मविप्र संस्थेचे सर्व रोगनिदान
शिबिर सभासद व वंचित
घटकांसाठीच - अॅड. ठाकरे
मौजे सुकेणे येथील शिबिराप्रसंगी सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांचे प्रतिपादन
मौजे सुकेणे ता निफाड येथील सर्व रोगनिदान शिबिराप्रसंगी विचार मांडताना सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, व्यासपीठावर बाळासाहेब क्षीरसागर, विश्वास मोरे,डी बी मोगल, शिवाजी गडाख आदी |
कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,२३- मविप्र संचलित डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र आडगाव, नाशिक यांच्यावतीने राबवले जाणारे सर्व रोगनिदान शिबिर हे मविप्र संस्थेतील सभासद व समाजातील वंचित घटकांसाठीच आयोजित केले जातात असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांनी प्रतिपादन केले ते मौजे सुकेणे ता,निफाड येथील अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत आयोजित येथील महादेव मंदिर सभागृहातील सर्व रोग निदान शिबिराप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपसभापती डी बी मोगल होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर ,तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख, महिला संचालक सौ शोभा बोरस्ते, शिक्षणाधिकारी डॉ डी डी लोखंडे, अतुल भंडारे,मोतीराम जाधव आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख उद्घाटक अँड ठाकरे यांनी वर्षभरातील जवळपास ३०० दिवस वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिरांचे आयोजन केले जाते त्यात प्रामुख्याने शासनाच्या योजनेचा लाभ रुग्णांना दिला जातो व अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिरुग्ण व अपघाती आजार, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग व बालरोग या व्याधींवर वैद्यकीय उपचार व मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात अशी ही माहिती दिली सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले प्रास्ताविक मौजे सुकेणेचे प्राचार्य रायभान दवंगे यांनी केले प्रमुख अतिथींचा सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, व कार्यक्रमाचे अध्यक्ष डी बी मोगल यांनी सर्व रोग निदान शिबिराचा लाभ गरजूंनी घेण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अँड ठाकरे यांना एक निवेदन देण्यात आले हे शिबिर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवीण वाघ, महेश बेंडकुळे व स्वप्निल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आले या शिबिरात एकूण ३५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ९५ रुग्णांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले शिबिरासाठी मौजे सुकेणे व पंचक्रोशीतील सभासद, रुग्ण, ग्रामस्थ, पालक,जय हनुमान मित्र मंडळ सदस्य, सप्ताह कमिटी सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार सरपंच सचिन मोगल यांनी मानले