बांधकाम कामगारांना न्याय द्या :- वकील. नीलकमल सोनवणे
नाशिक शहर व परिसरातील बांधकाम कामगारांचा मृत्यूंमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे मृत्यू विशेषतः. इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी कामाच्या वेळेत होतात. कारण या कामगारांच्या सुरक्षेते विषयी कोणतीही उपायोजना येथे केलेली आढळून येत नाही. तसेच या कामगारांच्या मृत्यूची नोंद ही पोलीस दप्तरी आकस्मात मृत्यू म्हणून केली जाते. या सर्व बेकायदेशीर बाबींचा व कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी व सुरक्षिततेच्या उपायोजना प्रत्येक प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताचा मार्क्सवादी-लेनिनवादी पक्ष(लालबावटा)यांच्या वतीने दिनांक. 11 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी डॉ. भारत कारीया, अरविंद चव्हाण, किरण नितनवरे, शिवाजी पगारे, वकील बी.टी. देवरे, वकील नीलकमल सोनवणे , राहुल तुपलोंढे,उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा