कामगार दिनानिमित्त लाडू वाटप व माहिती कार्यक्रम
आज १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिननिमित्त अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, नाशिक व अत्याचार विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिटको कामगार नाका, नाशिक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात नाका व बांधकाम कामगारांना लाडू वाटप करण्यात आले, तसेच शासकीय योजनांची माहिती दिली गेली. यावेळी कामगार दिनाचे व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रम प्रसंगी लहुजी कामगार युनियनचे नेते बागुल, अॅड. राहुल तुपलोढे, डॉ. भारत कारिया, किरण नितनावरे, रोहिणी जाधव, आणि अॅड. निलेश सोनवणे (अध्यक्ष, टीयूसीआय महाराष्ट्र) यांची उपस्थिती लाभली.
कामगारांचे प्रश्न व आश्वासने
कामगारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. टीयूसीआय महाराष्ट्र तर्फे या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक अॅड. राहुल तुपलोढे यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका रोहिणी जाधव मॅडम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा