Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, ३ मार्च, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयाला शुद्ध पाण्यासाठी दोन आरो फिल्टर प्लांट

गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

कसबे सुकेणे ता २ मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव बालविकास मंदिर व कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळपास २१०० विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या हेतूने दोन आरो फिल्टर प्लांट बसविण्यात आले गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन यांच्यावतीने हे दोन आरो फिल्टर प्लांट विद्यालयात बसविण्यात आले असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतील पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे या आरो फिल्टर प्लांटचा लोकार्पण सोहळा मविप्र संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला हे शुद्ध पाण्याचे आरो फिल्टर प्लांट विद्यालयाला मिळवून देण्यासाठी कसबै सुकेणे येथील दाभोळकर द्राक्ष प्रयोग परिवाराचे संचालक व द्राक्षतज्ञ वासुदेव काठे यांच्या मार्गदर्शनाने पुढाकाराने जिल्हा वितरक विकास दवंगे व त्यांचे सहकारी संतोष दवंगे व अमोल दवंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसविण्यात आले हे दोन आरो फिल्टर प्लांट जवळपास २ लाख ७० हजार रुपयांचे असून त्यांची क्षमता प्रति ताशी २५० लिटर इतकी आहे सुरुवातीला प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी या दोन आरो फिल्टर प्लांटची आवश्यकता, पालकांची मागणी व आरो फिल्टर प्लांट देण्यासाठी गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन त्यांचे संचालक व ज्यांच्या पुढाकाराने हे आरो प्लांट बसवले गेले त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी द्राक्ष तज्ञ वासुदेव काठे यांनी आरो फिल्टर प्लांट देण्यामागचा उदात्त हेतू विशद केला तर संस्थेचे उपसभापती मोगल यांनी संस्थेच्या वतीने या फाउंडेशनचे आभार मानत स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सूत्रसंचालन सोमनाथ मतसागर यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य भाऊसाहेब भंडारे, दिलीप मोगल, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,पर्यवेक्षक नितीन भामरे आदीसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...