नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला यश आले आहे. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर, शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे प्रभाग २४ मध्ये सभामंडप निर्मितीचे काम पूर्णत्वास आले आहे. हा सभामंडप आता परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाला आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब, शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते विजय (आप्पा) करंजकर, आमदार सुहास (आण्णा) कांदे, मा. खासदार हेमंत (आप्पा) गोडसे तसेच सहसंपर्क प्रमुख राजु (आण्णा) लवटे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील हा नवनिर्मित सभामंडप परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक रहिवाशांना विविध कार्यक्रम, सभा, समारंभ आणि सामुदायिक उपक्रम आयोजित करण्यासाठी आता या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
"नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. प्रभाग २४ मधील सभामंडप हे याच प्रयत्नांचे फलित आहे. येथील रहिवाशांना होणाऱ्या सोयीसाठी हा सभामंडप उभारण्यात आला असून, त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा अशी अपेक्षा आहे," असे उद्गार प्रविण (बंटी) तिदमे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
सभामंडपाच्या निर्मितीमुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः विविध सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस समारंभ, सार्वजनिक सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी योग्य जागेचा अभाव भासत होता, तो आता दूर झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या सभामंडपाच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या विकास कामामुळे प्रभाग २४ मधील समाजजीवनाला नवी दिशा मिळणार असून, विविध सार्वजनिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. महानगरपालिकेच्या सहकार्याने या सभामंडपाचे व्यवस्थापन केले जाणार असून, परिसरातील नागरिकांना वाजवी दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रविण (बंटी) सावळीराम तिदमे
शिवसेना महानगरप्रमुख नाशिक
मा.नगरसेवक, प्रभाग क्र. २४
स्थायी समिती सदस्य नाशिक महानगरपालिका
🙏🏻🏹🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा