Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

 मविप्र मॅरेथॉन २०२४ चा विजेता ठरला उत्तरप्रदेश अक्षय कुमार ! 




नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी दि.२८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ८ व्या राष्ट्रीय व १३ व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२४ स्पर्धेचे विजेतेपद उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमार याने पटकावले. अक्षय ने २ तास २६ मिनिटे १ सेकंद वेळेत स्पर्धा पूर्ण केली. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह कायम होता.१४ गटात झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग नोंदविला.४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धेची सुरवात झाली. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू मीर रंजन नेगी, मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,केंद्रीय आरोग्यमंत्री खा.भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल,संचालक डॉ सयाजीराव गायकवाड,ॲड.लक्ष्मण लांडगे,रमेश पिंगळे,ॲड.आर के बच्छाव,ॲड.संदीप गुळवे,शिवाजी गडाख,प्रविण जाधव,विजेंद्रसिंग, सेवक संचालक डॉ एस के शिंदे,जगन्नाथ निंबाळकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात करण्यात आली. 

पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावतांना अक्षय कुमार याने २ तास २६ मिनिटे १ सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेसाठी भारतातून उत्तर प्रदेश,पंजाब,हरियाणा,मेघालय तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण ३००० च्या वर स्पर्धक सहभागी झाले होते.

     बक्षिस वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाला, यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात मविप्र मॅरेथॉन ही सर्वांच्या समन्वयाने निर्विघ्न पार पडली मॅरेथॉन मुळे नाशिक मध्ये एक चांगले वातावरण तयार झाले यामुळे भविष्यात चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त केला.
मॅरेथॉन संयोजन समिती अध्यक्ष व मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी यावेळी बोलतांना ' मविप्र मॅरेथॉन स्स्स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अत्यंत सुक्ष्म व काटेकोर नियोजन केलेले होते. धावनंमार्ग मापनापासून ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने आपली जबाबदारी सक्षमपणे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याकरीता प्रयत्न करू. संस्थेच्या माध्यमातून स्पोर्ट्स अकॅडमी उभारण्याचा देखील प्रयत्न असून त्यासाठी मीर रंजन नेगी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊ असे सांगून संस्थेच्या माध्यमातून ७५ हजार पुस्तकांच्या सहाय्याने विश्वविक्रमी शिवप्रतिमा ,सांस्कृतिक महोत्सव,मविप्र पत्रिका असे अनेक दर्जेदार उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मीर रंजन नेगी यांनी भेट दिलेली त्यांची स्वाक्षरी असलेली हॉकी अमुल्य भेट असल्याचे त्यांनी नमूद केले. 

      ऑलिम्पिक खेळाडू मीर रंजन नेगी यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ' खेळ आपल्याला जीवनात कसे मार्गक्रमण करावे हे शिकवितो. खेळाप्रमाणे जीवनात चढउतार येतात, परंतु प्रत्येकाने न डगमगता अंतिम धेय्य गाठावे असे प्रतिपादन केले. मविप्र संस्थेने अतिशय शिस्तबद्धपणे मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन केले असून मविप्र मॅरेथॉन येणाऱ्या काळात नाशिक व जगाची ओळख व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मविप्र स्पोर्ट्स अकॅडमी साठी आपण विनामोबदला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी आपल्या खेळ जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देत आठवणी जागविल्या.  

     अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांनी ' खेळ व आरोग्याच्या दृष्टीने मविप्र मॅरेथॉन स्पर्धा महत्वाची भूमिका बजावत असून निवास,भोजन व सर्व आरोग्य सुविधा पुरविणारी व खेळाडूंचा मोठा सहभाग असणारी महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळ परदेशात लोकप्रिय केला तर नेगी यांच्यावर चित्रित चक दे इंडिया सिनेमामुळे हॉकी सर्वांना माहित झाला असे सांगून हॉकी क्रिकेट च्या बरोबरीने लोकप्रिय होण्यात नेगी यांचे मोठे योगदान असल्याचे डॉ ढिकले यांनी सांगितले.  

   यावेळी विविध १४ गटातील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एकूण ७,१६,००० रुपये रकमेची बक्षिसे देण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात सर्वोच्च सहभागाबद्दलचे प्रथम पारितोषिक कर्मवीर ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांना तर द्वितीय पारितोषिक के टी एच एम महाविद्यालयास व तृतीय पारितोषिक कर्मवीर गणपतदादा मोरे निफाड महाविद्यालयास देण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.आर डी दरेकर यांनी करून दिला. स्पर्धा निरीक्षक म्हणून वैजनाथ काळे व संदीप फुगट यांनी काम पहिले. प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी मीर रंजन नेगी यांचा व स्पर्धा संयोजक प्रा.हेमंत पाटील यांनी स्पर्धा निरीक्षक यांचा परिचय करून दिला. या वर्षीचा क्रीडा पत्रकार पुरस्कार मुंबई येथील क्रीडा पत्रकार प्रशांत केणी यांना प्रदान करण्यात आला. सूत्रसंचलन डॉ तुषार पाटील यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी मानले.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. तर रावसाहेब थोरात सभागृह परीसरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने रंगत वाढवली होती. स्पर्धा यशस्वितेसाठी शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव,डॉ भास्कर ढोके,डॉ विलास देशमुख, डॉ डी डी लोखंडे,डॉ अजित मोरे,प्रा दौलत जाधव,प्रा बी डी पाटील, सोपान जाधव,डॉ.मीनाक्षी गवळी,लहानू कांदळकर,सुनील आहेर, बाळासाहेब शिंदे, के.पी.लवांड, डॉ.ज्ञानेश्वर गडाख, विक्रांत राजोळे,नामदेव काकड, राजेंद्र पोटे,मंगला शिंदे,निर्मला चौधरी,सुहास खर्डे यांनी प्रयत्न केले.

 

गटनिहाय प्रथम क्रमांकाचे विजेते - 

४१ किमी - अक्षय कुमार - उत्तर प्रदेश
२१ किमी - रिंकू सिंग - उत्तर प्रदेश
१० किमी महिला खुला वर्ग - बसंती हेमब्रोम - नाशिक
१० किमी पुरुष खुला गट - दयानंद चौधरी - हर्सूल- नाशिक १२ किमी - २५ वर्षाआतील मुले - अतुल बर्डे - देवळाली कॅम्प
१० किमी - १९ वर्षाआतील मुले - देविदास गायकवाड - दिंडोरी
५ किमी - १७ वर्षाआतील मुले - प्रविण चौधरी - नाशिक
५ किमी - १९ वर्षाआतील मुली - रिंकू चौधरी - नाशिक
४ किमी - १४ वर्षाआतील मुले - चैतन्य श्रीखंडे - झेडपी स्कूल,मोहरा
४ किमी - १७ वर्षाआतील मुली - वंदना तुंबडे - नाशिक
३ किमी - १४ वर्षाआतील मुली - रुपाली सोनवणे - येवला
६ किमी - २५ वर्षाआतील मुली - आरती पावरा - धुळे
४ किमी - ६० वर्षावरील पुरुष - केशव मोटे
५ किमी - ३५ वर्षावरील महिला - अश्विनी देवरे - नाशिक


सोमवार, २९ जानेवारी, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा 



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २७ मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी अभिनव कमिटीचे अध्यक्ष मोतीराम जाधव होते सुरुवातीला राष्ट्रीय ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण मविप्र संस्थेचे उपसभापती मा श्री डी बी अण्णा मोगल यांच्या शुभहस्ते तर स्काऊट गाईड ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री अतुल भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्काऊट गाईड पथकाने संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष कामगिरी करणारे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लेझीम पथक प्रात्यक्षिक ,तिरंगा कवायत व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचा हेतू विशद करत अतिथींचे स्वागत केले यावेळी प्रशांत रावसाहेब मोगल यांनी शाळेला ११०००/- रुपये भेट तर संग्राम मोगल यांनी ५०००/-रुपये तर बाळासाहेब काळे यांनी ३०००/- रुपये भेट दिली कार्यक्रमासाठी सरपंच सुरेखा चव्हाण,उपसरपंच सचिन मोगल, रामराव मोगल, विश्वनाथ मोगल, सुभाष हळदे,विष्णू उगले, मुरलीधर मोगल, लालचंद सोनवणे, दिलीप मोगल, डॉ रवींद्र जाधव,बबन वडघुले, राजाराम भंडारे,भाऊसाहेब भंडारे बाळासाहेब काळे, रामकृष्ण बोंबले, अरुण मोगल,सोसायटी चेअरमन प्रकाश मोगल, सतीश मोगल,रावसाहेब मोगल, संग्राम मोगल, रामेश्वर काठे, दिनकर मोगल,अशोक भंडारे,श्याम मोगल,प्रकाश धुळे, चंद्रशेखर नळे आदी सह सर्व स्कूल कमिटी सदस्य,शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ, विशाखा समिती, शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यासह उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे,अभिनव मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे, सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे यांनी मानले

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

 ईव्हीएम निवडणुकीच्या विरोधात संविधान प्रेमी वकील भडकले 

संविधान प्रेमी वकील समितीच्या वतीने निदर्शने 



नाशिक :- जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत संशय असुन लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची सर्व स्तरातुन मागणी होत असतांना देखील केवळ निवडणुका जिंकण्यासाठी च ईव्हीएम चा घाट घातला जात असुन त्वरित ईव्हीएम बंद करण्यात येऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात येऊन उपजिल्हाधीकारी श्री.वाघ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संविधान प्रेमी वकील समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड,ॲड.पागिरे, ॲड.वायचळे,ॲड.राजेंद्र नन्नावरे,ॲड.लिलाधर जाधव,ॲड. मोरे साहेब,ॲड.सुधीर जाधव,ॲड.सुभाष गिते,ॲड.संदीप दंडगव्हाण,ॲड. भालेराव,ॲड.आर.एन कांबळे , अॅड . निलेश सोनवणे, लक्ष्मण सोनवणे,भारती चित्ते आदींसह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

 स्वीटी जाचकला पीएचडी प्रदान



 
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २३- मौजे सुकेणे ता निफाड येथील श्रीम शोभा मनोहर मोगल ह.मु नाशिकरोड यांची कन्या श्रीम स्वीटी गोदीराम जाचक उर्फ स्वीटी गोकुळ महाजन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये नुकतीच पीएच.डी. पदवी नाशिकच्या अग्रगण्य संदीप विद्यापीठातून प्राप्त केली. त्या सध्या गुरू गोविंदसिंग इंजिनियरिंग महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांनी डीप लर्निंग या विषयावर संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना इलाहाबाद आयआयटीतील डॉ. सयांतन नाथ आणि संदीप विद्यापीठातील संगणक विभाग प्रमुख डॉ. पवन भालदारे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिची आई शोभा मोगल(जाचक) वडील गोटीराम जाचक यांच्यासह अँड एन जी गायकवाड, मविप्र संस्थेचे माजी उपसभापती ॲड पंडितराव पिंगळे,सचिन पिंगळे,डॉ एम एन जाचक, मविप्र संस्थेचे उपसभापती देवराम मोगल, अँड  रत्नाकर गायकवाड,,सुरज जाचक,भारत मोगल,गोकुळ महाजन आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या


शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

जनता विद्यालयाला यशोन्नती ; शाळेला सुवर्ण, रौप्य , कांस्यपदकांची पर्वणी 



नाशिक:- CPS OLYMPIAD FOUNDATION तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर बाह्यपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. ह्या परीक्षेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक -१ शाळेतील एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी एकूण ३३ विद्यार्थ्यांना यशोन्नती मिळाली आहे. यामध्ये १३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, १० विद्यार्थ्यांना रौप्यपदक , १०विद्यार्थांनी कांस्यपदक मिळविले आहे आणि २४ विद्यार्थ्यांची दुसऱ्या राऊंड साठी निवड झाली आहे. या परीक्षेसाठी शाळेतील समन्वयक के.एम.चव्हाण व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एम.एस. पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

रविवार, १४ जानेवारी, २०२४

 मौजे सुकेणे येथे ३३ वर्षांनंतर भरला गुरुजनांसह दहावीचा वर्ग

 थोरात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मेळावा : हृदयस्पर्शी कार्यक्रमात जागवल्या आठवणी

१९९०/९१ बॅचच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी उपस्थित गुरुजन व माजी विद्यार्थी


कसबे सुकेणे ता ८ - मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल विद्यालयातील १९९०/१९ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा व गुरुजनांचा स्नेहमेळावा ३३ वर्षानंतर संपन्न झाला.यानिमित्त भेटलेल्या वर्गमित्रांनी शाळेतील आठवणी जागवित एकमेकांची आत्मियतेने विचारपूस केली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक प्रभाकर सूर्यवंशी होते. सरस्वतीचे पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठावर एम पी काळे,आर जी गाडे,पी ए डोकबाणे,ए वाय तिडके,ए के तिडके,बी के जाधव डी के दरेकर, बी व्ही जाधव,बी आर आवारे, एन पी महाले, बी ई महाले,एस पी कोठुळे,के बी हाडोळे,एस टी भोज,एस डी देवरे,आर एन वाघ, बी डी मालपुरे,डी पी बोरसे, एन ए रजपूत,एम पी आहेर, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, श्रीम यु डी सोनवणे,श्रीम एस पी शिंदे, श्रीम यु बी मालपुरे,श्रीम गवळी,श्रीम साठे,श्रीम सुमन जाधव,भारत मोगल,व्ही आर डेर्ल,एस पी मुळाणे आदीं उपस्थित होते. मुला-मुलींच्या हस्ते गुरुजनांचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला यावेळी भरीव निधीचा धनादेश देण्यात आला माजी विद्यार्थी भाऊसाहेब लोखंडे, राजेंद्र काळे,भरत रहाणे, संतोष कुलथे,धनराज भंडारे, कल्पना भंडारे,अर्चना मोगल व दर्शना महाजन यांनी मेळाव्याची संकल्पना मांडली.या विद्यार्थ्यांनी एकत्र येत व्हाट्सअप सुपच्या माध्यमातून मेळावाविषयी मत मांडले मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला उपस्थित सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे विशेष सहकार्य लाभले.सर्वच माजी विद्यार्थ्यांनी परिचय करून दिला तर उपस्थित गुरुजनांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या उपस्थित माजी विद्यार्थ्यांना गुरुजनांच्या हस्ते स्नेह भेटीची आठवण राहावी यासाठी ट्रॉफी देण्यात आली सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व ग्रुपच्या माध्यमातून कला, क्रीडा व सामाजिक मित्र मंडळ स्थापन करून भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा संकल्प केला भाऊसाहेब लोखंडे याने प्रास्तविक केले भारत मोगल यांनी सूत्रसंचालन केले तर धनराज भंडारे यांनी आभार मानले. स्नेह मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी भाऊसाहेब लोखंडे, धनराज भंडारे,कल्पना भंडारे (पवार),प्रमोद भालेराव,योगेश्वर सोनवणे,भारत केवडे,संतोष राहणे,सुनील पवार,शंकर ठाकरे, नामदेव घारे,अण्णासाहेब दयाळ, संजय काळे,सरिता गुरगुडे (माळोदे),प्रकाश दयाळ,वैशाली दरेकर,कमल भोई,कविता गडाख,अर्चना मोगल,राजेंद्र काळे,भाऊसाहेब भंडारे,राजेंद्र मोगल,शैलेश मोगल,भरत राहणे, महेश गांधी,दिपक देशमुख,संजय गांधी,उत्तम विधाते,योगिता भालेराव,सविता मोरे,ज्ञानेश्वर चौधरी,भाऊसाहेब कातकाडे,, रविंद्र कातकाडे,वैशाली गांधी, मोनिका गांधी,मनिषा भोज, अनिल शेवकर,विलास सानप, संगीता नळे,विश्वनाथ वसईकर, रविंद्र आळंदे,उज्वला राहणे, सोमनाथ भागवत,दिपक कुमावत,अशोक बागले,दर्शना महाजन,निवृत्ती राहणे,गोरख गुरगुडे,संगीता भंडारे,सुलक्षणा जाधव,रतन शेवकर,ज्योती आव्हाड,शिवाजी शेवकर,संजय रईसवाल,श्याम भंडारे,सोमनाथ खापरे,शरद तिडके,निवृत्ती बोडके,दिपक कडाळे,दिलीप धुमाळ,राजीव गुंजाळ,राजू पिंजारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी १९९०/९१ बॅचच्या सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष परीश्रम घेतले.


 मौजे सुकेणेची धनश्री पागेरेचे स्पर्यधा परीक्षेत यश 

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची कु धनश्री पागेरे गांधी विचार मंच परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल प्रमाणपत्र व स्वर्ण पदक स्वीकारताना


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ११- गांधी विचार संस्कार परीक्षा स्पर्धेत मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची कु धनश्री चंद्रकांत पागेरे ही जिल्हयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली तिला प्रशस्तीपत्रक व सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले सदर स्पर्धा कर्मवीर काकासाहेब वाघ कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथे पार पडल्या तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अंँड नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती डी बी अण्णा मोगल,चिटणीस दिलीप दळवी,तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख प्राचार्य रायभान दवंगे, स्कूल कमिटीचे अतुल भंडारे व मोतीराम जाधव, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक श्री भामरे आदींसह सर्व सेवक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले तिला श्रीम वंदना गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

  

राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड नजरकैदेत



 नाशिक:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमधे येत असल्याने त्यांच्या या दौर्यात राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने कांद्याची निर्यात बंदी उठवावी,शेतकर्यांना भरीव अशी मदत करावी,भिकार्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी कांद्याच्या माळा घालुन आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला होता,त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटिसा बजावून जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड,दिंडोरी तालुका अध्यक्ष गोरखनाथ धाञक,सोमनाथ काळे,महेश चव्हाण व सहकार्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.शासणाच्या या हुकूमशाही ला आम्ही घाबरत नसून आमच्यावर कारवाई करण्याऐवजी कांदा निर्यात बंदी उठवील्यास आम्ही शासणाचे स्वागतच करु!यापुढे लोकशाही वाचविण्यासाठी आंदोलने सुरूच राहतील असा इशारा देखील ॲड.सुरेश आव्हाड यांनी शासणा दिला असुन,सदरील कारवाई बाबत स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत.

  जनता विद्यालयात युवा दिन साजरा



नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे  रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन व राजमाता जिजाऊ ह्यांची जयंती साजरी करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता १० वी ब च्या वर्गाने केले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली . ह्यानंतर प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. माधुरी पिंगळे ह्यांनी केले. व व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका के.एस.आगळे होत्या. जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त तृप्ती राजगुरू यांनी गीत सादर केले. तसेच जयेश चौघुले , आर्यन जाधव यांनी पोवाडा सादर केला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने नयन गाडेकर ह्याने भाषण केले. १० वी कचा पीयुष मुर्तडक ह्याने स्वतः स्केच केलेले चित्र मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिकांना भेट स्वरूपात दिले. विद्यालयात नवनिर्वाचित शिक्षकांचे स्वागत मुख्याध्यापिकांतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का सुग्रामकर हिने केले व आभार प्रदर्शन एकता ताजणे हिने केले.

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४


पुर्वीप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी संविधानप्रेमींचे निवडणूक आयोगाकडे साकडे



नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील संविधानप्रेमीं वकिलांनी नाशिकमधील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत सरकार मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे पुर्वीप्रमाणे मत पत्रिकेच्या माध्यमातून सर्व निवडणुका घेण्याचा निर्णय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून घेण्याचे निवेदन देण्यात आले. नाशिकमधील वकील प्रतिनिधी यांनी निवेदन देतांना स्पष्ट केले की आज भारतामधील सर्व नागरिकांमध्ये EVM च्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीबाबत शंका तयार झालेली आहे. निवडणूक काळात देखील निवडणूक यंत्रणांमध्ये अनेक ठिकाणी बिघाड होतात यामुळे गोंधळ निर्माण होतात असे होऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयाने देखील निवडणूक आयोगास मार्गदर्शक सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणे करता आज देशातील सर्व नागरिक evm च्या माध्यमातून होणारी निवडणूक प्रक्रिया बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे २०२४ पासूनच्या लोकसभा निवडणुकीपासून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची मागणी ही संविधानप्रेमीं वकिलांनी केली आहे. नाशिकमधील २५० वकिलांनी आयोगाकडे हि मागणी केली असून ५ जानेवारीस हे निवेदन नाशिकमधील जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

 मौजे सुकेणे विद्यालयात जिजाऊ व विवेकानंद जयंती उत्साहात

मौजे सुकेणे विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी


कसबे सुकेणे ता १२- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक श्री भामरे व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कु सिद्धी वडघुले व कु संध्या हळदे यांनी अनुक्रमे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची ओळख करून दिली तर शिक्षकांच्या वतीने प्रा ज्ञानेश्वर वाघ व कार्यक्रमाचे अध्यक्ष रायभान दवंगे यांनीही थोर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महान व्यक्तींचे कार्य विशद करत त्यांची जयंती साजरा करण्यामागचा हेतू विशद करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अनन्या विधाते व कु जान्हवी बुरगुडे हिने तर आभार कु सानवी जाधव हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी सातवी अ चे विद्यार्थी व वर्गशिक्षिका श्रीम संगीता थोरात यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

Image By :- Prasad Bhalekar 


हमारे देश का गौरव है युवा...! 

                             :- प्रसाद भालेकर 


हमारे देश की शान है युवा ,

हमारे देश का गौरव है युवा , 

हमारे देश का भवितव्य है‌ युवा , 

अच्छे संस्कारों से भरा एक समंदर है युवा || १ || 


देश के भवितव्य के लिये , 

भारत माँ के रक्षा के लिये जान नौछावर करने वाला एक हमारा सिपाई है युवा || २ || 


मरीज कौनसा भी हो कैसा भी हो , मगर उसका हसकर स्वागत करने वाला और आनेवाले रोते हुए मरीज को हसते हुए बिदा करने वाला एक डॉक्टर युवा || ३ || 


देश की उन्नती में कंधा से कंधा मिलाने वाला है युवा

और चाँद, सुरज , तारे उनपर भारत का ध्वज लहराने वाला एक सायंटिस्ट है युवा || ४ || 


स्वामी विवेकानंद इनके विचारोंसे प्रेरणा लेकर हम आगे बढेंगे देश के सभी खिलाडी, बेहतरीन युवा कलाकाओंको, सभी युवा डॉक्टर , सायंटिस्ट और हमारे सिपाई बांधवो को युवा दिन की बहोत बहोत शुभकामनाए एवम् बधाईया...! 

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

 सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो :- नितीन ठाकरे

 
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ॲड नितीन ठाकरे, व्यासपीठावर बाळासाहेब क्षिरसागर, विश्वास मोरे, डी बी मोगल, प्राचार्य रायभान दवंगे व आदी 

कसबे सुकेणे ता ६- मविप्र संस्थेच्या माध्यमातून केंद्र व जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस   अॅड. नितीन ठाकरे यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित माध्यमिक गट केंद्रस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी उपसभापती डी बी अण्णा मोगल होते तर व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,संचालक शिवाजी पाटील गडाख,संजय अहिरराव,उपसरपंच सचिन मोगल,स्कूल कमिटी अध्यक्ष अतुल भंडारे व मोतीराम जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अॅड ठाकरे यांनी प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी व अभ्यासाबरोबरच अभ्यास पूरक उपक्रम राबवावे व शिक्षकांनी आधुनिक काळात अपडेट व्हावे असे मत मांडले प्रास्ताविक प्राचार्य रायभान दवंगे यांनी केले यावेळी सांस्कृतिक महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपसभापती डी बी अण्णा मोगल, संचालक शिवाजी आप्पा गडाख यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके व दौलत जाधव,उपसरपंच सचिन मोगल,मोतीराम जाधव,अतुल भंडारे,दिलीप मोगल रामराव मोगल,विष्णुपंत उगले, सुभाषराव हळदे, शाम मोगल, योगेश मोगल, लालु सोनवणे,भाऊराज उगले, माधवराव भंडारे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षक श्री भामरे आदी उपस्थित होते परीक्षक म्हणून डॉ दत्तात्रय गोडगे व श्रीम प्रियांका बोचरे यांनी काम पाहिले स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे वैयक्तिक वादन प्रथम मौजे सुकेणे, द्वितीय शिरवाडे वणी, तृतीय पिंपळगाव व उत्तेजनार्थ होरायझन पिंपळगाव व आहेरगाव,समूहगीत स्पर्धा प्रथम कुंदेवाडी, द्वितीय होरायझन पिंपळगाव,तृतीय होरायझन ओझर ,उत्तेजनार्थ नांदुर्डी व आहेरगाव ,वैयक्तिक गीत गायन स्पर्धा प्रथम ओझर, द्वितीय आहेरगाव, तृतीय कुंदेवाडी, उत्तेजनार्थ पिंपळगाव व शिरवाडे वणी तर समूहनृत्य प्रकारात प्रथम ओझर, द्वितीय शिरसगाव, तृतीय निफाड व उत्तेजनार्थ पिंपळगाव व कारसूळ विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे व सोमनाथ मत्सागर यांनी तर आभार श्रीम सुवर्णा ठाकरे व राजेंद्र धनवटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कमिटी प्रमुख रामेश्वर धोंगडे व सर्व सेवकांनी व स्काऊट विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले

 

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात 

 वैयक्तिक गायन व समूह नृत्यात अभिनव ओझर प्रथम

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात मविप्र सांस्कृतिक स्पर्धे प्रसंगी पारितोषिक वितरण करताना डी बी मोगल, शोभा बोरस्ते,भागवत बोरस्ते,प्राचार्य रायभान दवंगे व आदी तर दुसऱ्या छायाचित्रात समुहनृत्य प्रकारात नृत्य करताना चिमुकले


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ४- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय प्राथमिक गट विभागाच्या सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या केंद्रस्तरीय झालेल्या या स्पर्धेत अभिनव गटातील १४ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गीत गायन व समूह नृत्य प्रकारात सहभाग नोंदवला अध्यक्षस्थानी संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, होते प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी संस्थेचा सांस्कृतिक स्पर्धा घेण्यामागचा हेतू विशद केला कार्यक्रमासाठी संस्थेच्या महिला संचालिका सौ शोभाताई बोरस्ते,निसाकाचे माजी चेअरमन भागवत बाबा बोरसते,मोतीराम जाधव,अतुल भंडारे,स्कूल कमिटी सदस्य सुभाष हाळदे,रामकृष्ण बोंबले, डॉ रवींद्र जाधव,रामराव मोगल, दिलीप मोगल,डॉ मत्सागर,विष्णू उगले,योगेश मोगल,रामकृष्ण बोंबले,उपसरपंच सचिन मोगल, सरपंच आनंदराव भंडारे,सुरेश घुगे,दिनकर बोडके,अशोक जाधव,भाऊराज उगले, भाऊसाहेब भंडारे,संग्राम मोगल, सरपंच सुरेखा चव्हाण,सुनिता मोगल,निकिता मोगल,अँड निर्मला अरिंगळे,सुवर्णा भंडारे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, अभिनव मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे,मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ आदींसह स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सुरुवातीला अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले अतिथीतींचा सत्कार शालेय प्रशासनाच्या वतीने करण्यात आला यावेळी भागवत बाबा बोरस्ते,कार्यक्रमाचे अध्यक्ष डी बी मोगल,परीक्षक अर्चना जाब्रस यांनी मनोगत व्यक्त केले या स्पर्धेत वैयक्तिक गीत गायनात अभिनव ओझर प्रथम,होरायझन अकॅडमी निफाड द्वितीय,अभिनव मौजे सुकेणे तृतीय,अभिनव नांदूर मध्यमेश्वर व माळसाकोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर समूह नृत्य प्रकारात अभिनव ओझर प्रथम,आदर्श पिंपळगाव द्वितीय,अभिनव नांदुर्डी तृतीय,अभिनव शिरवाडे वणी व होरायझन निफाड यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले परीक्षक म्हणून दिनकर दांडेकर व अर्चना जाब्रस यांनी काम केले आभार उपप्राचार्य अनिल परदेशी यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

  

जनता विद्यालयात सावित्रीबाई फुलेंना मानवंदना व विज्ञान प्रदर्शन





नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.डी. शिंदे होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सावित्रीबाई यांच्याबद्दल अनुष्का बघडावे हिने माहिती दिली व साक्षी आव्हाड हिने कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपिका लहामगे व आभार प्रदर्शन प्रिती देशमुख हिने केले यानंतर विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ह्यामध्ये विविध प्रयोगाची विद्यार्थ्यांनी सुसंगतरीत्या मांडणी व त्या प्रयोगामधून मानवी जीवनासाठी कशापद्धतीने सहकार्यक आहे ते मांडले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.डी.शिंदे व आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...