Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

बुधवार, २१ मे, २०२५

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडथळा!

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडथळा - जीवन केशरी
बुधवार, २१ मे २०२५ नाशिक, महाराष्ट्र
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडथळा!

नाशिक:- यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने यासंबंधीत ठोस पावले उचलली आहेत. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. असे स्पष्टीकरण शिक्षण मंडळाने दिले होते.

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. १९ व २० मे रोजी प्रवेश प्रक्रियेचा सराव म्हणून संकेतस्थळ सुरू होते. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी २१ मे ते २८ मे २०२५ दरम्यान होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. १९ व २० मे दरम्यान संकेतस्थळावर दाखल झालेले अर्ज आणि विद्यार्थी नोंदणीचा डाटा २० मे रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर काढून टाकण्यात येणार होता आणि २१ मे रोजी स. ११ वाजेनंतर प्रत्यक्ष अर्ज नोंदणी सुरू होणार होती.

परंतु आज दि. २१ मे २०२५ रोजी दु. २ वाजेपर्यंत सुद्धा संकेतस्थळ मात्र बंद असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

अनेकांनी सर्व्हर डाऊन तर काहींनी संकेतस्थळावर सायबर हल्ला झाल्याने संकेतस्थळ बंद असल्याचा अंदाज वर्तवला. तसेच काही सायबर केंद्रामध्ये संकेतस्थळ बंद असतांना सुद्धा बनावट संकेतस्थळावर अर्ज भरणा करून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करत असल्याची धक्कादायक माहिती सुत्रांनी दिली आहे.

परंतु संकेतस्थळावर सायबर हल्ला किंवा सर्व्हर डाऊन आदी असे काहीही झालेले नसून, विद्यार्थी व पालकांना इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज दाखल करतांना तसेच विद्यार्थी नोंदणी करतांना, कागदपत्रे सादरीकरण करतांना, प्रवेश अर्ज शुल्क भरणा करतांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी संकेतस्थळाची रचना ही युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच संकेतस्थळ विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर काहीही अडचण निर्माण होऊ नये ह्याची खबरदारी प्रशासन घेत आहेत. नागरीकांनी व विद्यार्थीनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रवेश अर्ज भरणा करावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

शनिवार, १७ मे, २०२५

प्रभाग २४ मध्ये विकासकामांची घडी बसतेय - जीवन केशरी
🔴 प्रभाग २४ मध्ये विकासकामांची घडी बसतेय!
सभामंडप निर्मिती पूर्ण - नागरिकांच्या सेवेसाठी साकार!
नाशिक, दिनांक: १७ मे २०२५

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला यश आले आहे. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर, शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे प्रभाग २४ मध्ये सभामंडप निर्मितीचे काम पूर्णत्वास आले आहे. हा सभामंडप आता परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाला आहे.

या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब, शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते विजय (आप्पा) करंजकर, आमदार सुहास (आण्णा) कांदे, मा. खासदार हेमंत (आप्पा) गोडसे तसेच सहसंपर्क प्रमुख राजु (आण्णा) लवटे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

प्रभाग क्रमांक २४ मधील हा नवनिर्मित सभामंडप परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक रहिवाशांना विविध कार्यक्रम, सभा, समारंभ आणि सामुदायिक उपक्रम आयोजित करण्यासाठी आता या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

"नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रभाग २४ मधील सभामंडप हे याच प्रयत्नांचे फलित आहे. येथील रहिवाशांना होणाऱ्या सोयीसाठी हा सभामंडप उभारण्यात आला असून, त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा अशी अपेक्षा आहे," असे उद्गार प्रविण (बंटी) तिदमे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

सभामंडपाच्या निर्मितीमुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः विविध सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस समारंभ, सार्वजनिक सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी योग्य जागेचा अभाव भासत होता, तो आता दूर झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या सभामंडपाच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या विकास कामामुळे प्रभाग २४ मधील समाजजीवनाला नवी दिशा मिळणार असून, विविध सार्वजनिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. महानगरपालिकेच्या सहकार्याने या सभामंडपाचे व्यवस्थापन केले जाणार असून, परिसरातील नागरिकांना वाजवी दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रविण (बंटी) सावळीराम तिदमे
शिवसेना महानगरप्रमुख नाशिक
मा.नगरसेवक, प्रभाग क्र. २४
स्थायी समिती सदस्य नाशिक महानगरपालिका
🙏🏻🏹🚩

जीवन केशरी मराठी न्यूज पोर्टल, नाशिक

शुक्रवार, १६ मे, २०२५

महावितरणची सेवा: ग्राहकांच्या असंतोषाचे कारण
महावितरणची सेवा: ग्राहकांच्या असंतोषाचे कारण
१७ मे, २०२५

महाराष्ट्रातील विद्युत वितरण क्षेत्रात प्रमुख स्थान असलेल्या महावितरण कंपनीच्या सेवांबद्दल गेल्या काही काळात ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या आगमनासह अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

प्रमुख समस्या

  • अकारण वीज खंडित: अल्प पावसातही दोन-दोन तासांपर्यंत वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत.
  • अपुरी पूर्वसूचना: पूर्वनियोजित कामांसाठी वीज खंडित करताना ग्राहकांना योग्य प्रकारे सूचित केले जात नाही.
  • दोषपूर्ण डिजिटल सेवा: महावितरणचे मोबाईल अॅप बंद असणे आणि ऑनलाइन तक्रार नोंदवूनही त्यावर कार्यवाही न होणे यासारख्या समस्यांमुळे ग्राहकांची निराशा वाढत आहे.
  • कर्मचारी वर्तन: अनेक ग्राहकांना महावितरण कर्मचार्‍यांकडून अयोग्य उत्तरे व निर्लक्ष वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.
"थोड्याशा पावसाने दोन-दोन तास विद्युत पुरवठा खंडित होतो. ऑनलाईन तक्रार करून उपयोग नाही. महावितरणचे एॅप बंद आहे. पण कराची वाढ मात्र नियमित केली जाते."

ग्राहकांची मागणी

ग्राहकांची प्रमुख मागणी आहे की महावितरणने आपल्या सेवांमध्ये तात्काळ सुधारणा करावी. विशेषतः:

  • पावसाळ्यापूर्वी पूर्वनियोजित कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत.
  • वीज पुरवठा खंडित होण्याआधी स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मीडिया आणि मोबाईल संदेशांद्वारे ग्राहकांना पूर्वसूचना द्यावी.
  • आपत्कालीन परिस्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याबाबत ग्राहकांना तत्काळ माहिती द्यावी.
  • ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करावी.

विरोधाभास

ग्राहकांकडून वारंवार तक्रारी येत असतानाही महावितरणने विद्युत दरांमध्ये वाढ केली आहे. मात्र, सेवेच्या दर्जात मात्र कोणतीही सुधारणा झालेली नाही. विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वीज पुरवठ्याच्या समस्या अधिक तीव्र होतात, यासाठी पूर्वनियोजन आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

"कोणत्याही हवामानात, मग ते उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा वादळी वारे असोत, महावितरणचा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अत्यधिक आहे."

अशा परिस्थितीत, दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. नागरिकांची मागणी आहे की, "पूर्व नियोजित काम असल्यास त्या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रातून, सोशल माध्यमे तसेच ग्राहकांच्या मोबाईल नंबर वर संदेश जाणे गरजेचेच."

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर अन्याय? - बँकांची मनमानी थांबवा!

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर अन्याय? - बँकांची मनमानी थांबवा!

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांवर अन्याय? - बँकांची मनमानी थांबवा!

दिनांक : १७ मे २०२५

बँकिंग मनमानी आणि विद्यार्थी

अनेक विद्यार्थ्यांचे स्वतःचे Minor Bank Account असून ते त्या खात्याचे स्वतः ऑपरेटर आहेत. मात्र, KYC प्रक्रियेच्या वेळी पॅनकार्ड असणे बंधनकारक नसतानाही बँका त्याची सक्ती करतात.

इतकंच नव्हे तर Zero Balance Account असतानाही ₹५०० ते ₹१००० इतकी रक्कम खात्यात जमा करण्यासाठी जबरदस्ती केली जाते.

या प्रकारात State Bank Of India, Bank Of India (Main Road Branch, Nashik) यांसारख्या राष्ट्रीयकृत बँकांविरोधात नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या जात आहेत.

प्रामुख्याने तक्रारींचा आढावा घेतला असता पुढील बाबी स्पष्ट दिसून येतात :

  • सेवा देण्यास उशीर करणे, रांगेत उभे ठेवणे
  • निरर्थक सेवा शुल्क आकारणे
  • कर्मचार्‍यांचे उद्धट वर्तन
  • निकृष्ट दर्जाची ऑनलाईन सेवा
  • लंच ब्रेकमध्ये संपूर्ण शाखा बंद करणे

या सगळ्या गोष्टींमुळे नागरिकांचा मनस्ताप वाढत आहे आणि डिजिटल इंडिया संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. RBI व ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

नागरिकांनी https://cms.rbi.org.in या अधिकृत तक्रार पोर्टलवर आपली तक्रार नोंदवावी. तसेच बँकिंग व्यवस्थेतील हा अन्याय उजेडात आणण्यासाठी स्थानिक माध्यमे, सोशल मीडिया आणि ग्राहक संघटनांच्या माध्यमातून आवाज उठवणं आज काळाची गरज आहे.

गुरुवार, १ मे, २०२५

कामगार दिन विशेष कार्यक्रम

कामगार दिनानिमित्त लाडू वाटप व शासकीय योजना माहिती कार्यक्रम

कार्यक्रमाचे दृश्य
बिटको नाक्यावर आयोजित कामगार दिन कार्यक्रमात सहभागी नागरिक

महाराष्ट्र दिनआंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने बिटको कामगार नाका, नाशिक येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन (टी.यू.सी.आय. महाराष्ट्र)अत्याचार विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी नाका व बांधकाम कामगारांना लाडू वाटप करून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले.

यावेळी लहुजी कामगार युनियनचे नेते बागुल, अ‍ॅड. राहुल तुपलोढे, डॉ. भारत कारिया, किरण नितनावरे, रोहिणी जाधवअ‍ॅड. निलेश सोनवणे (अध्यक्ष, टी.यू.सी.आय. महाराष्ट्र) यांची उपस्थिती होती.

कामगारांनी त्यांच्या समस्या मांडल्या व त्यावर उपाय शोधण्यासाठी टी.यू.सी.आय. महाराष्ट्र प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अ‍ॅड. राहुल तुपलोढे यांनी कामगारांच्या प्रश्नांवर गंभीरतेने विचार करत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका रोहिणी जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कामगार दिनानिमित्त लाडू वाटप व माहिती कार्यक्रम

कामगार दिनानिमित्त लाडू वाटप व माहिती कार्यक्रम

आज १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनआंतरराष्ट्रीय कामगार दिननिमित्त अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, नाशिकअत्याचार विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिटको कामगार नाका, नाशिक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नाका व बांधकाम कामगारांना लाडू वाटप करण्यात आले, तसेच शासकीय योजनांची माहिती दिली गेली. यावेळी कामगार दिनाचे व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले.

उपस्थित मान्यवर

कार्यक्रम प्रसंगी लहुजी कामगार युनियनचे नेते बागुल, अ‍ॅड. राहुल तुपलोढे, डॉ. भारत कारिया, किरण नितनावरे, रोहिणी जाधव, आणि अ‍ॅड. निलेश सोनवणे (अध्यक्ष, टीयूसीआय महाराष्ट्र) यांची उपस्थिती लाभली.

कामगारांचे प्रश्न व आश्वासने

कामगारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. टीयूसीआय महाराष्ट्र तर्फे या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक अ‍ॅड. राहुल तुपलोढे यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका रोहिणी जाधव मॅडम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

निकाल 2025: बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट | महाराष्ट्र बोर्ड

निकाल 2025: बारावी- दहावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

निकाल प्रतीक चित्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा २०२५ यंदा नियोजित वेळेपेक्षा १० दिवस आधी घेण्यात आल्या. त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

त्यांच्या मते, गुणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल ५ मे ते ७ मे दरम्यान, तर दहावीचा निकाल १५ मे ते १८ मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

बोर्डाने सांगितले की, निकाल वेळेआधी घोषित करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी अधिक वेळ मिळावा, हा उद्देश आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण होणार नाही याची खात्री देण्यात आली आहे.

शासनाच्या सूचना:

  • प्रवेशासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी वेळेआधीच अर्ज करा.ऐनवेळी धावपळ होणार नाही याची काळजी घ्या
  • दिशाभूल होणार नाही याची खबरदारी घ्या. कोणत्याही खाजगी संस्थेच्या अमिषाला बळी पडू नका.
  • शाळा व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे गरजेचे आहे.

शिक्षण सुधारणा मागण्यांसाठी निवेदन | जीवन केशरी मराठी जीवन केशरी मराठी ...