Join The WhatsApp group
सोमवार, १० जुलै, २०२३
सुवर्णा देसलेंना पीएचडी प्रदान
गुरुवार, ८ जून, २०२३
मुलांच्या शिक्षणात शासनाचा भेदभाव का?
मुलांच्या शिक्षणात शासनाचा भेदभाव का?
- प्रसाद भालेकर, संपादक
___________________________________________________
समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके मोफत दिले जाते. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात परंतु इयत्ता नववीपासून मुलांना शालेय पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. शासनाने शाळेतून गळतीचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करतात परंतु नववी पासूनच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. शाळेतून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण हे नववी नंतर मोठ्या प्रमाणात खालावले जाते . दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात परंतु इयत्ता नववीपासून जर मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली तर शासनास लाखो करोडो रूपयांचे नुकसान होणार नाही .
एकीकडे प्रशासनान बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबविण्यात अव्वल असते परंतु ६ मार्च १९८६ रोजी मुलींना शासकीय शाळांमध्ये तसेच अनुदानित शाळांमध्येही मुलींकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये असे स्पष्ट करण्यात आले असले तरी शाळांमध्ये मुलींकडून शालेय शुल्क आकारले जातात असे का ?
शिक्षण हा माणसाचा पाया आहे हे प्रशासनास माहित नसावे का ? RTE अंतर्गत ६ - १४ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. ६ वे वर्ष म्हणजे पहिलीस प्रवेश मिळतो व विद्यार्थ्याचे १४ वे वर्ष म्हणजे तो विद्यार्थी ९ वी इयत्तेत असतो . परंतु शाळा आठवीनंतर मुलांना मोफत शिक्षण देण्यास नकार देतात.
अनेक अश्या शाळा आहेत ज्या आरटीई अंतर्गत घेतलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवतात त्यांना प्रवेश देण्यास अनेक अडचणी निर्माण करतात. ह्याचा कोणालाही फरक पडत नाही . शासनाने ज्याप्रमाणे पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तके देतात त्याचप्रमाणे ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनाही दिल्यास काहीही गैर ठरणार नाही. एकीकडे प्रशासन बालकामास विरोध करते व एकीकडे त्याच बालकांना शिक्षणासाठी अडवते.
अनेक ठिकाणी रस्ते तयार होतात , अनेक विकास कामांसाठी अनेक खर्च होतात परंतु शिक्षणाचा खर्च हा शासनास नकोसा वाटायला लागतो का कुणास ठाऊक? मुले ही देवाघरची फुले म्हणतात पण महाराष्ट्रातील फुले ही पाण्यावाचून व मुले ही शिक्षणावाचून कोमजतील याचे भान ना शासनाने राखले पाहिजे . महागाईच्या काळात शासनाने वह्या - पुस्तके यांचे दर वाढवले आहेत त्यावर अनेक कर लादले आहे म्हणून जर शिक्षणाचा समानार्थी शब्द हा महागाई आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक मुले शिक्षणासाठी झटणारे आहेत परंतु त्यांना यश येत नाही. आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वी पर्यंत मोफत प्रवेश असतो मग नववी दहावीचे अंत्यसंस्कार करायचे का ? जे मुले आरटीई योजनेतंर्गत , शासनाने केलेल्या शिक्षण सुविधांची मदत घेऊन शाळेत प्रवेश घेत असतील त्यांची परिस्थिती तुम्ही ओळखायला शिकले नाहीत. त्यांच्यावर तुम्ही मर्यादा आणलेली आहे. जर मुले शिकली तरच तुम्हाला विकासशील भारत मिळणार नाही. काही शाळांमध्ये शौचालये साफ नसतात त्यांना दारे नसतात तेथे पाण्यासंबंधी अनेक अडचणी उद्भवतात त्या समस्येचे निराकरण वर्ष संपेपर्यंत केले जात नाही.
काही ठिकाणी मैदान नाही. परीपाठ हा अडगळीत ठिकाणी पार पडला जातो , संगीताचे शिक्षक नाही , संगणक आहे संगणक शिक्षक नाही मग तुम्हाला प्रगतशील विद्यार्थी मिळणार कसा ? मुलांच्या अभ्यासक्रमात अनेक गोष्टी घुसवल्या जातात मात्र ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्यांवर लक्ष दिले जात नाही. पुस्तके ही आपली मित्रे म्हणतात व मित्रांना मित्रांपासून दूर करणे असे संविधानात लिहलेले आहे का ? मुलांना त्यांचा योग्य तो हक्क मिळणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी बाल हक्क संरक्षण आयोग यांनी स्पष्ट केले होते की कोणत्याही कारणाने बालकांचे निकाल राखून ठेवल्यास शाळांवर कारवाई करण्यात येईल परंतु शाळांनी ह्यास दुर्लक्ष केले व आज अनेक विद्यार्थांचे निकाल शाळेने राखले आहेत. सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी अशा सर्व शाळा आपली मनमाणी करतात व विद्यार्थी व पालकांना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षरीत्या मानसिक त्रास देतात. शासन ज्या प्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मोफत देतात त्याचप्रमाणे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनाही द्यावे व त्याचप्रमाणे ६ - १४ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे असे न करता इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण करावे कारण काही विद्यार्थी उशीरा शाळेत प्रवेश घेतात यामुळे वयोगटामुळे हा हक्क मुलांना मिळत नाही. यामुळे पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात यावा तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कला दाखवण्यासाठी शासनाने तसेच शाळांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करावे . शासनाने व इतर कोणीही मुलांच्या शिक्षणात भेदभाव करू नये .
मंगळवार, ९ मे, २०२३
मुलांसाठी प्रतिबद्ध शाळा कशी असावी?
मुलांसाठी शाळा निवडतांना ह्या गोष्टी लक्षात घ्या....
राजर्षी शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त कवितेतून अभिवादन ..
मंगळवार, २ मे, २०२३
नाशिक:- मार्शल आर्ट्स फिटनेस शिबिराचे नाशकात भव्य आयोजन
(प्रातिनिधिक चित्र )
मार्शल आर्ट्स फिटनेस शिबिराचे आयोजन
नाशिक:- आजकाल मुले मोबाईलच्या अधीन गेली आहे.कोरोनाकाळात मुलांचे स्वास्थ्य फारच अस्वस्थ झाले आहे त्यांना व्यायाम व शारीरिक व मानसिक विकासाची फारच मोठ्या प्रमाणात गरज आहे काहीमुलांना फारच लहान वयात चष्मा लागतो काहींचे वजन फारच जास्त असते , उंचीचे प्रमाण कमी असणे अश्या विविध समस्या मुलांमध्ये आढळून येतात व आता मुलांना उन्हाळी सुट्यांची सुरूवात झालेली आहे तर ह्यात मुलांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी व आरोग्य सुदृढ मार्शल आर्ट फिटनेस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ह्या शिबिरात कराटे प्रशिक्षण, सुर्य नमस्कार, भारतातील प्राचीन व्यायाम पद्धती, लाठीकाठी शिकवणार आहेत तसेच गोल्फ घोडेस्वारी व पिस्तुल रायफल शूटिंग यांची तोंड ओळख करून दिली जाणार आहे. तसेच तज्ञांचे विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे. मुलांना मंत्रशास्त्र , शरीरशास्त्र , मानवशास्त्र व भाषाशास्त्र यांची माहिती दिली जाणार आहे. मुलांची शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी व्यायाम हा फार महत्वाचा आहे व मुलांनी व्यायाम करणे फार गरजेचे असे तज्ञांकडून समजते. ह्या व्यायामाची आपल्याला फारच गरज आहे ह्यातुन कोरोना सारख्या महामारींचा सामना करणे अतिशय सोपे होणार आहे.ह्यात मुलांचा खेळातील पाया मजबूत होईल तसेच त्यांचा सार्वांगिक विकास होण्यासाठी प्रतिबध्द असे हे शिबिर आहे. शिबिराचा कालावधी ४ मे २०२३ ते १८ मे २०२३ असा असणार आहे. शिबिराचे प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी ३००/- आहे. शिबिराचे ठिकाण :- समर्थ जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी टॉवर, गंगापूर रोड, नाशिक येथे आहे. सकाळी ६:३० ते ७:३० व सायंकाळी ६:३० ते ७:३० ही शिबिराची वेळ आहे. अधिक माहितीसाठी श्री. अरविंद भालेकर मो. 9545979501/9529195688 ला संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रविवार, २३ एप्रिल, २०२३
मोठी बातमी:- मनपाने थकविले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सलग तीन महिन्यांचे मानधन!
(प्रातिनिधिक छायाचित्रे) |
गुरुवार, १३ एप्रिल, २०२३
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा युवाशाहीर प्रसाद भालेकर
आदि नमन तुझं भगवती द्यावी मज मती
गातो मी महती
डॉ. भीमराव आंबेडकर
राज्यघटनेचा शिल्पकार
अन्यायावर केला न्यायाचा प्रहार.... जी.जी.जी
१४ एप्रिल १८९१ चा सुर्य उजडला...
क्रांति घडविण्याला
न्याय हक्कासाठी लढण्याला
तेव्हा न्यायाची , क्रांतीची मशाल धगधगली
दलितांवर होतात अन्यायाचे वार
बाबासाहेबांनी केले न्यायाचे प्रहार
शिक्षणाची घेवून नाव
दलित , गरिबांसाठी घेतली धाव
असा हा भारताचा महामानव जी...
अश्या ह्या महामानवाची क्रीती बेफाम
इंग्रज , बिट्रिशांना फुटला घाम
भारत सोडून गेले लांब
अन् झाला नव्या भारताचा प्रारंभ जी...
दिले न्याय, हक्क मानवांस
चवदार तळ्याचे पाणी उघडले दलितांस
जातिभेदाचा मोडला फास
क्रिर्तीचा डंका भिडे गगणास जी...
लेखक :- युवाशाहीर प्रसाद भालेकर
मो. ९५२९१९५६८८
शाळेचे नाव:- मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक - १
STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ
STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...
-
नाशिक महानगरपालिकेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा कोट्यवधींचा घोटाळा उघड प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि राजकीय ...
-
नाशिक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून ह्याची नोंदणी जागोजागी हो...
-
मौजे सुकेणे येथे ३३ वर्षांनंतर भरला गुरुजनांसह दहावीचा वर्ग थोरात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मेळावा : हृदयस्पर्शी कार्यक्रमात जागवल्य...