Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, १० मार्च, २०२४

मौजे सुकेणे विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

WhatsApp Group Join Button </!doctype>

 

मौजे सुकेणे विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा 

 मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनाप्रसंगी प्राचार्य दवंगे, सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच अनुपमा जाधव व आदी



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १०- मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव विद्यालय, कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनी कसबे सुकेणे पंचक्रोशीतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांसह विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते व्यासपीठावर मौजे सुकेणे सरपंच सौ सुरेखा चव्हाण, कसबे सुकेणे उपसरपंच सौ अनुपमा जाधव, प्रा डॉ छाया भोज,अँड निर्मला अरिंगळे, अभिनव मुख्याध्यापिका सुवर्ण ठाकरे आदी उपस्थित होत्या सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सर्व महिलांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रास्ताविक श्रीम वैशाली जाधव यांनी केले यावेळी विद्यार्थिनी कु ईश्वरी सुनील भंडारे कु ईश्वरी नितीन भंडारे कु श्रीवास्ती ननवरे यांनी तर अतिथींच्या वतीने डॉ छाया भोज,अँड निर्मला अरिंगळे, सरपंच सुरेखा चव्हाण तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी महिला दिनानिमित्ताने मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे,ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे यांच्यासह सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या सूत्रसंचालन कवी मुकुंद ताकाटे यांनी तर आभार श्रीम बेबी सोनवणे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...