Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, २० एप्रिल, २०२४

 इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण



नाशिक ( १९, शुक्रवार) :- नाशिकमध्ये नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांच्याकडून नाशिकमधील तमाम नागरिकांना इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. व इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. ह्या उपक्रमाचा मानस हेतू हा फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटलीसाठी हातभार लावावा आणि त्यांचे शैक्षणिक व बौद्धिक हित लक्षात घेऊन महाराष्ट्रासह भारताची प्रतिमा अजून बळकट करण्याचा निस्वार्थ भाव होता. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे २० गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचे अनमोल कार्य पार पडले. ज्ञानदान हेचि सर्वश्रेष्ठ दान ! ह्याच तत्वावर कायम होऊन हे कार्य सुरू करण्यात आले होते. व ते कार्य पुर्ण करण्यासाठी नाशिकमधील अनेक शाळांमध्ये संपर्क साधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर अनेक शिक्षकांना ह्या उपक्रमाबाबत कल्पना दिली व नाशिकमधील नामांकित शिक्षण संस्थेला याबाबतीत निवेदन सुध्दा देण्यात आले होते परंतु त्यांच्याकडून जास्त काही प्रतिसाद मिळाला नाही परंतु नाशिकमधील सुप्रसिद्ध कर सल्लागार व व्हि.एस. सपकाळ असोसिएटस् चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ ह्यांनी त्वरित आम्हाला गरीब गरजू व शिक्षण इच्छुक इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांसाठी सुमारे २० पाठ्यपुस्तके त्वरीत उपलब्ध करून दिले .

शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीचे मोफत पाठ्यपुस्तके वितरण करताना व्हि.एस.सपकाळ असोसिएट प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ व विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर


 व शुक्रवारी १९ ला व्हि.एस.सपकाळ असोसिएटस् च्या पेठ फाट्यावरील पंचवटी प्राईड येथील  कार्यालयात व्हि. एस. सपकाळ असोसिएट प्रा.ली. ह्यांच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके वितरण समारंभ उत्साहात पार पडला. व ह्या समारंभात इयत्ता नववी व दहावीच्या २० विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी व्हि.एस.सपकाळ असोसिएट प्रा.लि. चे मुख्य संचालक ( मॅनेजिंग डायरेक्टर) श्री. संदिप सपकाळ, मॅनेजिंग डायरेक्टर सौ. प्रमिल संदिप सपकाळ, कावेरी मौले, सारिका करोटे, निकिता महाले , शीतल काश्मीरे , संध्या जगताप, वैष्णवी नागरे , श्रेया श्रीवास्तव , प्राची राजूरकर, रवींद्र ठाकूर तसेच विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




 मुलांनी ह्या पाठ्यपुस्तकांच्या मदतीने उच्चतम शिक्षण प्राप्त करावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे व आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे :- 

श्री. संदीप सपकाळ

मॅनेजिंग डायरेक्टर, व्हि.एस.सपकाळ असोसिएटस्, नाशिक


 मुलांना मिळालेले मोफत पाठ्यपुस्तकांचे सहाय्य हे त्यांचे भवितव्य अधिक कणखर बनवेल. त्यासोबतच ज्याप्रकारे संदिप सपकाळ ह्यांनी मोफत पाठ्यपुस्तकांची सहाय्यता केली फारच अनमोल आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात प्रगती करावी व महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने पाऊले उचलावी व महाराष्ट्र व भारताचा सर्वांगीण विकास करावा. व आमच्या उपक्रमात सहाय्य केल्याबद्दल संदिप सपकाळ ह्यांचे आभार व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

:- प्रसाद भालेकर , विद्यार्थी प्रतिनिधी, नाशिक शहर. 


 मला इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकांची आवश्यकता होती. घरातील आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे मला पुस्तकांचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु श्री. संदीप सपकाळ यांच्या वतीने मला मोफत पाठ्यपुस्तकांचा संच मिळाल्याने मला प्रोत्साहन मिळाले मी आता अधिक जोमाने अभ्यास करेन. 

:- कु. ओमकार कुटे , इयत्ता दहावीचा विद्यार्थी.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...