Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

कसबे सुकेणेतील वृक्षप्रेमी सुधाकर सोनवणे यांच्याकडून शाळेला १९१ वृक्ष भेट

 कसबे सुकेणेतील वृक्षप्रेमी 

सुधाकर सोनवणे यांच्याकडून 

शाळेला १९१ वृक्ष भेट

 रासेयो व हरित सेनेकडून वृक्ष संवर्धनाची हमी

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाला वृक्षप्रेमी सुधाकर सोनवणे यांनी भेट दिलेल्या वृक्षांचे रोपण करताना प्राचार्य रायभान दवंगे,सुधाकर सोनवणे, रामनाथ गंभीरे व आदी


कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता,२०- कसबे सुकेणे ता निफाड येथील भूमिपुत्र व वृक्षप्रेमी श्री सुधाकर सोनवणे ह.मुक्काम नासिक यांच्याकडून जवळपास सहा हजार नऊशे वीस रुपयाची १९१ वेगवेगळया प्रकारचे वृक्ष मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे या शाळेला भेट देण्यात आले १९१ वृक्षांपैकी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना ५० वृक्ष भेट देण्यात आले त्यात रामफळ,सीताफळ, पारिजात,आवळा व कढीपत्ता या वृक्षांचा समावेश आहे तर शाळेसाठी १४१ दिली असून त्यात वड, ताम्हण, कदंब, पिंपळ, अर्जुन,रंगतरोहिडा, रवाना, जंगलबदाम, यांचा समावेश असून याशिवाय कुंडीमध्ये लावण्यासाठी रेडअरनथम, क्रोटोन,टेबलमाप,अरेकापाम, सॉंग ऑफ इंडिया,ड्रेसीना,रबर, गल्लेमिया,कोष्टीना या शोच्या रोपट्यांचाही समावेश आहे हे वृक्ष श्री सोनवणे यांनी विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे यांच्याकडे सुपूर्त केले असून विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व हरित सेनेच्या माध्यमातून शाळेच्या भव्य क्रीडांगणा भोवती या वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी रासेयो व हरित सेनेने या वृक्षांची जोपासना व संवर्धन करण्याची हमी घेतली असून विद्यालयातील प्रत्येक वर्गाने दोन वृक्ष दत्तक घेतले असून या वर्गाच्या माध्यमातून या वृक्षांची जोपासना केली जाणार आहे या वृक्षांसाठी कसबे सुकेणेतील माजी विद्यार्थी राजेंद्र गांगुर्डे यांनी ड्रिलच्या सहाय्याने मोफत खड्डे पाडून दिले तर या खड्ड्यांसाठी विषमुक्त शेणखत व माती पुरवण्याचे काम विषमुक्त प्रयोग शेतकरी श्याम मोगल यांनी केले तर विद्यालयाच्या आवारात शो चे वृक्ष लावण्यासाठी ४० कुंड्या भेट देण्याचे काम स्कूल कमिटीचे सदस्य रामराव मोगल यांनी केले या सर्व दानशूर व्यक्तींचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन मविप्र संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल व प्राचार्य रायभान दवंगे यांनी आभार मानले याप्रसंगी रासेयो प्रमुख प्रा दिनकर वाघ, हरित सेना प्रमुख महेंद्र हुजरे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे ,ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, अभिनवच्या मुख्याध्यापिका श्रीम सुवर्णा ठाकरे, क्रीडा शिक्षक दिलीप काळे,अनिल उगले सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

  वृक्ष संवर्धन काळाची गरज असून वृक्ष संवर्धन करण्याचे काम खऱ्या अर्थाने विद्यार्थी रुपी भावी पिढीकडूनच होणार असून त्यासाठी शाळांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन व्हावे ही अपेक्षा आहे त्यासाठी शाळेला वृक्ष भेट दिले 

- श्री सुधाकर सोनवणे, वृक्षप्रेमी कसबे सुकेणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...