Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०२३

३७ व्या नॅशनल गेम्समध्ये पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र यंदाही अव्वल स्थानी राहणार :- किशोर येवले 


नवी मुंबई : २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये युध्दकला पिंच्याक सिल्याट खेळाची स्पर्धाही संपन्न होत आहे. या खेळामध्ये एकूण २८ राज्यातील ३०४ खेळाडूंची निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल २० खेळाडूंची निवड झालेली असून, ते एकूण २३ पदकांसाठी खेळणार आहेत. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र ऑलिम्पिक  असोसिएशनच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक किशोर येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान विकास स्कूल, कोपरखैरणे येथे पार पडले.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये पिंच्याक सिलॅट खेळ प्रथमच समाविष्ट झाला आहे. कॅम्पल ग्राउंड विलेज, पणजी येथे होणाऱ्या या स्पर्धेत २० खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामध्ये धनंजय सांडूगडे (टॅडींग इव्हेंट- ४५ किलो), रामचंद्र बदक (टॅडींग इव्हेंट ४५ ते ५० किलो), कार्तिक पालवे (टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ आणि गंडा इव्हेंट), सोमनाथ सोनवणे (टॅडींग इव्हेंट ५५ ते ६० किलो), वैभव काळे (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, रेगू इव्हेंट आणि सोलोइव्हेंट), मुकेश चौधरी (टॅडींग इव्हेंट ६५ ते ७० किलो), ओंकार अभंग (टॅडींग इव्हेंट ७० ते ७५ किलो आणि रेगु इव्हेंट), अंशुल कांबळे (टॅडींग‍ इव्हेंट ८० ते ८५ किलो आणि रेगु इव्हेंट), अनुज सरनाईक (टॅडींग इव्हेंट ८५ ते ९० किलो), पियुष शुक्ला ( टॅडींग इव्हेंट ९० ते ९५ ), धनंजय जगता टॅडींग इव्हेंट ९५ ते ११० किलो), कृष्णा पांचाळ तुंगल इव्हेंट), सचिन गर्जे (गंडा इव्हेंट), जयश्री शेट्टी (टॅडींग इव्हेंट ५० ते ५५ किलो आणि रेग इव्हेंट), किर्णाक्षी येवले (टॅडींग इव्हेंट ६० ते ६५ किलो, तूंगल इव्हेंट आणि रेगु इव्हेंट), पौर्णिम तेली ( टॅडींग इव्हेंट ६५ ७० किलो), दीक्ष शिंदे (टॅडींग इव्हेंट ७५ ते ८० किलो), भक्ती किल्लेदार ( ८५ ते १०० किलो), रिया चव्हाण (रेगु इव्हेंट), पूर्वी गांजवे ( सोलो इव्हेंट) यांच समावेश आहे. तसेच महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून साहेबराव ओहोळ आणि प्रशिक्षक म्हणून कु. सुहास पाटील आणि कु. अभिषेक आव्हाड यांची निवड करण्यात आली. मागील १३ वर्ष महाराष्ट्र संघ पिंच्याक सिल्याट खेळामध्ये अव्वल स्थानी आहे आणि आता सुद्धा तीच कामगिरी ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाची कायम राहील, अशी माहिती 'इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन'चे अध्यक्ष किशोर येवले यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...