पुर्वीप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी संविधानप्रेमींचे निवडणूक आयोगाकडे साकडे
नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील संविधानप्रेमीं वकिलांनी नाशिकमधील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत सरकार मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे पुर्वीप्रमाणे मत पत्रिकेच्या माध्यमातून सर्व निवडणुका घेण्याचा निर्णय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून घेण्याचे निवेदन देण्यात आले. नाशिकमधील वकील प्रतिनिधी यांनी निवेदन देतांना स्पष्ट केले की आज भारतामधील सर्व नागरिकांमध्ये EVM च्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीबाबत शंका तयार झालेली आहे. निवडणूक काळात देखील निवडणूक यंत्रणांमध्ये अनेक ठिकाणी बिघाड होतात यामुळे गोंधळ निर्माण होतात असे होऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयाने देखील निवडणूक आयोगास मार्गदर्शक सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणे करता आज देशातील सर्व नागरिक evm च्या माध्यमातून होणारी निवडणूक प्रक्रिया बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे २०२४ पासूनच्या लोकसभा निवडणुकीपासून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची मागणी ही संविधानप्रेमीं वकिलांनी केली आहे. नाशिकमधील २५० वकिलांनी आयोगाकडे हि मागणी केली असून ५ जानेवारीस हे निवेदन नाशिकमधील जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा