Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, २४ मार्च, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात शहीद दिन साजरा



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २४- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने त्यांना अभिवादन करून शहीद दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते भगतसिंग,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांच्या हस्ते राजगुरू व पर्यवेक्षक नितीन भामरे यांच्या हस्ते सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थिनी सिद्धी वडघुले हिने मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दवंगे यांनी शहीद दिन साजरा करण्यामागचा हेतू,भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांचे कार्य विशद केले सूत्रसंचालन रामेश्वर धोंगडे यांनी तर आभार बाळासाहेब गडाख यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...