२६ मे पासून ऑनलाईन एआय स्किल प्रशिक्षण शिबिराला होणार सुरूवात
नाशिक:- आत्ताचे युग हे अत्यंत स्पर्धेचे आहे व डिजिटल झाले आहे त्यामुळे त्या युगाबरोबर आपण चालणे गरजेचे आहे. ह्याच पाश्र्वभूमीवर जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल तर्फे AI व इतर विविध डिजिटल स्किलचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना Chat Gpt, Bing, Google Gemini व अश्या विविध एआय सोफ्टवेअरची तोंडओळख तसेच त्यांचा वापर ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. इमेल आयडी बनविणे, ब्लॉगर ह्या प्लॅटफॉर्मचीही तोंडओळख तसेच त्यांच्या यंत्रणेचे स्पष्टीकरणासहीत प्रात्यक्षिक ऑनलाईन प्रशिक्षणामार्फत दाखविले जाणार आहे. ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये १३ वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे. प्रशिक्षण शिबिरामधील घटक शिकवून झाल्यानंतर शिकवलेल्या घटकांवर ५० गुणांची प्रात्यक्षिक व ५० मार्कांची ऑनलाईन टेस्ट अशी एकूण १०० गुणांची ऑनलाईनरीत्या परीक्षा घेण्यात येणार आहे. व त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र तसेच प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र+ पदक ( मेडल ) देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी २६ मे २०२४ ते ५ जून २०२४ ह्या कालावधीत होणार असून नावनोंदणीची शेवटची मुदत २२ मे २०२४ अशी आहे. अधिक माहितीसाठी मो. ९५२९१९५६८८ किंवा इमेल आयडी: jivankeshrimarathi@gmail.com ह्यावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षणाच्या आयोजकांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १००/- सहभागी शुल्क आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसांत मुलांचे फक्त आमरस पिऊन करीअर नाही बनणार तर काहीतरी डिजिटल स्किलचे प्रशिक्षण घेतल्याने करीअर घडेल नाहीतर एआय तुमच्या नोकऱ्यासुध्दा ताब्यात घेतील आणि बाकीचे बेरोजगार बसतील आणि पश्चात्ताप करतील ह्यामुळे डिजिटल पाऊले आपण उचलली पाहीजेत आणि आपले भविष्य आपणच सुरक्षित करायला हवे असे प्रशिक्षण शिबिराचे आयोजक तसेच प्रशिक्षक प्रसाद भालेकर यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा