Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

सरस्वती विद्यालयात ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा

सरस्वती विद्यालयात ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

नाशिक ( दि. १५ ) :- दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित सरस्वती विद्यालय, महात्मा गांधी, रोड नाशिक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह अतिशय जल्लोषात  साजरा  करण्यात आला.   याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री. प्रभाकरजी कुलकर्णी,सर सेक्रेटरी मा.श्री.हेमंतजी बरकले सर, अधिक्षिका श्रीमती सुरेखा कमोद मॅडम सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व स्कूल कमिटी सदस्य यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   लेझीमच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे चेअरमन मा.श्री.रवींद्रजी कदम सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.    यावेळी उपस्थित मान्यवर,शिक्षक,विद्यार्थी व पालक सर्वांनी  पंचप्राण शपथ घेतली.     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता समारोप वर्षानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले. 'आजादी का अमृत महोत्सव, 'हर घर तिरंगा' मोहिमे अंतर्गत  विद्यार्थ्यांनी

शालेय परिसरात प्रभात फेरी काढून ,घोषणा देत हर घर तिरंगा मोहिमेचा प्रचार केला. इ.१ ली व २ री  च्या विद्यार्थ्यांनी  भारताच्या स्वातंत्र्यावर आधारित सुंदर अशी नाटिका सादर केली.त्यांना शाळेतील शिक्षिका श्रीमती रंजना वैष्णव,श्रीमती स्वाती आंधळे,सौ.शितल चोथे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्त व क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या. शासनाच्या मेरी माटी,मेरा देश उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी मूठ मूठ माती आणूण कलशात टाकली.

      शाळेचे चेअरमन मा.श्री.रवींद्रजी कदम सर यांच्या अभिनव कल्पनेतून यंदाच्या स्वातंत्र्यदिनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाची कायमस्वरूपी आठवण रहावी यासाठी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.त्यांनी प्राथमिक शाळेतील कायमस्वरूपी स्मरणात राहणाऱ्या आठवणी,नागरीकांचे हक्क व जबाबदारी याविषयी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले.

       यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. अनुराधा बस्ते मॅडम, असिस्टंट सेक्रेटरी सौ.सरला तायडे मॅडम,स्कूल कमिटी सदस्य मा.श्री.विजय शिरसाट सर,मा.श्रीमती नयना कळमकर मॅडम,पा.शि.संघाचे अध्यक्ष, सकाळ सत्र प्रमुख मा.सौ.माधुरी जोशी,शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व नियोजन श्रीमती स्वाती आंधळे यांनी केले. सौ. जोत्स्ना जोशी,सौ.कविता ठाकरे,श्रीमती प्रिया कुंदे यांनी राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत, देशभक्तीपर गीत यांचे गायन केले.श्रीमती पुष्पा गांगुर्डे यांनी घोषणा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...