मविप्रने रचला विश्वविक्रम !
रचली १७०० चौ. फुटांची शिवरायांची ग्रंथ रांगोळी
नाशिक:- नाशिकची व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व शिक्षणक्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने दि. २७ नोव्हेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२३ रोजी मविप्र शिवमहोत्सव आयोजित केला आहे. ह्या शिवमहोत्सवात मविप्रने एक मोठा विश्वविक्रम रचला आहे. मविप्रने १७०० चौ.फुटांची छत्रपती शिवाजी महाराज यांची ग्रंथ रांगोळी साकारलेली आहे. ही ग्रंथ रांगोळी पुस्तकांच्या माध्यमातून बनविण्यात आलेली आहे. ह्या सोबतच एक चित्रमय प्रदर्शन सुध्दा आयोजित केले होते ह्यामध्ये मातीच्या किल्ला बनविण्याची स्पर्धा आयोजीत केली होती. मविप्रच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकूण ६६ मातीच्या किल्ल्यांची रचना केली आहे . मविप्रच्या ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे वाचन संस्कृती वाढवणे व विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज ह्यांची ओळख व्हावी हा आहे. ह्या उपक्रमाचे उद्घाटन २७ नोव्हेंबर रोजी सं. ५:३० वा. कर्मवीर अॕड. बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार असून हा कार्यक्रमाचा प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे. नाशिकरांनी ह्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस अॕड. नितीन ठाकरे यांनी केले आहे. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ५:३० ते रात्री १०:०० वा.पर्यंत २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत आहे. प्रवेश मोफत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा