Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

पहिल्या ऑल इंडिया  पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप मध्ये नाशिक च्या  खेळाडूंचे वर्चस्व



 नाशिक :- पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन  ने दि.18व 19 फेब्रुवारी 2024 रोजी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक च्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले‌.


 मा. इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले,  यांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुले व मुलीं साठी घेण्यात आल्या. 

स्पर्धेचा बक्षीस समारंभ  इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, आमदार मा.श्री. बालाजी कल्याणकर ( नांदेड), तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 3 रौप्य, 8 कांस्य पदक नासिक संघाने प्राप्त  केले आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे  कौतुक केले. या खेळाडूंना श्री. नागेश बनसोडे( नाशिक पिंच्याक सिल्याट असोसिएशन सचिव) यांनी मार्गदर्शन केले.

विजयी खेळाडूंची नावे

इंद्रा बनसोडे याने 3-6 वयोगटात टेंडिंग या प्रकारात (रौप्य)पदक मिळवले व   पर्व उबाळे ने (रौप्य) पदक मिळवले तसेच निधीश मुंबरकर ने (कास्य) पदक मिळवले.10-11 या वयोगटात अर्णव विधाते (कास्य), अथर्व बर्वे ( कास्य) , आरोही छडीदार ( कास्य),सिद्धी लुनावत ( कास्य), ऋषिका कुल्हारे ( कास्य) पदक मिळवले.     12-13 या वयोगटात  विराज कवडे याने (कास्य) ,  गणेश खंडेराव याने ( कास्य) , पदक मिळवले .14-16 या वयोगटात  समीक्षा देहाड ( रौप्य) पदक मिळवले. तसेच आर्यन सुर्वे, चेतन पवार,प्रसाद पाटील, ओंकार पाटील,कीर्ती पाटील, अंजली राजपूत,प्रतीक्षा नगुलकर, नितीन नगुलकर आदी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.

पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश  केला आहे. या खेळाला 'युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार', 'भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक  काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय  विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. 


या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...