इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण
नाशिक ( १९, शुक्रवार) :- नाशिकमध्ये नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांच्याकडून नाशिकमधील तमाम नागरिकांना इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. व इयत्ता नववी व दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. ह्या उपक्रमाचा मानस हेतू हा फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटलीसाठी हातभार लावावा आणि त्यांचे शैक्षणिक व बौद्धिक हित लक्षात घेऊन महाराष्ट्रासह भारताची प्रतिमा अजून बळकट करण्याचा निस्वार्थ भाव होता. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे २० गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचे अनमोल कार्य पार पडले. ज्ञानदान हेचि सर्वश्रेष्ठ दान ! ह्याच तत्वावर कायम होऊन हे कार्य सुरू करण्यात आले होते. व ते कार्य पुर्ण करण्यासाठी नाशिकमधील अनेक शाळांमध्ये संपर्क साधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर अनेक शिक्षकांना ह्या उपक्रमाबाबत कल्पना दिली व नाशिकमधील नामांकित शिक्षण संस्थेला याबाबतीत निवेदन सुध्दा देण्यात आले होते परंतु त्यांच्याकडून जास्त काही प्रतिसाद मिळाला नाही परंतु नाशिकमधील सुप्रसिद्ध कर सल्लागार व व्हि.एस. सपकाळ असोसिएटस् चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ ह्यांनी त्वरित आम्हाला गरीब गरजू व शिक्षण इच्छुक इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांसाठी सुमारे २० पाठ्यपुस्तके त्वरीत उपलब्ध करून दिले .
![]() |
शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीचे मोफत पाठ्यपुस्तके वितरण करताना व्हि.एस.सपकाळ असोसिएट प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदिप सपकाळ व विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर |