Join The WhatsApp group
गुरुवार, ७ मार्च, २०२४
रविवार, ३ मार्च, २०२४
मौजे सुकेणे विद्यालयात मराठी दिन उत्साहात
कसबे सुकेणे ता २७- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज विद्यालयात वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती मराठी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे व मराठी विषय समितीच्या सदस्य शिक्षकांच्या हस्ते शिरवाडकारांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या वतीने कु इच्छा काळे व कु आयुश गुरगुडे याने तर शिक्षकांमधून श्री बाळासाहेब निफाडे यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली मराठी दिनाच्या औचित्य साधून विद्यालयात मराठी गीत, मराठी नाटिका व प्रांजल जाधव हिने पोवाडा सादर केला कवी शिक्षक मुकुंद ताकाटे यांनी स्वयं लिखित कविता सादर केल्या सूत्रसंचालन कु सिद्धी वडघुले व अनन्य विधाते यांनी तर आभार कु सृष्टी हळदे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मौजे सुकेणे विद्यालयाला शुद्ध पाण्यासाठी दोन आरो फिल्टर प्लांट
गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
कसबे सुकेणे ता २ मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव बालविकास मंदिर व कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जवळपास २१०० विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या हेतूने दोन आरो फिल्टर प्लांट बसविण्यात आले गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन यांच्यावतीने हे दोन आरो फिल्टर प्लांट विद्यालयात बसविण्यात आले असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतील पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे या आरो फिल्टर प्लांटचा लोकार्पण सोहळा मविप्र संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला हे शुद्ध पाण्याचे आरो फिल्टर प्लांट विद्यालयाला मिळवून देण्यासाठी कसबै सुकेणे येथील दाभोळकर द्राक्ष प्रयोग परिवाराचे संचालक व द्राक्षतज्ञ वासुदेव काठे यांच्या मार्गदर्शनाने पुढाकाराने जिल्हा वितरक विकास दवंगे व त्यांचे सहकारी संतोष दवंगे व अमोल दवंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसविण्यात आले हे दोन आरो फिल्टर प्लांट जवळपास २ लाख ७० हजार रुपयांचे असून त्यांची क्षमता प्रति ताशी २५० लिटर इतकी आहे सुरुवातीला प्रास्ताविकातून प्राचार्य रायभान दवंगे यांनी या दोन आरो फिल्टर प्लांटची आवश्यकता, पालकांची मागणी व आरो फिल्टर प्लांट देण्यासाठी गोदावरी व लक्ष्मी वैद्य फाउंडेशन त्यांचे संचालक व ज्यांच्या पुढाकाराने हे आरो प्लांट बसवले गेले त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी द्राक्ष तज्ञ वासुदेव काठे यांनी आरो फिल्टर प्लांट देण्यामागचा उदात्त हेतू विशद केला तर संस्थेचे उपसभापती मोगल यांनी संस्थेच्या वतीने या फाउंडेशनचे आभार मानत स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सूत्रसंचालन सोमनाथ मतसागर यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य भाऊसाहेब भंडारे, दिलीप मोगल, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,पर्यवेक्षक नितीन भामरे आदीसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
जनता विद्यालयात विज्ञान दिन साजरा
जनता विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४
मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे:- ॲड. नितीन ठाकरे
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
![]() |
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे व योग्य व्यासपीठ मिळणे हे गरजेचे आहे. |
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४
पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप मध्ये नाशिक च्या खेळाडूंचे वर्चस्व
नाशिक :- पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलॅट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन ने दि.18व 19 फेब्रुवारी 2024 रोजी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक च्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
मा. इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, यांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुले व मुलीं साठी घेण्यात आल्या.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, आमदार मा.श्री. बालाजी कल्याणकर ( नांदेड), तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 3 रौप्य, 8 कांस्य पदक नासिक संघाने प्राप्त केले आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. या खेळाडूंना श्री. नागेश बनसोडे( नाशिक पिंच्याक सिल्याट असोसिएशन सचिव) यांनी मार्गदर्शन केले.
विजयी खेळाडूंची नावे
इंद्रा बनसोडे याने 3-6 वयोगटात टेंडिंग या प्रकारात (रौप्य)पदक मिळवले व पर्व उबाळे ने (रौप्य) पदक मिळवले तसेच निधीश मुंबरकर ने (कास्य) पदक मिळवले.10-11 या वयोगटात अर्णव विधाते (कास्य), अथर्व बर्वे ( कास्य) , आरोही छडीदार ( कास्य),सिद्धी लुनावत ( कास्य), ऋषिका कुल्हारे ( कास्य) पदक मिळवले. 12-13 या वयोगटात विराज कवडे याने (कास्य) , गणेश खंडेराव याने ( कास्य) , पदक मिळवले .14-16 या वयोगटात समीक्षा देहाड ( रौप्य) पदक मिळवले. तसेच आर्यन सुर्वे, चेतन पवार,प्रसाद पाटील, ओंकार पाटील,कीर्ती पाटील, अंजली राजपूत,प्रतीक्षा नगुलकर, नितीन नगुलकर आदी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे. या खेळाला 'युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार', 'भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो.
या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.
शिक्षण सुधारणा मागण्यांसाठी निवेदन | जीवन केशरी मराठी जीवन केशरी मराठी ...

-
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...
-
आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिरात मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा नाशिक:- विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांचे प्रयोग बघतां...
-
शूरवीर मराठा ( स्वरचित कविता ) - कवयित्री :- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे, विद्यार्थिनी - मविप्र संचलित, जनता विद्यालय, पवननगर, नाशिक ( प्र...