Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

कर्मवीर रावसाहेब थोरात जयंती निमित्त माहिती.

 कर्मवीर रावसाहेब थोरात जयंती विशेष  १३३ वी जयंती 

कर्मवीर रावसाहेब थोरात 
कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या बद्दल माहिती 
नाशिक तालुक्यात सुकेणे गावी जन्मलेल्या रावसाहेब भाऊसाहेब थोरात यांचे प्राथमिक शिक्षण वणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण नाशिकच्या ‘सेंट जॉर्जेस विद्यालय’ मध्ये झाले. तो काळ स्वातंत्र्य चळवळींचा होता. नव्या सामाजिक जाणिवांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले होते. शाळेत शिकत असताना बहुजन समाजातील पाच टक्के विद्यार्थी देखील शिक्षण घेत नाहीत हे रावसाहेबांच्या लक्षात आले. तेव्हा इंग्रजी सहावीत असताना रावसाहेबांंनी पिंपळगाव बसवंत येथील थोर समाजसेवक गणपतदादा मोरे ह्यांनी चालविलेल्या समाज जागृतीच्या कार्यास स्वत:ला वाहून घेतले. देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही. या विचाराने, श्रीमंत उदाजीराव महाराजांनी दिलेल्या देणगीतून या सर्व कार्यकर्त्यांनी १९१४ मध्ये ‘उदाजी मराठा वसतिगृहा’ची स्थापना केली. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ यापूर्वीच सुरू झाले होते. या मंडळाची ही पहिली संस्था रावसाहेबांनी नावारूपास आणली. या वसतिगृहात धुळे, जळगाव जिल्ह्यातून मुले जायची.

     राष्ट्रातील बहुजन समाजाला जडलेल्या अज्ञानरोगातून त्याची सुटका करणे या ध्येयाने रावसाहेबांनी लोकसेवेचे व समाज जागृतीचे काम सुरू केले. त्यासाठी ते ‘लोकशिक्षकांच्या’ भूमिकेतून नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी ग्रामसभा घेत, मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करीत, आर्थिक मदतही करीत. १९३६ मध्ये नाशिकमध्ये त्यांनी मराठा विद्यालयाची स्थापना केली. गोरे गल्लीत ही शाळा भरत असे.

     शिक्षणाच्या प्रसारासाठी शासनसंस्थेत बहुजन समाजातील माणसे असणे आवश्यक वाटल्याने रावसाहेबांनी निवडणूक लढविली व नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला. १९५२ पर्यंत हा कार्यभार सांभाळला. शिक्षणाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत आधुनिक व उदारमतवादी होता. आत्मशिक्षणाच्या योगाने ‘आत्मविकास करणे व त्या द्वारा आपला देश, आपले राष्ट्र यांच्या उन्नतीस हातभार लावणे म्हणजे शिक्षण’ ही त्यांची शिक्षणाची व्याख्या होती.

     भारतातील महिला ज्ञानसंपन्न झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पत्रे लिहिली ती ‘बोधामृत’ म्हणून प्रसिद्ध झाली. १९३७ च्या विधिमंडळाच्या निवडणूकीत रावसाहेब नाशिकमधून निवडून आले. नंतरच्या काळात डांग, पेठ, सुरगाणा ह्या आदिवासी विभागाचा त्यांनी कायापालट घडविला. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने १९४१ मध्ये ‘रावसाहेब’ पदवी दिली. पण सरकारी रावसाहेब म्हणून मिरवण्यापेक्षा ‘शेतकऱ्यांचे व गरिबांचे रावसाहेब’ राहण्यातच धन्यता मानणाऱ्या रावसाहेबांनी या पदवीचा त्याग केला. 
रावसाहेब थोरात हे संस्थेचे आद्य संस्थापक बहुजन समाजातील शिक्षणाची अत्यल्प प्रमाण पाहून राजश्री शाहू महाराज थोर समाजसेवक गणपत दादा मोरे कॅप्टन डी आर भोसले आणि कीर्तनराव निंबाळकर यांच्यासह बरोबर समाज जागृतीच्या कार्याने प्रभावित होऊन संस्थेच्या कार्याला वाहून गेले 1914 मध्ये नाशिक शहरातील इमारतीत वसतिगृह सुरू करून संस्थेचे रोपटे लावले तेव्हा ते अवघ्या 24 वर्षांचे होते त्यानंतर अखेर पर्यंत मोलाचे योगदान देत आयुष्यभर संस्थेच्या संगोपन व कार्यातून घेतले ग्रामीण भागात त्यांनी गावोगावी शिरोड शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याबाबत पालकांचे मन वळविले शेतकरी , ग्रामीण लोकांत  शिक्षणाचे महत्त्व बिंबवले 1941 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना रावसाहेब पदवी दिली त्यांचे कार्य याची माहिती तसेच नव्या पिढीला आदर्श व्हावा म्हणून केटीएचम महाविद्यालय नाशिक , माध्यमिक विद्यालय वडील कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुकेने , माध्यमिक शाळा मोहाडी आणि संस्थेच्या सभागृहास त्यांचे नाव दिले त्यांचा जन्मदिन संस्थेतर्फे समाज दिन म्हणून पाळला जातो ते नाशिक जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष होते मुंबई प्रांत विधिमंडळात 1937 आणि मुंबई राज्य विधानसभेत   1952 ते 56 त्यांनी आमदार म्हणून काम केले.  13 मार्च 1958 ला पहाटे त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

“डिप्लोमा vs १२वी: करिअर की सापळा? महाराष्ट्रातील शिक्षणाचे उघड वास्तव”

Diploma vs 12वी Engineering Admission 2025 | Lateral Entry Seats | Reservation Reality | JKMVS ...