Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

 मराठी राजभाषा दिनानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन





नाशिक:- जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे १३,००० पेक्षा अधिक सदस्यांची पुर्ती झाली आहे. ह्या निमित्ताने व त्याल्या दुग्धशर्करा योगाची साथ मिळाली आहे अर्थातच मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेल तर्फे नाशिक शहरातील इ. ५ वी ते १० वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. निबंधाचे फोटो व वक्तृत्वाचे व्हिडिओ हे व्हाटस्अपद्वारे आयोजकांकडे पाठवायचे आहेत. स्पर्धेची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2024 असणार आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या विचारांना योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा संपूर्णतः मोफत असणार आहे. वक्तृत्वाचे व्हिडिओ हे जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलवर प्रसारीत करण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे संचालक प्रसाद भालेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क मो. ९५२९१९५६८८ . 


निबंध स्पर्धेचे विषय:-

१) मी मुख्यमंत्री झाले / झालो तर.. 

२) मी महाराष्ट्राची लोकशाही बोलतेय..

३) मोबाईल एक व्यसन...! 

४) शिवरायांचे आदर्शवादी विचार

५) स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भारतासाठीचे योगदान


वक्तृत्व स्पर्धेचे विषय :-

१) शेतकऱ्याने शेती करणे थांबवले तर...

२) ...हा आहे आमचा खरा मराठी युवक

३) शिक्षणाचा व्यापार करू नका साहेब...

४) अयोध्येत श्रीराम मंदिर झाले पण मग महाराष्ट्रातले किल्ले कधी घडविणार ? 



निबंध हा कमीतकमी ५०० शब्दांचा असावा. निबंध हा आपल्या हस्ताक्षरात लिहिलेला असावा.


वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ तयार करावा. व्हिडिओचा कालावधी हा ५ ते ७ मिनिटांचा असावा. विद्यार्थ्यांने व्हिडिओ हा शालेय गणवेशात करावा


आपला निबंधाचा फोटो किंवा‌ वकृत्वाचा व्हिडिओ पाठवतांना त्यासोबत आपली सर्व माहिती सुध्दा देणे अपेक्षित आहे. वकृत्वाचा व्हिडिओमध्ये आपली स्वतःची ओळख देणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी ...