मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे:- ॲड. नितीन ठाकरे
नाशिक:- मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे प्रमुख प्रसाद भालेकर ह्यांच्या वतीने नाशिक शहरात घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. नाशिक शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेस संपूर्ण शहरातून उदंड प्रतिसाद लाभला . वक्तृत्व व निबंध स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
१) तेजल नंदकुमार निकम - प्रथम क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
२) ओमकार सुरज देवरे - द्वितीय क्रमांक
पेठे विद्यालय, नाशिक
३) कनक अजयकुमार गुप्ता - तृतीय क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
४) उत्तेजनार्थ क्रमांक:- श्रेया दिवाकर इंगळे
जनता विद्यालय गोरेराम लेन, नाशिक
निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
१) रोहिणी प्रविण गांगुर्डे - प्रथम क्रमांक
जनता विद्यालय, पवननगर, सिडको
२) संकेत सुनील नागरे - पुरषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक
३) प्रतिक्षा गोरखनाथ बागुल - जनता विद्यालय, पवननगर, नाशिक
४) गौरी संतोष नारखेडे - उत्तेजनार्थ क्रमांक
होरायझन इंग्लिश स्कूल, नाशिक
स्पर्धेच्या आयोजनाचा मुलभूत हेतू हा विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य व्यासपीठ मिळावे हाच होता. स्पर्धा हि ऑनलाईन पद्धतीने पार पडली. विजेत्यांचे सन्मानपत्र+ बक्षीस हे त्यांच्या शाळेत पोहचविण्यात येणार आहे. सन्मानपत्राद्वारे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, नाशिक पूर्व विधानसभाचे आमदार ॲड. राहुल ढिकले, दै.भ्रमरचे संपादक श्री. चंदुलाल शहा , मराठा समाज ‘सय’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे ह्या मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या आयोजनात आदित्य रिकामे, ओम क्षिरसागर, ओमकार कुटे ह्यांचे सहकार्य मिळाले.
प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे व योग्य व्यासपीठ मिळणे हे गरजेचे आहे. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा