नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे करणार हॅट्रिक ?
नाशिकमध्ये गोडसे व वाजेंची लढत रंगणार !
(संग्रहित छायाचित्र ) |
नाशिक :- नाशिक लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर राजकरणातील देशाचा केंद्रस्थान बनला होता. महाविकास आघाडी कडून 48 ते 50 दिवसा अगोदरच उमेदवार जाहीर झाला होता तर महायुतीचा उमेदवार अतिशय उशिरा जाहीर झाला, यामुळे मोठ्या प्रमाणात महायुतीला फटका बसेल असं अनेकांचे मत होतं ; परंतु विद्यमान खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांचा पक्षापलीकडचे संबंध व त्यांनी या दहा वर्षांमध्ये निर्माण केलेला दांडगा जनसंपर्क याच्यामुळे त्यांना ही लढत सोपी जात असतानात दिसत आहे. त्यांचा अतिशय शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा जनतेशी अतिशय तळागाळापर्यंत नाळ जोडली गेली आहे. कोरोना काळामध्ये हेमंत गोडसे यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक देशात सहावा क्रमांक आला होता, हेच नाशिकच्या जनतेने लक्षात घेता त्यांची उमेदवारी जाहीर होताच मोठ्या मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आलं. मध्यंतरी राजाभाऊ वाजे यांनी स्वतः मागच्या पंचवार्षिक निवडणुकी वेळी खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी 50% पेक्षा जास्त निधी हा सिन्नरमध्ये दिल्याचं कबुली दिल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राजाभाऊ वाजेंच होम ग्राऊंड मानल जाणाऱ्या सिन्नरमध्ये गोडसे यांनी सिन्नरमध्ये भरघोस निधी वाटप केल्यामुळे त्यांना सिन्नर मध्ये सुद्धा महाप्रचंड असा प्रतिसाद भेटत आहे.
महाराष्ट्र राज्यातील पहिली तर देशातील तिसरी टेस्टिंग लॅब , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 26000 परिवारांसाठी म्हणजेच एक लाख सहा हजारहून अधिक नाशिककरांसाठी त्यांनी सीजीएचएस सेंटर बांधले, कसंशील मला जाणाऱ्या नाशिक मध्ये यूपीएससी, एमपीएससी आणि नीट चे सेंटर नव्हते ते त्यांनी नाशिकमध्ये आणले, ९ वर्षापासून बंद पडलेल्या नाशिक साखर कारखाना त्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू करून 16000 शेतकऱ्यांना त्यांनी नवसंजीवनी दिली, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे चाक निर्मिती कारखान्याला त्यांनी गती दिली, मधील वाहतूक कोंडी आणि अपघात थांबवण्यासाठी जत्रा हॉटेल ते केके वाघ पर्यंतचा उड्डाणपूल बांधून तो कार्यान्वित देखील केला, पतीचे शेकडो कामांचा कार्य अहवाल त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे त्यांचं पारडं जड दिसत आहे. ताई येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाचा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये चालू असलेल्या रणधुमाळी अंतिम निर्णय काय लागतो ते बघणं रोमांचक ठरणार आहे.