मौजे सुकेणे विद्यालयात दिव्यांग सप्ताह
प्रभात फेरी,व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात दिव्यांग सप्ताह आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, दिव्यांग सहकारी व विद्यार्थी |
कसबे सुकेणे ता ७- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे समाजात दिव्यांगाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढणे, व्याख्यानांचे आयोजन करणे, फलकांद्वारे जनजागृती करणे, विविध स्पर्धांचे आयोजन करणे, दिव्यांग विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे प्राचार्य दवंगे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्या हस्ते विद्यालयातील दिव्यांग शिक्षक सुभाष देशमुख कार्यालयीन कर्मचारी शरद मोरे जगदीश मोगल व सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य दवंगे यांनी दिव्यांग सप्ताह आयोजित करण्यामागचा हेतू विशद करत सर्व दिव्यांग शिक्षक व विद्यार्थ्यांना दिव्यांग सप्ताहाच्या शुभेच्छा देत समाजाने त्यांच्याकडे आपले सहकारी बांधव या दृष्टिकोनातून बघताना यांना शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आवाहन केले