Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, ११ मे, २०२४

 महावितरणचा कारभार म्हणजे बापाची मोरी अन् मुतायची चोरी ! 

(संग्रहित छायाचित्र) 



नाशिक ( ११ मे ) :- नाशिकमध्ये सध्या महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू ह्यामुळे ग्राहकांना न कळविताच महावितरणकडून सलग चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित होतो. ग्राहकांना ह्या सर्व गोष्टींचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने दि. ११ मे रोजी सकाळी ९:१५ वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यामुळे एका ग्राहकांने ऑनलाईन प्रकारे तक्रार नोंदवली असता महावितरणच्या भद्रकाली येथील कार्यालयातून एका अधिकाऱ्याने ग्राहकांशी फोनवर हुज्जत घातली व माहिती घ्या , लोकल नंबर वर फोन करा, थोडं थांबत जा घरी बसल्या - बसल्या फक्त तक्रार नोंदणी का करतात ? असा सवाल केला . ह्याचे उत्तर महावितरणला जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून रोखठोक पणे देण्यात येते की ग्राहक हे विद्युत सेवा मिळविण्यासाठी पैसे भरतात आणि जर पैसे भरण्यासाठी दोन दिवस उशीर झाल्यास तुम्ही त्यांच्या विद्युत पुरवठाचे कनेक्शन बंद करतात तर ग्राहकांचा मान ठेवणे व त्यांना सेवा सुरळीत देणे प्रथम कर्तव्य आहे. सध्या नाशिकमध्ये उन्हाचे तापमान सुध्दा ४० पार आहे. ह्यामुळे लहान मुलांना गरमींमुळे त्रास होतो तसेच गृहीणींना स्वयंपाक करतांना गॅसजवळ प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ह्यामुळे महावितरणने त्वरित एक यंत्रणा उभारावी ज्यामध्ये भारनियमनासंदर्भात ग्राहकाला ४ तासांअगोदर कळविले गेले पाहिजे आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जर सुरळित करण्यासाठी उशीर होणार असल्यास त्याचीही माहिती त्याला मिळणे आवश्यक आहे.‌ ग्राहकांशी सुध्दा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर त्वरित आपली तक्रार दाखल करावी हि सेवा मोफत नव्हे आणि महावितरणचा सावळा गोंधळ आणि कारभार ग्राहकांनाच नडतो . ह्या विषयावर “ बापाची मोरी आणि मुतायची चोरी ” ही म्हण बरोबर बसते हे म्हणायला वावगे ठरणार नाही....! ह्या विषयावर काही कारवाई होईल का ? ग्राहकांना होणाऱ्या अत्याचारावर न्यानदाता न्याय देईल का ? की ग्राहकांना पैसे देऊनही वीजेशिवाय राहून लोकशाहीच्या मार्गाने जर ग्राहक तक्रार दाखल करत असेल तर त्या ग्राहकावर दडपशाही सुरू राहील ? ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहेत. दि. ११ मे २०२४ ला सकाळी ९:१५ ते ठिक दु. १:३६  वाजेपर्यंत हा अघोषित भारनियमन सुरूच होता. ग्राहकांना होणाऱ्या असुविधेची महावितरण दखल घेईल की आपल्या हलगर्जीपणेची पेटंट केलेली कला सुरू राहील. त्याचप्रमाणे महावितरणच्या कस्टमर केअर नंबरवर सुध्दा त्वरीत तक्रार दाखल किंवा इतर गोष्टी करतांना अनेक अडचणींचा ग्राहकांना सामना करावा लागतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...