय राहून लोकशाहीच्या मार्गाने जर ग्राहक तक्रार दाखल करत असेल तर त्या ग्राहकावर दडपशाही सुरू राहील ? ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहेत. दि. ११ मे २०२४ ला सकाळी ९:१५ ते ठिक दु. १:३६  वाजेपर्यंत हा अघोषित भारनियमन सुरूच होता. ग्राहकांना होणाऱ्या असुविधेची महावितरण दखल घेईल की आपल्या हलगर्जीपणेची पेटंट केलेली कला सुरू राहील. त्याचप्रमाणे महावितरणच्या कस्टमर केअर नंबरवर सुध्दा त्वरीत तक्रार दाखल किंवा इतर गोष्टी करतांना अनेक अडचणींचा ग्राहकांना सामना करावा लागतो. 

शुक्रवार, ३ मे, २०२४

 क्रीडा  विशेष :- 

नाशिकच्या नागार्जुनची नाशिकला सुवर्णपदकाची भेट ! 





नाशिक :- इंडियन पिंच्याक सिल्याट अससोसिएशन च्या संलग्नते खाली महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट अससोसिएशन ने पांचगणी येथे १ ते ३मे २०२४ या कालावधीत ५ वी वेस्ट झोन पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप आयोजित केली होती. या मध्ये नाशिक च्या खेळाडूंनी देखील सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये ३ ते६ या वयोगटात नागर्जून बनसोडे याने टेंडिंग ( फाईट) या खेळ प्रकारात सुवर्ण पदक मिळवून सुवर्ण कामगिरी बजावली.
पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट चा खेळ प्रकार असून (1) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (3) रेगु (ग्रुप काता), (4) गांडा (डेमी फाईट) (5) सोलो (इव्हेंट)या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या 5% राखीव नोकर भरती मध्ये समावेश केला आहे. या खेळाला "युवक कल्याण आणि किडा मंत्रालय भारत सरकार", "भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियायी ची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो. या खेळाचा समावेश गोव्या मध्ये झालेल्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. 
 या खेळामध्ये मागील ११ वर्ष महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे. नागार्जुनच्या ह्या यशामागे त्यांचे वडील व प्रशिक्षक नागेश बनसोडे ह्यांनी मेहनत घेतली.

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

 उद्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाटसअप अभ्यास कट्टा सुरू !  




नाशिक: नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांच्याकडून नुकतेच व्हि. एस. सपकाळ असोसिएट, नाशिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. ऋषिकेश (बापू ) डापसे ह्यांच्या विशेष मदतीने इयत्ता नववी व दहावीच्या काही गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले. आता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. इयत्ता दहावी हे वर्ष आयुष्यासाठी खुप महत्वाचे असून ह्या शैक्षणिक वर्षात चांगली गुणवत्ता आयुष्याला सुरेख‌ वळण देण्यासाठी उपयोगी पडेल ह्याच पार्श्वभूमीवर प्रसाद भालेकर ह्यांच्याकडून नाशिकमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास “ इ . १० वी अभ्यास कट्टा ” व्हाटस्अपद्वारे सुरू करण्यात आला असून १ मे २०२४ पासून हा कार्यान्वित होणार आहे. ह्या व्हाटस्अप अभ्यास कट्ट्यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रश्नांची उत्तरासाठी ची मदत , जर कोणात्या विद्यार्थ्यांला परीक्षेच्या काळात काही प्रश्न अडत असतील तर ते कट्ट्यामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांमार्फत सहजपणे त्या विद्यार्थ्यांला समजतील आणि त्याच्या अभ्यास ही सुरु राहील ह्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवयही लागेल दर रविवारी संध्याकाळी ७:०० ते ८:०० सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एका विषयाच्या अडलेल्या प्रश्नावरती किंवा धड्यावरती सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती मिळवू शकतात. त्यासोबतच समूहात सामील विद्यार्थ्यांना घटक चाचणी , सामासिक परीक्षा तसेच वार्षिक परीक्षेसाठी मागील वर्षीच्या , नमुना प्रश्नपत्रिकांचे संच अभ्यासासाठी दिले जाणार आहेत. त्यासोबतच ज्या घटकांची अडचण आहे त्या घटकांचे व्हिडिओ सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ह्यामुळे बहुतांश प्रमाणात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत मिळणार आहे. 
‌ विद्यार्थ्यांचा अभ्यास हा शाळा , क्लास यांपेक्षा मित्रांसोबत जास्त लवकर समजतो आणि ते आनंदाने करतात व्हाटस्अप ग्रुप जॉईन करण्याकरिता व्हाटस्अप लिंक https://chat.whatsapp.com/DqE5f4gvTqjCW6X6iZ3TAI  ही आहे. आणि ह्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. व कोणत्याही अटी नाही. फक्त विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदारीवर ह्या कट्ट्यात सामील व्हावे व शैक्षणिक माहिती व्यतिरिक्त इतर गोष्टी समुहात पोस्ट करू नये . व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमात व समूहात सामील व्हा असे आवाहन उपक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.

मुलांना ह्या डिजिटल अभ्यास कट्ट्यामुळे अभ्यासात व त्यांची  गुणवत्ता सुधारण्यासाठी खुपच चांगली मदत होईल . बदलत्या काळानुसार आपण सुध्दा बदलले पाहिजे. -

 

प्रसाद भालेकर, विद्यार्थी प्रतिनिधी, नाशिक 

  

शनिवार, २० एप्रिल, २०२४

 इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण



नाशिक ( १९, शुक्रवार) :- नाशिकमध्ये नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांच्याकडून नाशिकमधील तमाम नागरिकांना इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. व इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. ह्या उपक्रमाचा मानस हेतू हा फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटलीसाठी हातभार लावावा आणि त्यांचे शैक्षणिक व बौद्धिक हित लक्षात घेऊन महाराष्ट्रासह भारताची प्रतिमा अजून बळकट करण्याचा निस्वार्थ भाव होता. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे २० गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचे अनमोल कार्य पार पडले. ज्ञानदान हेचि सर्वश्रेष्ठ दान ! ह्याच तत्वावर कायम होऊन हे कार्य सुरू करण्यात आले होते. व ते कार्य पुर्ण करण्यासाठी नाशिकमधील अनेक शाळांमध्ये संपर्क साधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर अनेक शिक्षकांना ह्या उपक्रमाबाबत कल्पना दिली व नाशिकमधील नामांकित शिक्षण संस्थेला याबाबतीत निवेदन सुध्दा देण्यात आले होते परंतु त्यांच्याकडून जास्त काही प्रतिसाद मिळाला नाही परंतु नाशिकमधील सुप्रसिद्ध कर सल्लागार व व्हि.एस. सपकाळ असोसिएटस् चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ ह्यांनी त्वरित आम्हाला गरीब गरजू व शिक्षण इच्छुक इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांसाठी सुमारे २० पाठ्यपुस्तके त्वरीत उपलब्ध करून दिले .

शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीचे मोफत पाठ्यपुस्तके वितरण करताना व्हि.एस.सपकाळ असोसिएट प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ व विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर


STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...