Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, १ मे, २०२५

कामगार दिन विशेष कार्यक्रम

कामगार दिनानिमित्त लाडू वाटप व शासकीय योजना माहिती कार्यक्रम

कार्यक्रमाचे दृश्य
बिटको नाक्यावर आयोजित कामगार दिन कार्यक्रमात सहभागी नागरिक

महाराष्ट्र दिनआंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने बिटको कामगार नाका, नाशिक येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन (टी.यू.सी.आय. महाराष्ट्र)अत्याचार विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी नाका व बांधकाम कामगारांना लाडू वाटप करून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले.

यावेळी लहुजी कामगार युनियनचे नेते बागुल, अ‍ॅड. राहुल तुपलोढे, डॉ. भारत कारिया, किरण नितनावरे, रोहिणी जाधवअ‍ॅड. निलेश सोनवणे (अध्यक्ष, टी.यू.सी.आय. महाराष्ट्र) यांची उपस्थिती होती.

कामगारांनी त्यांच्या समस्या मांडल्या व त्यावर उपाय शोधण्यासाठी टी.यू.सी.आय. महाराष्ट्र प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अ‍ॅड. राहुल तुपलोढे यांनी कामगारांच्या प्रश्नांवर गंभीरतेने विचार करत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका रोहिणी जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कामगार दिनानिमित्त लाडू वाटप व माहिती कार्यक्रम

कामगार दिनानिमित्त लाडू वाटप व माहिती कार्यक्रम

आज १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनआंतरराष्ट्रीय कामगार दिननिमित्त अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, नाशिकअत्याचार विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिटको कामगार नाका, नाशिक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नाका व बांधकाम कामगारांना लाडू वाटप करण्यात आले, तसेच शासकीय योजनांची माहिती दिली गेली. यावेळी कामगार दिनाचे व महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले.

उपस्थित मान्यवर

कार्यक्रम प्रसंगी लहुजी कामगार युनियनचे नेते बागुल, अ‍ॅड. राहुल तुपलोढे, डॉ. भारत कारिया, किरण नितनावरे, रोहिणी जाधव, आणि अ‍ॅड. निलेश सोनवणे (अध्यक्ष, टीयूसीआय महाराष्ट्र) यांची उपस्थिती लाभली.

कामगारांचे प्रश्न व आश्वासने

कामगारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. टीयूसीआय महाराष्ट्र तर्फे या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक अ‍ॅड. राहुल तुपलोढे यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका रोहिणी जाधव मॅडम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

निकाल 2025: बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट | महाराष्ट्र बोर्ड

निकाल 2025: बारावी- दहावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

निकाल प्रतीक चित्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा २०२५ यंदा नियोजित वेळेपेक्षा १० दिवस आधी घेण्यात आल्या. त्यामुळे निकालही अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

त्यांच्या मते, गुणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल ५ मे ते ७ मे दरम्यान, तर दहावीचा निकाल १५ मे ते १८ मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

बोर्डाने सांगितले की, निकाल वेळेआधी घोषित करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी अधिक वेळ मिळावा, हा उद्देश आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण होणार नाही याची खात्री देण्यात आली आहे.

शासनाच्या सूचना:

  • प्रवेशासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी वेळेआधीच अर्ज करा.ऐनवेळी धावपळ होणार नाही याची काळजी घ्या
  • दिशाभूल होणार नाही याची खबरदारी घ्या. कोणत्याही खाजगी संस्थेच्या अमिषाला बळी पडू नका.
  • शाळा व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे गरजेचे आहे.

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

राज्यभरात भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे थैमान !
Special Report आपले सरकार सेवा केंद्र

डिजिटल इंडिया च्या उपक्रमाला भ्रष्टाचाराची वाळवी? ‘आपले सरकार’ पोर्टलला पर्याय म्हणून दलालीचा गोरखधंदा फोफावतोय!

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केलं. या पोर्टलच्या माध्यमातून जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर, इ. शासकीय दाखले मिळवण्यासाठी फक्त ₹३३.६० इतकं माफक शुल्क आकारलं जातं. तसेच शासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी लागतो.

मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया तितकी पारदर्शक राहिलेली नाही. अनेक सेतु कार्यालये व खासगी सेवा केंद्रे दाखले मिळवून देण्यासाठी नागरिकांकडून ₹४०० ते ₹५०० पर्यंतची रक्कम आकारतात. एवढंच नाही, तर या व्यवहारांमध्ये तहसीलदार, तलाठी यांसारख्या शासकीय अधिकाऱ्यांचाही ‘कमिशन’ स्वरूपात सहभाग असल्याची चर्चा आहे.

कमी कागदपत्रे असलेल्यांची अडचण, दलालांची संधी!

नागरिकांकडे काही आवश्यक कागदपत्रे नसल्यास, ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज करताना अडथळे येतात. अशावेळी दाखला लवकर मिळावा म्हणून नागरिक हे सेवा केंद्र, सेतु कार्यालय यांच्याकडे वळतात. तेथे त्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागते, पण काम काही दिवसांत होते.

एका नागरिकाने सांगितले की, “जे कागदपत्रे मी सेवा केंद्रात दिली, तेच जर पोर्टलवर दिले असते, तरी माझा अर्ज मंजूर होईल का? लवकर दाखला मिळेल का ? यामुळे ऑनलाईन अर्ज न करता सेतु कार्यालयात अक्कलखाती पैसे देऊन दाखला मिळावावा लागतोय” यावरून जनतेचा प्रशासनावरील अथवा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरील विश्वास डगमगतोय, हे स्पष्ट दिसते.

योजनेच्या हंगामात दलालांची 'दिवाळी'

शालेय प्रवेश, महाविद्यालयीन दाखले, सरकारी योजना – या काळात सेवा केंद्र व सेतु कार्यालयांची कमाई अक्षरशः 'फुलते'. गरजूंना वेळेवर दाखले मिळावेत म्हणून अधिक पैसे मोजावे लागतात. यामुळे शासनाच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमाचा हेतूच हरवत चालला आहे.

नेमकं घडतंय काय?

  • शासकीय सेवा खासगी दलालांकडे सरकत आहेत.
  • पारदर्शकतेचा अभाव आणि दलालीला उत्तेजन.
  • सामान्य नागरिक आर्थिक शोषणाला बळी पडतोय.
  • प्रशासनावरील लोकांचा विश्वास ढासळतोय.

शासनाने दिलेल्या डिजिटल सेवा सुविधा ह्या प्रत्येक नागरिकापर्यंत सरळ, सुलभ आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने पोहचणं अपेक्षित होतं. मात्र आज प्रत्यक्षात पैशांच्या मोबदल्यात दाखले मिळवणं ही गरज झाली आहे, हक्क नव्हे.

आमची WhatsApp ग्रुप लिंक

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

धान्य वितरणातील अनागोंदी विरोधात निवेदन

धान्य वितरणातील अनागोंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

नाशिक, १८ एप्रिल २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक शिधा पत्रिकांमध्ये ऑनलाईन नावे दिसत नसल्यामुळे नागरिकांना KYC अथवा बायोमेट्रिक कारणास्तव वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

अनेक रेशन दुकानांतून ऑनलाईन नावे असतानाही कमी प्रमाणात व निकृष्ट दर्जाचे धान्य दिले जात आहे. प्रत्येक दुकानात मोफत KYC व बायोमेट्रिक सुविधा उपलब्ध असताना देखील काही दुकानदार नागरिकांकडून पैसे मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

धान्य वितरण कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट असून त्यांच्यामार्फत पैसे देऊन त्वरित काम होत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वर डाऊनची कारणे देत नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नाही. शिधा पत्रिका बंद झाल्यानंतर अनेक वेळा अर्ज करूनही नव्या पत्रिका मिळत नाहीत.

पंचवटी भागातील मोरे मळा, हनुमानवाडी, क्रांती नगर, उदय कॉलनी या परिसरातील रेशन कार्ड्स सुमारे ३ किमी अंतरावरील शनिमंदिर पेठरोड परिसरातील दुकानांशी जोडण्यात आले आहेत. परिणामी, मोफत धान्य घेण्यासाठी नागरिकांना सुमारे ₹२०० पर्यंतचे रिक्षा भाडे सहन करावे लागत आहे. म्हणून हे रेशन दुकान क्रांतीनगर परिसरात सुरू करावे, किंवा नागरिकांची कार्डे त्यांच्या जवळील दुकानांशी जोडावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभार तत्काळ थांबवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवड्यातून एकदा कॅम्प लावून त्यांची कामे मार्गी लावावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

उपस्थित मान्यवर

जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, ॲड. शाम तावरे, ॲड. संदीप दंडगव्हण, ॲड. विलास डोंगरे, चेतन सोनवणे, ॲड. ज्योती साळवे, भास्कर आवारे, बाबुराव साठे, पंढरीनाथ बागुल, निलेश वराडे, ॲड. प्रतीक्षा चौधरी, ज्योती जाधव, अशोक श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

मनपा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले
मनपा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले
नाशिक –

नाशिक महानगरपालिका हद्दीतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मार्च महिन्याचे मानधन अद्यापही जमा झालेले नाही. यामुळे शेकडो महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आर्थिक वर्ष २०२४–२५ च्या समाप्ती महिन्याच्या शेवटी येणाऱ्या मार्च महिन्यात तांत्रिक अडचणी असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात आले आहे, मात्र मानधन केव्हा मिळेल याबाबत स्पष्टता नाही.

ERP प्रणालीमध्ये अडचण असल्याचे सांगितले जात असून, काही बिले अद्याप पाठवलेच गेले नसल्याचे समजते. डिजिटल युगातही अशा अडचणींमुळे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित राहावे लागत आहे.

कामगार कायदा व संविधानाच्या तरतुदींनुसार, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ७ तारखेच्या आत पगार मिळणे बंधनकारक आहे. मात्र नाशिक महानगरपालिका या नियमांचे उल्लंघन करत असल्याने प्रशासनावर टीका होत आहे. वेळेवर पगार न मिळाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

प्रशासनाचा कारभार संथ असून, आधुनिक तंत्रज्ञान असतानाही कामे वेळेवर पूर्ण न होणे ही गंभीर बाब आहे. नाशिक महानगरपालिकेत वशिल्याने लागलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कामात संथपणा असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. कार्यक्षम, तंत्रस्नेही तरुणांना संधी न दिल्यामुळे कामकाजात दिरंगाई होत असल्याचे बोलले जात आहे.

मार्च ते ऑगस्ट या काळात दरवर्षी मानधन रखडते हे काही नवीन राहिलेले नाही. "हे तर प्रत्येक वर्षीचंच नाटक आहे" असे मत अनेक सेविकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च व रोजची गरज भागवताना महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्या नाशिक शहरात सुमारे ६०० अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. यामध्ये विधवा, परित्यक्ता, गरीब व सामाजिक दृष्ट्या दुर्बल महिलांचा समावेश आहे. त्यांचे काम कौतुकास्पद असून त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’, ‘पल्स पोलिओ मोहिम’ , कोरोना योद्धा म्हणून महिलांनी जीवाची बाजी लावून काम केले आहे. आणि त्यासह अन्य अनेक शासकीय उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.

प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या या महिलांना वेळेवर मानधन न मिळणे ही शासकीय उदासीनतेची लक्षणे आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित योग्य पावले उचलून रखडलेले मानधन वितरित करावे, अशी मागणी सेविका व मदतनीस महिलांकडून करण्यात येत आहे.

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ - जीवन केशरी
११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५
नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती!

📝 प्रवेश प्रक्रिया कशी असते?

  • mahahsscboard किंवा संबंधित पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी.
  • भाग 1 व भाग 2 हे दोन्ही फॉर्म भरावे लागतात.
  • फॉर्ममध्ये शाळा, बोर्ड, मार्क्स, कास्ट वगैरे माहिती द्यावी लागते.
  • Merit List (गुणांनुसार यादी) प्रसिद्ध होते – त्यावरून कॉलेज मिळते.
  • प्रवेश मंजूर झाल्यावर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे आवश्यक.

📑 आवश्यक कागदपत्रे

  • १० वी चे मार्कशीट व उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  • Migration Certificate (जर इतर बोर्ड असेल तर)
  • जात प्रमाणपत्र (OBC/SC/ST साठी)
  • Non-Creamy Layer सर्टिफिकेट (OBC साठी)
  • Aadhar कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो (४-५)

⚖️ Open व OBC वर्गासाठी मार्गदर्शन

  • Open Category: कोणतेही आरक्षण नसल्याने Cut-off ची तयारी करा.
  • OBC Category: योग्य वेळेत Non-Creamy Layer सादर करा.
  • MahaDBT पोर्टलवर शिष्यवृत्ती साठी अर्ज करावा.

📍 नाशिक विद्यार्थ्यांसाठी खास टीप

  • सरकारी महाविद्यालयांसारखे BYK, KTHM, HPT चांगले पर्याय आहेत.
  • सर्व प्रवेश तारखा वेळेत लक्षात ठेवा – अंतीम यादी आणि प्रवेशाची शेवटची तारीख.
  • Polytechnic, ITI किंवा ११ वी – यामधून योग्य पर्याय निवडा.
  • सरकारी योजनांचा फायदा घ्या – मार्गदर्शनासाठी शिक्षकांशी संपर्क ठेवा.
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

शिक्षण सुधारणा मागण्यांसाठी निवेदन | जीवन केशरी मराठी जीवन केशरी मराठी ...