Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, २४ मार्च, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात शहीद दिन साजरा



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २४- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने त्यांना अभिवादन करून शहीद दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते भगतसिंग,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांच्या हस्ते राजगुरू व पर्यवेक्षक नितीन भामरे यांच्या हस्ते सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थिनी सिद्धी वडघुले हिने मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दवंगे यांनी शहीद दिन साजरा करण्यामागचा हेतू,भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांचे कार्य विशद केले सूत्रसंचालन रामेश्वर धोंगडे यांनी तर आभार बाळासाहेब गडाख यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

बुधवार, १३ मार्च, २०२४

राष्ट्रीय π दिन : विशेष लेख 


राष्ट्रीय पाय दिन हे प्रत्येक वर्षी १४ मार्चला साजरा केले जाते. ह्या दिनाचं चयन ३/१४ या तारखेने केलं जातं, ज्याचं संबंध प्रमुख गणित संख्येचं π (पाय) संख्येशी आहे, ज्याचं मूल्य असलेलं ३.१४ आहे. पाय दिन हा गणित प्रेमियांना आणि शिक्षकांना π च्या महत्त्वाच्या आणि गणिताच्या आनंदाने मनात घालण्याचा एक अवसर मिळतो.
पाय (π) हे एक अद्यातित गणितात्मक संख्यांक आहे, ज्याची मूल्ये वर्तमानत: 3.14159 आहे. ह्या संख्येचा उपयोग विविध क्षेत्रांतरांत, विशेषत: वृत्त क्षेत्रात, होतो. पायचा सुरवातीतील उल्लेख एक ब्रह्मगुप्ताने केला होता, पण इतर

गणितज्ञांनी त्याचं मूल्य निर्धारित केलं. राष्ट्रीय π दिन हा त्यांच्या मुल्यानुसार दुपारी १:५९ वाजता साजरा करतात. 

पायचा निर्माण कसा होता, ह्याचं निर्माणदाता नसताना आहे. ह्या संख्येचं उपयोग प्राचीन गणितात, ज्योतिषशास्त्रात, अंधकारातील रूपग्रंथांत, आणि इंजिनिअरिंग, फिझिक्स, अस्त्रशास्त्र, आणि इतर क्षेत्रांतरांत केला जातो.

पायचं मूळ उपयोग ह्याच्या अर्थानुसार, सर्कलच्या व्यासाचं वेगवेगळ्या क्षेत्रांचं आकलन करण्यात होतं. पायच्या मूल्याचं आकलन करण्यासाठी, गणितात विविध रीतीने वापरलेलं जातं, ज्यामुळे ह्या संख्येचं मूल्य विचारलं जातं.

पायचं मूळ निर्माण इतिहासातील लोकांचं सहानुभूतिचं, विद्वान गणितज्ञांचं संबंधांचं असंख्य संबंध आहेत. ह्या संख्येचं अन्वेषण व त्याचं मूळ खोज अनेक कोणांतील साधून आलं.

माहिती संकलन :- प्रसाद भालेकर 

प्रकाशन माध्यम :- जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ

रविवार, १० मार्च, २०२४

मौजे सुकेणे विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

WhatsApp Group Join Button </!doctype>

 

मौजे सुकेणे विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा 

 मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनाप्रसंगी प्राचार्य दवंगे, सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच अनुपमा जाधव व आदी



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १०- मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव विद्यालय, कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनी कसबे सुकेणे पंचक्रोशीतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांसह विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते व्यासपीठावर मौजे सुकेणे सरपंच सौ सुरेखा चव्हाण, कसबे सुकेणे उपसरपंच सौ अनुपमा जाधव, प्रा डॉ छाया भोज,अँड निर्मला अरिंगळे, अभिनव मुख्याध्यापिका सुवर्ण ठाकरे आदी उपस्थित होत्या सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सर्व महिलांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रास्ताविक श्रीम वैशाली जाधव यांनी केले यावेळी विद्यार्थिनी कु ईश्वरी सुनील भंडारे कु ईश्वरी नितीन भंडारे कु श्रीवास्ती ननवरे यांनी तर अतिथींच्या वतीने डॉ छाया भोज,अँड निर्मला अरिंगळे, सरपंच सुरेखा चव्हाण तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी महिला दिनानिमित्ताने मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे,ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे यांच्यासह सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या सूत्रसंचालन कवी मुकुंद ताकाटे यांनी तर आभार श्रीम बेबी सोनवणे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

गुरुवार, ७ मार्च, २०२४

जनता विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

WhatsApp Group Join Button

 

जनता विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा 



नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. ८ मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला ‌. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या गीत मंचाच्या सुमधुर गायनाने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एम.एस.डोखळे , ज्येष्ठ शिक्षिका एम.एस.पिंगळे व वाय.बी.गायधनी ह्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे स्वागत तन्वी सुर्यवंशी आणि तन्मयी आवारे हिने केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता , राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुत्रसंचलन तन्वी सुर्यवंशी व तन्मयी आवारे हिने केले. चैतन्य दुसाने आणि श्रेया इंगळे ह्यांनी भाषणे व महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सृष्टी आंधळे हिने केले. ८ वी -ब च्या वर्गशिक्षिका श्रीमती. वाघ.के.एस. ह्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी मेहनत घेतली.

 महिला दिनानिमित्त मुलींसाठी “ह्या” विवाहसंस्थेत मोफत नावनोंदणी 



नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील ३६ वर्षांपासून कार्यरत असलेली सुप्रसिद्ध विवाहसंस्था पुर्णविराम विवाहसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलींसाठी विवाह नोंदणीत विशेष सवलत देण्यात येत आहे. मुलींसाठी मोफत नावनोंदणी ८ मार्च ते १८ मार्च २०२४ पर्यंत मुलींसाठी मोफत नावनोंदणी वैध राहील. सर्व प्रकारच्या जाती- धर्माच्या मुलींना ही नावनोंदणी करता येईल. ह्यासाठी पुर्णविराम विवाहसंस्थेचे संचालक श्री. विजय खैरे मो. 9325224586 ह्यावर संपर्क साधावा किंवा पुर्णविराम संस्था , सपट चहासमोर, मेन रोड , नाशिक येथे प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन विजय खैरे यांनी केले आहे.



रविवार, ३ मार्च, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात मराठी दिन उत्साहात 



कसबे सुकेणे ता २७- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज विद्यालयात वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती मराठी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे व मराठी विषय समितीच्या सदस्य शिक्षकांच्या हस्ते शिरवाडकारांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या वतीने कु इच्छा काळे व कु आयुश गुरगुडे याने तर शिक्षकांमधून श्री बाळासाहेब निफाडे यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली मराठी दिनाच्या औचित्य साधून विद्यालयात मराठी गीत, मराठी नाटिका व प्रांजल जाधव हिने पोवाडा सादर केला कवी शिक्षक मुकुंद ताकाटे यांनी स्वयं लिखित कविता सादर केल्या सूत्रसंचालन कु सिद्धी वडघुले व अनन्य विधाते यांनी तर आभार कु सृष्टी हळदे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 मौजे सुकेणे विद्यालयाला शुद्ध पाण्यासाठी दोन आरो फिल्टर प्लांट

गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

कसबे सुकेणे ता २ मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव बालविकास मंदिर व कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळपास २१०० विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या हेतूने दोन आरो फिल्टर प्लांट बसविण्यात आले गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन यांच्यावतीने हे दोन आरो फिल्टर प्लांट विद्यालयात बसविण्यात आले असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतील पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे या आरो फिल्टर प्लांटचा लोकार्पण सोहळा मविप्र संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला हे शुद्ध पाण्याचे आरो फिल्टर प्लांट विद्यालयाला मिळवून देण्यासाठी कसबै सुकेणे येथील दाभोळकर द्राक्ष प्रयोग परिवाराचे संचालक व द्राक्षतज्ञ वासुदेव काठे यांच्या मार्गदर्शनाने पुढाकाराने जिल्हा वितरक विकास दवंगे व त्यांचे सहकारी संतोष दवंगे व अमोल दवंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसविण्यात आले हे दोन आरो फिल्टर प्लांट जवळपास २ लाख ७० हजार रुपयांचे असून त्यांची क्षमता प्रति ताशी २५० लिटर इतकी आहे सुरुवातीला प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी या दोन आरो फिल्टर प्लांटची आवश्यकता, पालकांची मागणी व आरो फिल्टर प्लांट देण्यासाठी गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन त्यांचे संचालक व ज्यांच्या पुढाकाराने हे आरो प्लांट बसवले गेले त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी द्राक्ष तज्ञ वासुदेव काठे यांनी आरो फिल्टर प्लांट देण्यामागचा उदात्त हेतू विशद केला तर संस्थेचे उपसभापती मोगल यांनी संस्थेच्या वतीने या फाउंडेशनचे आभार मानत स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सूत्रसंचालन सोमनाथ मतसागर यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य भाऊसाहेब भंडारे, दिलीप मोगल, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,पर्यवेक्षक नितीन भामरे आदीसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते 


  जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश नाशिक, दि. २६ डिसेंबर (प्रतिनिधी): मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज...