मौजे सुकेणे विद्यालयात महामानवाला अभिवादन
कसबे सुकेणे ता -६ मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे व उपस्थितांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी कु वैष्णवी देशमुख हिने महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ,समाज सुधारक होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते.त्यांनी जातीभेद व अन्यायाविरुद्ध लढा दिला भारतीय संविधानाचे जनक,दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा महामानव, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्यरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे ते आपल्या मनोगतात म्हणाले सूत्रसंचालन कु मिसबा शेख व कु पूर्वजा सांगळे यांनी तर आभार कु नेहा विधाते हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा