५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नाशकात आयोजन
नाशिक:- महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याना G-20 शिखराच्या बैठकीचे भारताला २०२३ मध्ये अध्यक्षपद मिळाले आहे त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य व महत्व विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांमध्ये रूजू व्हावे हा ह्या स्पर्धेचा मुख्य हेतु आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. स्पर्धा नोंदणीची मुदत १० एप्रिल २०२४ असून त्यासाठी https:www.pressmediacouncil.org/g20quzregistration ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. वर्गशिक्षकांनी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी करावी अशी सुचना माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. ह्यात पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी , आणि अकरावी व बारावी असे गट करण्यात आले आहे. स्पर्धेची प्रवेश नोंदणी फी ही १००/- आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
पारितोषिके सदरील प्रमाणे:
१) पाचवी ते सातवी - १) १५,०००/- २) १०,०००/- ३) ५,०००/- ( प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
२) आठवी ते दहावी - १) २०,०००/- २) १०,०००/- ३) ७,०००/- ( प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
३) अकरावी व बारावी - १) ३०,०००/- २) २०,०००/- ३) १०,०००/- ( प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा