Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, १९ मे, २०२४

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी लेख!

 शिक्षणाचे महत्त्व : राष्ट्रहिताचे सुवर्ण स्वप्न !

Image By :- Prasad Bhalekar, Ai Art . 


“शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे . जो ते प्राशन करेल तो दहाडल्या शिवाय राहणार नाही ! ” हे उद्गार शिक्षणाचे अमृत प्राशन केलेले महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे आहे. आणि ते उद्गार अगदी सोन्यासम खरे आहे. “ शिक्षण ” ही एक अशी गोष्ट आहे जी अशक्यास शक्य करण्याची ताकद ठेवते . रंकाला राजा करण्याची शक्ती ह्या शिक्षणात आहे. शिक्षण हे एका अमृताहूनही श्रेष्ठ आहे. कारण , ज्याने योग्य शिक्षण घेतले त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. परंतु ह्या अमृताचे प्राशन करण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची क्षमता क्षणिक लोकांकडेच असते. आणि ज्या व्यक्तीला हे शिक्षणाचा लाभ घेता आला त्याचे जीवन सार्थक झालेच म्हणून समजा...! . आयुष्यात कोणतीही गोष्ट असो तिला प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे जिद्द असायला हवी आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची ताकद आणि तयारी असणे गरजेचे आहे तरच ती गोष्ट आपल्या पदरात पडते. ह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सर्वोत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांची शिक्षण घेण्याबद्दलची जिद्द , चिकाटी फार अतुलनीय आणि सर्वश्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे २८ पदव्या आहेत. त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे आज भारत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात त्यांच्या कर्तृत्वाची गाथा गायली जाते . असे अनेक धुरंधर आहे आपल्या भारत देशाचे ११ वे महान राष्ट्रपती , वैज्ञानिक मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सर. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी अपार कष्ट केले आहे. त्यांनी शिक्षण घेण्यासाठी सायकल वरून जाऊन घरोघरी सकाळी सकाळी पेपर पोहचवत नंतर ते आपल्या शाळेत शिकण्यासाठी जात‌ . कलाम सर हे रामेश्वरम येथे राहत असत आणि त्यांचे विद्यालय रामनाथपुरम येथे होते. श्र्वार्ट्झ हायस्कूलमध्ये ते शिक्षण घेत होते. त्यांच्या घरापासून ते शाळेपर्यंतचे अंतर हे १५ किलोमीटर अंतर होते. त्यामुळे ह्या सर्व लोकांना शिक्षणाची किंमत आहे. कारण , त्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन यशाची गळाभेट घेतली आहे. 

  एकदा डॉ. ए.पी.जे . अब्दुल कलाम सर ह्यांची आणि युवा उद्योजक श्री. श्रीकांत बोला ह्यांची पहिल्यांदा जेव्हा विद्यालयात भेट झाली तेव्हा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा प्रश्न विचारला की “तुमचे सर्वोच्च स्वप्न काय आहे” तेव्हा श्रीकांत बोला हयाने उत्तर दिले की मी एका मोठा उद्योजक होणार आहे आणि अंध व्यक्तींसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. श्रीकांत हे एक अंध व्यक्ती आहे त्यांना शिकण्यासाठी अनेक कष्टांचा सामना करावा लागला. कॉलेजने त्यांना सायन्स विषय देण्यासाठी मनाई केली होती ह्यावेळी त्यांनी न्यायासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती व त्याने न्यायालयात अंध विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी केलेल्या व्यक्तव्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना तेथे सायन्स ला प्रवेश मिळाला. यामुळे त्यांना सुध्दा शिक्षणाची जाणीव आहे. तेही अंध होते पण त्यांनी हार न मानता शिक्षणासाठी झटले आणि ह्यामागे त्यांच्या शिक्षिका देविका भुयान  ह्यांनी त्यांना साथ दिली . ह्यानंतर त्यांनी अंध व्यक्तींसाठी एक उद्योग निर्माण करण्याचे ठरविले ह्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम सर ह्यांची व त्यांचे मित्र ह्यांची त्यांना मदत झाली. शिक्षण ही गोष्टच निराळी आहे ज्याला मिळाली तो व्यक्ती पावन होतोच पण ते शिक्षण घेण्यासाठी जिद्द आणि काहीतरी करुन दाखविण्यासाठी आपल्याला प्रेरणास्त्रोत असणे गरजेचे आहे. हे सर्व व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, श्रीकांत बोला आणि इतर अनेक ज्ञात - अज्ञात व्यक्ती ह्यांच्याकडे जिद्द होती आणि त्या जिद्दीमुळेच त्यांचे नाव आज विश्वात अभिमानाने झळकत आहेत. नुकताच १० मे २०२४ रोजी श्रीकांत बोला ह्यांच्या संघर्षमयी जीवनावर चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला असून तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. 


  यांशिवाय क्रांतिसुर्य महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले ह्या सर्व महान व्यक्तींचे शिक्षण दानासाठी अनमोल योगदान आहे. शाहू महाराज ह्यांनी सुध्दा कोल्हापुरात अनेक शाळां सुरू केल्या . ह्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठीचा संपूर्ण खर्च त्यांनी केला होता. सयाजीरावांनी कोलांबिया येथील विद्यापीठात शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती प्रदान केली होती. तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांचे कार्य तर अवघे विश्व जाणून आहे. मुलींना शिक्षण मिळावे यासाठी किती प्रयत्न केले. पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. ह्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. १९१४ ला नाशिक येथे कर्मवीर रावसाहेब थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मराठा विद्या प्रसारक समाज ही एक शैक्षणिक संस्था स्थापन केली . संस्थेचा उद्देश मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे . विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रशिक्षण दिले जाते. यानंतर १९१९ ला भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊराव पाटील यांनी "कमवा आणि शिका" ही संकल्पना राबवली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेनंतर श्रम करून पैसे कमवायचे आणि त्यातून शिक्षणाचा खर्च भागवायचा होता. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरता आणि श्रमाचा आदर शिकायला मिळाला. त्यांनी महिलांच्या शिक्षणालाही खूप महत्त्व दिले. त्यांच्या मते, स्त्रीशिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. 

  भारतातील सद्यस्थिती पाहता शिक्षण हाच एकमेव असा राजमार्ग आहे की जो भारतात चाललेल्या दडपशाहीला , अन्यायाला आळा घालण्यासाठी मदत करेल. आणि भारत देशाला एका उच्च शिक्षित, लढाऊ आणि निर्भिड युवा नेतृत्वाची भारताला गरज आहे की जे नेतृत्व देशाला सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक अश्या सर्व दृष्टीने सांभाळून ठेवू शकेल आणि देशाला खऱ्याखुऱ्या रूपाने विकसित बनवेल. राजकारण न करता समाजकारण करेल आणि पक्ष सोडण्यापेक्षा आपला स्वार्थ सोडून देशाच्या हितासाठी काम करेल. ह्या शिक्षणानेच राष्ट्रहिताचे सुवर्ण स्वप्न साकार होईल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही....!!!!! 


लेखक व माहिती संकलन: प्रसाद भालेकर, विद्यार्थी प्रतिनिधी, नाशिक शहर 

संचालक - जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल, नाशिक 

मो. ९५२९१९५६८८ | E-mail ID :  jivankeshrimarathi@gmail.com


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...