स्वीटी जाचकला पीएचडी प्रदान
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २३- मौजे सुकेणे ता निफाड येथील श्रीम शोभा मनोहर मोगल ह.मु नाशिकरोड यांची कन्या श्रीम स्वीटी गोदीराम जाचक उर्फ स्वीटी गोकुळ महाजन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये नुकतीच पीएच.डी. पदवी नाशिकच्या अग्रगण्य संदीप विद्यापीठातून प्राप्त केली. त्या सध्या गुरू गोविंदसिंग इंजिनियरिंग महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांनी डीप लर्निंग या विषयावर संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना इलाहाबाद आयआयटीतील डॉ. सयांतन नाथ आणि संदीप विद्यापीठातील संगणक विभाग प्रमुख डॉ. पवन भालदारे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिची आई शोभा मोगल(जाचक) वडील गोटीराम जाचक यांच्यासह अँड एन जी गायकवाड, मविप्र संस्थेचे माजी उपसभापती ॲड पंडितराव पिंगळे,सचिन पिंगळे,डॉ एम एन जाचक, मविप्र संस्थेचे उपसभापती देवराम मोगल, अँड रत्नाकर गायकवाड,,सुरज जाचक,भारत मोगल,गोकुळ महाजन आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा