मौजे सुकेणे विद्यालयात संविधान दिन साजरा
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात भारतीय संविधान दिन प्रसंगी संविधानाचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे, विद्यार्थी व शिक्षक वृंद |
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २६ - मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यू कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संविधान दिनाबरोबरच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांनाही आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, प्रा राजेंद्र धनवटे व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती मातेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी सातवी अ ची विद्यार्थिनी कु सिद्धी वडघुले हिने तर शिक्षकांमधून श्रीम शितल शिंदे यांनी संविधान दिनाची विद्यार्थ्यांना माहिती करून दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रायभान दवंगे यांनी भारतीय संविधान दिन साजरा करण्यामागचा हेतू विशद करत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवी अ ची विद्यार्थिनी कु वैष्णवी भंडारे हिने तर आभार कु अदिती वाघ हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा