मौजे सुकेणे विद्यालयात होळी व धुळवड साजरी
मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव व आदर्श शिशु विहार च्या विद्यार्थ्यांकडून होळी व धुळवड साजरी करण्यात आली त्याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी |
मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव व आदर्श शिशु विहार च्या विद्यार्थ्यांकडून होळी व धुळवड साजरी करण्यात आली त्याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी |
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २४- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने त्यांना अभिवादन करून शहीद दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते भगतसिंग,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांच्या हस्ते राजगुरू व पर्यवेक्षक नितीन भामरे यांच्या हस्ते सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थिनी सिद्धी वडघुले हिने मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दवंगे यांनी शहीद दिन साजरा करण्यामागचा हेतू,भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांचे कार्य विशद केले सूत्रसंचालन रामेश्वर धोंगडे यांनी तर आभार बाळासाहेब गडाख यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते
मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनाप्रसंगी प्राचार्य दवंगे, सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच अनुपमा जाधव व आदी |
कसबे सुकेणे ता २७- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज विद्यालयात वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती मराठी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे व मराठी विषय समितीच्या सदस्य शिक्षकांच्या हस्ते शिरवाडकारांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या वतीने कु इच्छा काळे व कु आयुश गुरगुडे याने तर शिक्षकांमधून श्री बाळासाहेब निफाडे यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली मराठी दिनाच्या औचित्य साधून विद्यालयात मराठी गीत, मराठी नाटिका व प्रांजल जाधव हिने पोवाडा सादर केला कवी शिक्षक मुकुंद ताकाटे यांनी स्वयं लिखित कविता सादर केल्या सूत्रसंचालन कु सिद्धी वडघुले व अनन्य विधाते यांनी तर आभार कु सृष्टी हळदे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
घराला लागलेल्या आगीवर वेळेत नियंत्रण: मोठा अनर्थ टळला नाशिक, ७ जानेवारी २०२५ - काकड बाग, मोरे मळा येथील विकास देवरे यांच्या घरात दि. ४ जान...