Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

मखमलाबाद भागात पाणीटंचाई; महापालिकेसमोर नागरीकांचे आंदोलन 



राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी महानगरपालिकेच्या समोर हंडा कळशी घेऊन व अति. आयुक्त श्री. चौधरी यांना पाण्याची बाटली देऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
       एकीकडे म.न.पा.आयुक्त गंगापुर धरण पूर्ण भरले म्हणुन जलपुजन करता व दुसरीकडे अनेकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असुन अनेकांना टॅंकर्स द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.आजही नाशिक शहरातील अनेक भाग प्रामुख्याने पंचवटी मधील मखमलाबाद रोड वरील म.न.पा.कॅालनी,मानकर मळा,स्वामीविवेकानंद नगर,उदय नगर,वडजाईमाता नगर,विद्यानगर, तांबे मळा,प्रथमेश पार्क ,सत्यदेव नगर,काकड नगर,परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकर्स द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.सदरील कमीदाबाने पाणीपुरवठा करुन केवळ कंञाटदारांना फायदा व्हावा यासाठीच क्रुञीम पाणी टंचाई भासवली जात आहे.मोठ्याप्रमाणात खर्च करुन पाण्याच्या लाईन व टाक्या बांधण्यात आल्या असल्या तरी परिसरातील पाण्याची समस्या अद्याप सुटली नसल्याने हा खर्च केवळ राजकीय नेते,कंञाटदार,अधिकारी,यांच्या फायद्यासाठीच करण्यात आल्याचे आरोप यावेळी ॲड.सुरेश आव्हाड यांनी केले असुन पाणीपुरवठा होत नसला तरी हजारो रुपये पाण्याची बिले येत असुन सदरील प्रकार हा निंदणीय असुन जो पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही,तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे पाणीबिले आकारण्यात येऊ नये.त्वरित सदरील भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 निवेदनात म्हटले आहे की,दिनांक २०/०७/२०२३ रोजी म.न.पा.प्रशासणास जाग यावी यासाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले होते,सदरील आंदोलणाची दखल घेऊन म.न.पा.मार्फत सत्यदेव नगर,काकडनगर,महादेव बाग,तांबे मळा आदी परिसरात पथदिपे बसविण्यात आली असुन अजून ही इतर भागात पथदिपे बसविण्याची गरज आहे.तसेच श्रीक्रुष्ण नगर, महादेव बाग,सत्यदेव नगर,काकड नगर, महाडा कॅालनी,मानकर मळा आदी परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे शक्य नसेल तर किमान खडीकरण तरी त्वरीत करण्यात यावे.हनुमानवाडी चौफुली,मोरेमळा चौफुली,जगझाप मार्ग कॅार्नर,क्रांतिनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढल्याने भरधाव वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढझालेली असल्याने सदरील भागात स्पिड ब्रेकर टाकण्यात यावे. मखमलाबाद रिड वरील हनुमानवाडी कॅार्नर ते जॅागींग ट्रॅक समोरील भागातील रस्त्यांची रुंदी वाढविण्यात यावी.अशी मागणी निवेदणा द्वारे करण्यात आली असुन सदरील मागण्यांचा त्वरित विचार न झाल्यास मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड, हाजि मोहिय्योद्दीन शेख,नासिर पठाण,ॲड.सुभाष गिते,भारतीताई चित्ते, भास्कर धुमाळ,बन्सिलाल भागवत,सुभाष देशमुख,अजय पाटील,अमोल काशीद,उत्तम जाधव,नितीन भडांगे,लक्ष्मण रणमाळे,अशोक शिंदे,शशिकांत पाटिल,हेमंत वाटपाडे,चंद्रकांत इंपाळ,अंतोष धाञक,रंजणा पगार,आशा काकड,संगिता भाडमुखे,सुजाता भदाणे,वैशाली अहिरे,सुरेखा रामायणे,पूजा वाढवे,रंजना दुबे,मोनिका जगताप,मनीषा चौधरी,शुचिता दिक्षित,निशा धाञक,विमल सोनवणे,भारती वाघेरे,कासुबाई जाधव,तारा निकम,मुभा पेहेरकर,रेखा सुर्यवंशी,सुषमा आंबेकर,जिजाबाई चव्हाण,कल्पणा बच्छाव आदी स्थानिक नागरीक मोठ्या संख्येणे उपस्थित होते.

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

३७ व्या नॅशनल गेम्समध्ये पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र यंदाही अव्वल स्थानी राहणार :- किशोर येवले 


नवी मुंबई : २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये युध्दकला पिंच्याक सिल्याट खेळाची स्पर्धाही संपन्न होत आहे. या खेळामध्ये एकूण २८ राज्यातील ३०४ खेळाडूंची निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल २० खेळाडूंची निवड झालेली असून, ते एकूण २३ पदकांसाठी खेळणार आहेत. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र ऑलिम्पिक  असोसिएशनच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक किशोर येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान विकास स्कूल, कोपरखैरणे येथे पार पडले.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये पिंच्याक सिलॅट खेळ प्रथमच समाविष्ट झाला आहे. कॅम्पल ग्राउंड विलेज, पणजी येथे होणाऱ्या या स्पर्धेत २० खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामध्ये धनंजय सांडूगडे (टॅडींग इव्हेंट- ४५ किलो), रामचंद्र बदक (टॅडींग इव्हेंट ४५ ते ५० किलो), कार्तिक पालवे (टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ आणि गंडा इव्हेंट), सोमनाथ सोनवणे (टॅडींग इव्हेंट ५५ ते ६० किलो), वैभव काळे (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, रेगू इव्हेंट आणि सोलोइव्हेंट), मुकेश चौधरी (टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), ओंकार अभंग (टॅडींग इव्हेंट ७० ते ७५ किलो आणि रेगु इव्हेंट), अंशुल कांबळे (टॅडींग‍ इव्हेंट ८० ते ८५ किलो आणि रेगु इव्हेंट), अनुज सरनाईक (टॅडींग इव्हेंट ८५ ते ९० किलो), पियुष शुक्ला ( टॅडींग इव्हेंट ९० ते ९५ ), धनंजय जगता टॅडींग इव्हेंट ९५ ते ११० किलो), कृष्णा पांचाळ तुंगल इव्हेंट), सचिन गर्जे (गंडा इव्हेंट), जयश्री शेट्टी (टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ किलो आणि रेग इव्हेंट), किर्णाक्षी येवले (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, तूंगल इव्हेंट आणि रेगु इव्हेंट), पौर्णिम तेली ( टॅडींग इव्हेंट ६५ ७० किलो), दीक्ष शिंदे (टॅडींग इव्हेंट ७५ ते ८० किलो), भक्ती किल्लेदार ( ८५ ते १०० किलो), रिया चव्हाण (रेगु इव्हेंट), पूर्वी गांजवे ( सोलो इव्हेंट) यांच समावेश आहे. तसेच महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून साहेबराव ओहोळ आणि प्रशिक्षक म्हणून कु. सुहास पाटील आणि कु. अभिषेक आव्हाड यांची निवड करण्यात आली. मागील १३ वर्ष महाराष्ट्र संघ पिंच्याक सिल्याट खेळामध्ये अव्वल स्थानी आहे आणि आता सुद्धा तीच कामगिरी ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाची कायम राहील, अशी माहिती 'इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन'चे अध्यक्ष किशोर येवले यांनी दिली

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

 राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती ! 

मुंबई,दि. २७ : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.


यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह देशभरातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने त्यांनी स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दीन दलित, दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरु करून करोडो मात- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही योजना राबवित असून १ एप्रिल २०२३ नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित'सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट्य असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाईन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार  दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

अंगणवाडीसेविकेंच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार-श्रीमती स्मृती इराणी


केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.


केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.



महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना संस्थात्मक प्रसुती होताना अडचणी येवू नयेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना सुरू केली आहे. याद्वारे 17 आदिवासी जिल्हे मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्व शासनाच्या योजना एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या बालकापर्यंत महिला व बाल विकास पोहोचत असून अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या माध्यमातून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

 श्री गोरेराम मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाला चिन्मय उदगीरकरची भेट


नाशिक:- नाशिकमधील रविवार कारंजा येथील सुप्रसिध्द श्री गोरेराम मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव २०२३ मध्ये दि. २१/१०/२०२३ नवरात्रीच्या सातव्या दिवशी संध्याकाळी ८:३० वा. मराठीचे सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्री. चिन्मय उदगीरकर हे‌ श्री गोरेराम मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सवात सहभागी झाले . यासोबतच त्यांच्या हस्ते देवीचा आरती सोहळा करण्यात आला. चिन्मय उदगीकर हे कलर्स मराठी वाहिनीवरील योग योगेश्वर जय शंकर मालिकेचे दिग्दर्शक आहेत. आणि त्यांनी सांगितले की माझे बालपण नाशिकमधील रविवार कारंजा येथील ग्यानोपागा लेन ( फुटाणे गल्ली) येथे पार पडलेले आहे. हे तुमचे नव्हे तर आपल्या सगळ्यांचे मंडळ आहे . यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की कोरोना काळात आम्ही सुमारे ५ ते ६ मालिकांची सुरुवात केली आणि कोणत्याही कलाकाराला यापुढे कसारा घाट ओल्यांडण्याची गरज पडणार नाही असा आमचा प्रयत्न असणार आहे. असे त्यांनी भाविकांशी बोलताना सांगितले. ते करत असलेल्या कामाचे भाविकांनी कौतुक केले. व श्री गोरेराम मित्र मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष श्री. हर्षद जाधव यांच्या हस्ते संपुर्ण गोरेराम मित्र मंडळ व गोरेराम लेन यांच्या वतीने चिन्मय उदगीरकर ह्यांचा कौतुक सोहळा  पार पडला. चिन्मय उदगीरकर यांनीसुद्धा मंडळाचे व मंडळातील कार्यकर्त्यांचे , आयोजकांचे , कार्यक्रमाचे व वेळ काढून उपस्थित असलेल्या व आपली संस्कृती जपत असलेल्या नागरीकांचे मनापासून कौतुक केले.

बांधकाम कामगारांना न्याय द्या  :- वकील.  नीलकमल सोनवणे 



नाशिक शहर व परिसरातील बांधकाम कामगारांचा  मृत्यूंमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे मृत्यू विशेषतः.  इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी कामाच्या वेळेत होतात. कारण या कामगारांच्या सुरक्षेते विषयी कोणतीही उपायोजना येथे केलेली आढळून येत नाही. तसेच या कामगारांच्या मृत्यूची नोंद ही पोलीस दप्तरी आकस्मात मृत्यू म्हणून केली जाते. या सर्व   बेकायदेशीर बाबींचा व कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी व सुरक्षिततेच्या उपायोजना प्रत्येक प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताचा मार्क्सवादी-लेनिनवादी  पक्ष(लालबावटा)यांच्या वतीने दिनांक. 11 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी नाशिक  यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी  डॉ. भारत   कारीया, अरविंद चव्हाण, किरण नितनवरे, शिवाजी पगारे, वकील बी.टी. देवरे, वकील नीलकमल सोनवणे , राहुल तुपलोंढे,उपस्थित होते.

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात 

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली त्याप्रसंगी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजन प्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १६ - मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात मिसाईल मॅन भारताचे राष्ट्रपती स्व अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थी कु समीक्षा भंडारे,कु सार्थक पागेरे, कु आयुष कातकाडे व ग्रंथपाल सोमनाथ मत्सागर यांनी अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी विद्यार्थी व शिक्षकांना माहिती करून दिली यावेळी विद्यार्थ्यांनी कलम अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचे अग्निपंख या पुस्तकाचे वाचन केले प्राचार्य रायभान दवंगे यांनी अब्दुल कलाम यांची जयंती देशभरामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून का साजरी केली जाते याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन ७ वी ब ची विद्यार्थिनी कु मेघा गांधी व कु समृद्धी गुरगुडे यांनी तर आभार तन्मय कातकाडे यांनी मानले


शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

 आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांचीच 

रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे मौजे सुकेणे विद्यालयात प्रतिपादन

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना हभप रामकृष्ण महाराज लहवितकर व्यासपीठावर प्राचार्य रायभान दवंगे, सरपंच सचिन मोगल, बापूसाहेब मोगल, योगेश मोगल आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १३- आधुनिक काळातील मोबाईलच्या युगात विद्यार्थी साधक न राहता बाधक होत चालला असून अशा विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांची असल्याचे प्रतिपादन हभप रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना समाज प्रबोधन मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते तर व्यासपीठावर सरपंच सचिन मोगल,ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व स्कूल कमिटी सदस्य बापूसाहेब मोगल,योगेश मोगल, शिवाजी रहाणे, दिलीप चव्हाण, प्रितेश भराडे, हेमंत मोगल,केदु भोई, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे आदी उपस्थित होते सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले यावेळी विचार व्यक्त करताना हभप लहवितकर महाराज यांनी मविप्र शिक्षण संस्था राज्यातली एक नंबरची शिक्षण संस्था व्हावी यादृष्टीने हे विद्यालय प्रयत्न करत असून त्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असून मन,विचार, बुद्धी, आचार, विचार यावर नियंत्रण ठेवून आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षकांनी पाठाच्या अध्यापनाची तयारी करूनच विद्यार्थ्यांना ज्ञान द्यावे विद्यार्थ्यांनीही साधक वृत्ती ठेवावी सद्गुण, एकाग्रता बुद्धी खानपान व योग्य झोप ही लक्षणे अंगीकारावी असेही आवाहन केले यावेळी लहवितकर महाराजांनी लिहिलेले साहित्य विद्यालयाला भेट दिले विद्यालय प्रशासनाच्या प्राचार्य दवंगे व सरपंच सचिन मोगल यांनी महाराजांचा यथोचित सत्कार केला अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी महाराजांचे स्वागत करत त्यांनी ठेवलेल्या अपेक्षा विद्यालयाच्या वतीने पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले सूत्रसंचालन सोमनाथ मत्सागर यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...