Join The WhatsApp group
रविवार, ३ मार्च, २०२४
मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४
मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे:- ॲड. नितीन ठाकरे
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे व योग्य व्यासपीठ मिळणे हे गरजेचे आहे. |
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४
पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप मध्ये नाशिक च्या खेळाडूंचे वर्चस्व
नाशिक :- पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन ने दि.18व 19 फेब्रुवारी 2024 रोजी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक च्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
मा. इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, यांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुले व मुलीं साठी घेण्यात आल्या.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, आमदार मा.श्री. बालाजी कल्याणकर ( नांदेड), तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 3 रौप्य, 8 कांस्य पदक नासिक संघाने प्राप्त केले आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. या खेळाडूंना श्री. नागेश बनसोडे( नाशिक पिंच्याक सिल्याट असोसिएशन सचिव) यांनी मार्गदर्शन केले.
विजयी खेळाडूंची नावे
इंद्रा बनसोडे याने 3-6 वयोगटात टेंडिंग या प्रकारात (रौप्य)पदक मिळवले व पर्व उबाळे ने (रौप्य) पदक मिळवले तसेच निधीश मुंबरकर ने (कास्य) पदक मिळवले.10-11 या वयोगटात अर्णव विधाते (कास्य), अथर्व बर्वे ( कास्य) , आरोही छडीदार ( कास्य),सिद्धी लुनावत ( कास्य), ऋषिका कुल्हारे ( कास्य) पदक मिळवले. 12-13 या वयोगटात विराज कवडे याने (कास्य) , गणेश खंडेराव याने ( कास्य) , पदक मिळवले .14-16 या वयोगटात समीक्षा देहाड ( रौप्य) पदक मिळवले. तसेच आर्यन सुर्वे, चेतन पवार,प्रसाद पाटील, ओंकार पाटील,कीर्ती पाटील, अंजली राजपूत,प्रतीक्षा नगुलकर, नितीन नगुलकर आदी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे. या खेळाला 'युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार', 'भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो.
या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.
सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४
मराठी राजभाषा दिनानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
नाशिक:- जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे १३,००० पेक्षा अधिक सदस्यांची पुर्ती झाली आहे. ह्या निमित्ताने व त्याल्या दुग्धशर्करा योगाची साथ मिळाली आहे अर्थातच मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल तर्फे नाशिक शहरातील इ. ५ वी ते १० वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. निबंधाचे फोटो व वक्तृत्वाचे व्हिडिओ हे व्हाटस्अपद्वारे आयोजकांकडे पाठवायचे आहेत. स्पर्धेची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2024 असणार आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या विचारांना योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा संपूर्णतः मोफत असणार आहे. वक्तृत्वाचे व्हिडिओ हे जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलवर प्रसारीत करण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे संचालक प्रसाद भालेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क मो. ९५२९१९५६८८ .
निबंध स्पर्धेचे विषय:-
१) मी मुख्यमंत्री झाले / झालो तर..
२) मी महाराष्ट्राची लोकशाही बोलतेय..
३) मोबाईल एक व्यसन...!
४) शिवरायांचे आदर्शवादी विचार
५) स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भारतासाठीचे योगदान
वक्तृत्व स्पर्धेचे विषय :-
१) शेतकऱ्याने शेती करणे थांबवले तर...
२) ...हा आहे आमचा खरा मराठी युवक
३) शिक्षणाचा व्यापार करू नका साहेब...
४) अयोध्येत श्रीराम मंदिर झाले पण मग महाराष्ट्रातले किल्ले कधी घडविणार ?
निबंध हा कमीतकमी ५०० शब्दांचा असावा. निबंध हा आपल्या हस्ताक्षरात लिहिलेला असावा.
वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ तयार करावा. व्हिडिओचा कालावधी हा ५ ते ७ मिनिटांचा असावा. विद्यार्थ्यांने व्हिडिओ हा शालेय गणवेशात करावा
आपला निबंधाचा फोटो किंवा वकृत्वाचा व्हिडिओ पाठवतांना त्यासोबत आपली सर्व माहिती सुध्दा देणे अपेक्षित आहे. वकृत्वाचा व्हिडिओमध्ये आपली स्वतःची ओळख देणे.
शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४
मौजे सुकेणे विद्यालयात परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन
कसबे सुकेणे ता १ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड येथे थेट प्रक्षेपण करण्यात आले इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखविण्यात आला.या कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. जीवनात स्पर्धा नसतील, तर जीवन प्रेरणाहीन होईल, परंतु स्पर्धा निकोप असावी, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला प्राचार्य रायभान दवंगे यांनी पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम दाखवण्यामागचा हेतू विशद करत या कार्यक्रमापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले याप्रसंगी उपमुख्याध्यापक आणि परदेशी पर्यवेक्षक नितीन भामरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विज्ञान शिक्षक निलेश ठाकरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मौजे सुकेणे महाविद्यालयात डेज उत्साहात साजरे
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालयात विविध डेज मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साडी डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे, फिश पोंड, स्पोर्ट डे त्यात स्लो सायकल, चमचा लिंबू, रनिंग, संगीत खुर्ची, काव्यवाचन, नृत्य, एकांकिका, एकपात्री प्रयोग असे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या डेज मध्ये सहभाग घेऊन आनंद साजरा केला या डेज मध्ये विविध स्पर्धा घेण्यात येऊन या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे,उपप्राचार्य अनिल परदेशी, ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे,विज्ञान प्रमुख प्रा शुभांगी गांगुर्डे,सचिन भंडारे, दिनकर रसाळ,ज्ञानेश्वर वाघ, सुनील आहेर,विजय मोगल, महेश निकम,माहेश्वरी मत्सागर, पूजा बोराडे,कल्पना गीते,श्रीम कदम,चिंधू गांगुर्डे आदीसह सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
जनता विद्यालयाचा शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेचा निकाल १००%
नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथील विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासन संचलित कलासंचलनालय, मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजेट स्पर्धेचा निकाल हा १००% लागला आहे. स्पर्धेत सहभागी व सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका एम. एस . डोखळे, जेष्ठ शिक्षिका के.एस.आगळे , एम.एस. पिंगळे व कलाशिक्षक गायखे एस.एम ह्यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.
STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ
STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...
-
नाशिक महानगरपालिकेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा कोट्यवधींचा घोटाळा उघड प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि राजकीय ...
-
नाशिक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून ह्याची नोंदणी जागोजागी हो...
-
मौजे सुकेणे येथे ३३ वर्षांनंतर भरला गुरुजनांसह दहावीचा वर्ग थोरात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मेळावा : हृदयस्पर्शी कार्यक्रमात जागवल्य...