Join The WhatsApp group
शुक्रवार, ३ मे, २०२४
मंगळवार, ३० एप्रिल, २०२४
उद्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाटसअप अभ्यास कट्टा सुरू !
“ मुलांना ह्या डिजिटल अभ्यास कट्ट्यामुळे अभ्यासात व त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी खुपच चांगली मदत होईल . बदलत्या काळानुसार आपण सुध्दा बदलले पाहिजे. -
प्रसाद भालेकर, विद्यार्थी प्रतिनिधी, नाशिक
शनिवार, २० एप्रिल, २०२४
इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण
नाशिक ( १९, शुक्रवार) :- नाशिकमध्ये नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांच्याकडून नाशिकमधील तमाम नागरिकांना इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. व इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. ह्या उपक्रमाचा मानस हेतू हा फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटलीसाठी हातभार लावावा आणि त्यांचे शैक्षणिक व बौद्धिक हित लक्षात घेऊन महाराष्ट्रासह भारताची प्रतिमा अजून बळकट करण्याचा निस्वार्थ भाव होता. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे २० गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचे अनमोल कार्य पार पडले. ज्ञानदान हेचि सर्वश्रेष्ठ दान ! ह्याच तत्वावर कायम होऊन हे कार्य सुरू करण्यात आले होते. व ते कार्य पुर्ण करण्यासाठी नाशिकमधील अनेक शाळांमध्ये संपर्क साधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर अनेक शिक्षकांना ह्या उपक्रमाबाबत कल्पना दिली व नाशिकमधील नामांकित शिक्षण संस्थेला याबाबतीत निवेदन सुध्दा देण्यात आले होते परंतु त्यांच्याकडून जास्त काही प्रतिसाद मिळाला नाही परंतु नाशिकमधील सुप्रसिद्ध कर सल्लागार व व्हि.एस. सपकाळ असोसिएटस् चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ ह्यांनी त्वरित आम्हाला गरीब गरजू व शिक्षण इच्छुक इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांसाठी सुमारे २० पाठ्यपुस्तके त्वरीत उपलब्ध करून दिले .
![]() |
| शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीचे मोफत पाठ्यपुस्तके वितरण करताना व्हि.एस.सपकाळ असोसिएट प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ व विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर |
शनिवार, ६ एप्रिल, २०२४
५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नाशकात आयोजन
५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नाशकात आयोजन
नाशिक:- महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याना G-20 शिखराच्या बैठकीचे भारताला २०२३ मध्ये अध्यक्षपद मिळाले आहे त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य व महत्व विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांमध्ये रूजू व्हावे हा ह्या स्पर्धेचा मुख्य हेतु आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. स्पर्धा नोंदणीची मुदत १० एप्रिल २०२४ असून त्यासाठी https:www.pressmediacouncil.org/g20quzregistration ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. वर्गशिक्षकांनी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी करावी अशी सुचना माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. ह्यात पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी , आणि अकरावी व बारावी असे गट करण्यात आले आहे. स्पर्धेची प्रवेश नोंदणी फी ही १००/- आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
पारितोषिके सदरील प्रमाणे:
१) पाचवी ते सातवी - १) १५,०००/- २) १०,०००/- ३) ५,०००/- ( प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
२) आठवी ते दहावी - १) २०,०००/- २) १०,०००/- ३) ७,०००/- ( प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र)
३) अकरावी व बारावी - १) ३०,०००/- २) २०,०००/- ३) १०,०००/- ( प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र )
रविवार, २४ मार्च, २०२४
मौजे सुकेणे विद्यालयात होळी व धुळवड साजरी
![]() |
| मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव व आदर्श शिशु विहार च्या विद्यार्थ्यांकडून होळी व धुळवड साजरी करण्यात आली त्याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी |
मौजे सुकेणे विद्यालयात शहीद दिन साजरा
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २४- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने त्यांना अभिवादन करून शहीद दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते भगतसिंग,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांच्या हस्ते राजगुरू व पर्यवेक्षक नितीन भामरे यांच्या हस्ते सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थिनी सिद्धी वडघुले हिने मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दवंगे यांनी शहीद दिन साजरा करण्यामागचा हेतू,भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांचे कार्य विशद केले सूत्रसंचालन रामेश्वर धोंगडे यांनी तर आभार बाळासाहेब गडाख यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते
बुधवार, १३ मार्च, २०२४
राष्ट्रीय π दिन : विशेष लेख
गणितज्ञांनी त्याचं मूल्य निर्धारित केलं. राष्ट्रीय π दिन हा त्यांच्या मुल्यानुसार दुपारी १:५९ वाजता साजरा करतात.
के.टी.एच.एम. महाविद्यालय बायोब्रेन व केमियाड स्पर्धा - नाशिक के.टी.एच.ए...
-
आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिरात मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा नाशिक:- विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांचे प्रयोग बघतां...
-
११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ - जीवन केशरी जीवन केशरी मराठी jivankeshrimarathi@gmail.com ...





