Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

बुधवार, २६ जुलै, २०२३

आज आशा गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर मोर्चा

आज आशा गटप्रवर्तकांचा

 आझाद मैदानावर मोठा 

मोर्चा ! या आहेत मागण्या 



दि. २६ / ०७ / २०२३ 
मुंबई: आशा गट प्रवर्तक च्या मागणीसाठी भव्य मोर्चा धरणे आंदोलन कृती समिती च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातून मोठ्या संख्येने आशा गट प्रवर्तक उपस्थित होत्या. आशा गट प्रवर्तक ना किमान वेतन लागू करा, गट प्रवर्तक, आशा ना शासकिय कर्मचारी दर्जा , गट प्रवर्तक ना शासकिय दर्जा देयी पर्यंत त्वरित कंत्राटी कर्मचारी म्हणून सर्व लाभ त्वरित द्या. दीपावली ला बोनस द्या, दरमहा ५तारखेच्या आता एकत्रित मोबदला द्या. आदि घोषणा नी परिसर दनानला. आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत मुंबई नसल्यामुळे भेट होऊ शकली नाही . येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चात देण्यात आला. 9आगस्ट रोजी प्रत्यक जील्यात मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकार कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे. याचा निषेध करण्यात येणार आहे. असा निर्णय घेण्यात आला. व खालील मागण्या करण्यात आल्या.



 महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना खालील प्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत.
महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांत ७० हजार आशा व ४००० गटप्रवर्तक कार्यरत आहेत त्यांना कामावर आधारीत मोबदला मिळतो. तो सुध्दा अत्यंत कमी मिळतो. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्वाचे काम करीत असुन त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासनाने आयोजिलेल्या आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा मोलाचा वाटा आहे. प्रतिकुल परिस्थितीतसुदधा आशा स्वयसेविका व गटप्रवर्तक नेटाने सक्षमपणे कामे करतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांची नेमणुक भारतीय संविधानाच्या ४७ कलमातील पुर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांचे काम कायमस्वरुपी आहे. म्हणुन त्यांना मानसेवी मानधनी स्वयंसेविका समजणे अयोग्य आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची पदे कायद्यानुसार निर्माण केलेली (Statutory post) पदे आहेत. म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासनाचे कर्मचारी असुन केंद्र/राज्य सरकार त्यांचे मालक आहे व राष्ट्रीय आरोग्य अभियान ही आस्थापना आहे. त्यांना मिळणाऱ्या मानधनाला मोबदला म्हणुन संबोधणे योग्य नाही, ते वेतन आहे. म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देवुन त्यांना अनुषंनिक सर्व फायदे देण्यात यावे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या खालीलाप्रमाणे मागण्या आहेत, त्या विनाविलंब मान्य कराव्यात, ही विनंती. गटप्रवर्तकांच्या मागण्या :-
• राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचान्याइतके काम करावे लागते. तरीसुदधा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मिळत नाही. गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारीत मोबदला मिळतो. तोही अत्यल्प आहे. त्यांना मिळणारा मोबदला बहुतांश प्रवासावर खर्च होतो. त्यांच्या प्रपंचासाठी हातात रक्कम शिल्लक राहात नाही. या बाबीचा विचार करुन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी व त्यानुषंगाने मिळणारे इतर लाभ देण्यात यावेत.
• गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धिनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धिनी अंतर्गत आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करायला सांगतात. त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करून दरमहा १५००/- रु मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा.
• गट प्रवर्तकांना डेटा एन्ट्रीकरीता प्रतिदिन रु.५० याप्रमाणे एकुण ५ दिवसांकरीता प्रति महा रु.२५०
सन २०२०-२१ च्या पीआयपीमध्ये मंजुर केल्याचे दि. २१ नोव्हेंबर २०२० च्या शासन परिपत्रकादवारे आदेशीत केले आहे. परंतु सदर मोबदला गट प्रवर्तकांना दिला जात नाही. आशा सॉफटवेअर जरी
सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा एप्रील २०२० पासुन प्रति महा रु. २५०/- गट प्रवर्तकांना त्वरीत अदा करण्यात यावेत.
• गटप्रवर्तकांना वीस दिवस दौरे करून पाच दिवस पी.एच.सी.त अहवाल तयार करावा लागतो. दुर्गम अतिदुर्गम भागात वाहनांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांना दौरे करण्यासाठी स्कुटर देण्यात यावी. गटप्रवर्तकांना दर आकरा महिन्यांनी नेमनुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमनुकीचे लेखी आदेश देण्यात यावेत.
• आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या:- ६. आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत आशा स्वंयसेविकांना दरमहा १८००० रु. व गटप्रवर्तकांना २६००० रु. मानधन देण्यात यावे. १० एप्रील २०२३ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात एप्रील २०२३ पासुन १५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी.
• आशा स्वयंसेविकांचे व गटप्रवर्तकाचे कामावर आधारीत मोबदल्याचे दर ५-६ वर्षापुर्वी ठरवलेले आहेत. त्यानंतर महागाई दुपटी-तिपटीने वाढली. परंतु त्या दरामध्ये बदल केलेला नाही. वाढलेल्या महागाईच्या
प्रमाणांत कामावर आधारीत मोबदल्याचे दर वाढवुन देण्यात यावे. केंद्र सरकारने 2019पासून आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ केली नाही.त्वरित केंद्र सरकारने मोबदला वाढ करावी.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दर वर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्याएवढा बोनस देण्यात यावा. 
• आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी. दि. २३ जुन २०२१ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याशी कृति समितीची बैठक झाली. सदर बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्याबाबत, त्यांच्या सेवाशर्ती ठरवण्यासाठी आरोग्य विभाग, यशदा व कृति समिती पदाधिकारी यांची समिती गठीत करायचे ठरले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
• केंद्र निधी (पीआयपी) आणि राज्य निधी मधुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांचा मोबदला दिला जातो. तो एकत्रित व दरमहा नियमित पाच तारखेच्या आत देण्यात यावा.
*गट प्रवर्तक ना दररोज सक्तीने आरोग्य उप केंद्रात हजेरी व सेल्फी सक्ती करु नये. सन्मानाची वागणूक द्या 
• आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना भर पगारी प्रसूती रजा सहा महिना करता देण्यात यावी
•नागरी भागातील अशांचे महिला आरोग्य समिती (MAS) स्थापन असल्यामुळे त्यांच्या मोबदल्यात कपात केली जाते. सदर समिती स्थापन करण्याची जबाबदारी ही अधिकारी वर्गाची असुन त्यांच्या हयगईमुळे आशांचे नुकसान होत आहे. तेव्हा आशांच्या मोबदल्या काटछाट करु नये.
•आरोग्य वर्धिनी अंतर्गत थुंकी नमुना घेण्याकरीता मोबदला दिला जात नसताना सुदधा आशांना सक्तीने थुंकी नमुना घ्यायला सांगितले जाते. जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत थुंकी नमुना घेण्यासाठी आशांना सक्ती करू नये. 
*आशा ना सन्मानाची वागणूक द्या . शहरी आशा, गट प्रवर्तक रिक्त जागा त्वरित भरा. थकीत मानधन मोबदला त्वरित द्या.
•आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना विनामोबदला कामे सांगण्यात येवु नये.
•आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना एक महिन्याची आजारी रजा देण्यात यावी.
वरील प्रश्नांची सोडवणुक व्हावी, यासाठी दि. २६/०७/२०२३ रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे झाला. मोर्चास एम् ए पाटील, कॉ. राजू देसले, आनंदी अवघडे, निलेश दातखिळे, मुगाजी बुरुड, राजेश सिंग आरमती, आदिनी मार्गदर्शन केले.


रविवार, २३ जुलै, २०२३

मणिपूरात झालेल्या अत्याचाराविरोधात नाशकात मूक मोर्चा

मणिपूरात महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात नाशकात मूक मोर्चा  ! 



नाशिक:- मणिपूर मध्ये झालेल्या क्रुर घटनेमुळे सर्व भारतीयांसमोर एक नवीन आव्हान समोर आले आहे. त्याचा सामना करुना सांविधानिक मूल्य बळकट करणे गरजेचे आहे. यानिमित्ताने विचारपूर्वक नाशिक शहरात आम्ही भारताचे लोक या नावाने मंगळवार दिनांक २५ जुलै २०२३ रोजी दुपारी ४:०० सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळून नेहरू गार्डन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जुने सीबीएस येथे होणार असून तरी संवेदनशील नागरिकांनी या घटनेविरूध्द  एकत्र येऊन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

मंगळवार, १८ जुलै, २०२३

स्वातंत्र्य सैनिक कॉ.माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार २०२३ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर

 स्वातंत्र्य सैनिक कॉ. 

माधवराव गायकवाड 

जीवनगौरव पुरस्कार 

२०२३ माजी मंत्री 

बाळासाहेब थोरात यांना

 जाहीर 

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात 


मनमाड: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या94व्या वर्षी निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात हि छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष होते 25 वर्ष पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेचे8 शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळालेत आहेत, नांदगाव विधानसभेचे आमदार, 6 वर्ष विधांपरिषेद , विरोधी पक्षनेते, भाकप चे12 वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे 15 वर्ष अद्यक्ष पद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत 75 वर्ष योगदान दिले आहे. 
 कॉम्रेड माधवराव गायकवाड(बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक शेती, सहकार चळवळ, कामगार क्षेत्र आदी संदर्भात उपक्रम राबविले जातात. आज कॉम्रेड माधवराव गायकवाड 5 व्या स्मृतिदिनी


2023ह्या वर्षी कॉम्रेड माधवराव गायकवाड 5 व्यां स्मृती जीवनगौरव पुरस्कारसाठी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (संगमनेर) निवड केली आहे. रोख रक्कम 51हजार रुपये स्मृती चिन्ह, गौरवपत्र ,शाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . सदर पुरस्कार वितरण नोव्हेंबर महिन्यात कर्मभूमीत संगमनेर येथे कॉ. माधवराव गायकवाड बाबूजी स्मृती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या आधी हा पुरस्कार खा. राजू शेट्टी, कॉ. एम ए पाटील, कॉ. मोहन शर्मा, कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. सू कुमार दामले यांना देण्यात आला आहे. अशी माहिती पत्रकार परिषद मनमाड येथे संस्थेच्या अध्यक्षा अॅड. साधना गायकवाड, सचिव कॉ. राजू देसले, यांनी दिली.विश्वस्त भास्कर शिंदे, दामू अण्णा पाटील, श्याम गरुड, व्ही डी धनवटे, सुभाष बेदमुथा, शबूशेट शिरसाठ, दत्तू तुपे, रिकब जैन, निखिल स्वर्गे, डॉ रामदास भोंग, देविदास भोपळे , साहेबराव गंभीरे किरण डावखर आदी उपस्थित होते.
कॉ. माधवराव गायकवाड 


 कॉ. माधवराव गायकवाड जयंती शतक महोत्सव वर्ष १८ जुलै ते १८ जुलै २०२४ राज्यभर साजरे केले जाणार आहे. या निमीत्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शेतकरी चळवळ, सहकार, क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव ग्रंथ संपादित करण्यात येणार, विवीध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात करण्यात येणार आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य चे पहिले विरोधी पक्षनेते विधान परिषद होते. त्यांचे येथोचीत स्मारक मनमाड येथे महाराष्ट्र शासन ने उभारावे पूर्णाकृती पुतळा बसवावा. अशी मागणी करत आहोत.

मोठी बातमी :- नाशिक शहरात बांधलेली जवाहरलाल नेहरू घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे सदोष !

 मोठी बातमी :- नाशिक शहरात

 बांधलेली जवाहरलाल नेहरू 

घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे

 सदोष ! ; आंदोलनाचा इशारा


नाशिक शहरातील जवाहरलाल नेहरू शहरी पुनरूत्थान अभियांनांतर्गत वडाळागावातील सावित्रीबाई फुले वसाहत घरकुल यामधील विविध समस्यांवर रहिवाशांनी दि‌. १७ जुलै रोजी महापालिकेस निवेदन सादर केले. महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित नसल्याने तसेच इन्चार्ज श्री. चौधरी हे सुध्दा दौऱ्यावर असल्याने शिष्टमंडळाला दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण विभाग उपायुक्त श्रीमती. करूणा डहाळे यांना भेटून सदर प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. सदर प्रश्न विभागाशी संबंधित नसला तरीही संबंधित विभागाला तशा प्रकारच्या सूचना देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सदरच्या तसेच निवेदकांनी सदर प्रकरणी येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप लिंगायत, अॅड. कृष्णा शिलावट, अॅड. नीलकमल सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते किरण नीतनवरे तसेच महिला रहिवासी उपस्थित होते.

नाशिक महापालिकेला दिलेल्या निवेदनात काय म्हटले ? 


प्रति 
माननीय आयुक्त
नाशिक महानगरपालिका नाशिक.
राजीव गांधी भवन, शरणपूर रोड.
नाशिक.
विषय: नाशिक शहरातील जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत वडाळा गावातील सावित्रीबाई फुले वसाहत घरकुल यामधील विविध समस्यांबाबत अर्ज तथा निवेदन.
अर्जदार तथा निवेदक: सावित्रीबाई फुले नगर वडाळा गाव. घरकुल योजना.
महोदय, 

आम्ही खाली सह्या करणारे रहिवाशी विनंतीपूर्वक अर्ज करतो तो येणेप्रमाणे;
1) नाशिक महानगरपालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत वडाळा गाव येथील सावित्रीबाई फुले नगरातील झोपडी वासियांसाठी घरकुल योजना सन 2016 मध्ये रहिवाशांना सदनिका देऊन राबविण्यात आली.
2) सदर योजनेअंतर्गत एकूण नऊ इमारतींमध्ये एकूण 720 सदनिकांमध्ये रहिवासी राहतात. सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे इमारती व सदनिका यांना तडे पडले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात सदनिकांमध्ये लिकेज झालेली आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो.
3) येथील सदनिका व इमारतीला पडलेले तळे व निकृष्ट बांधकाम त्याचप्रमाणे विविध समस्यांबाबत येथील रहिवाशांनी सन 2019 मध्ये रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्याबाबत मनपाला निवेदन देण्यात आलं होतं. परंतु त्याबाबत कोणतीही दखल मनपाने घेतलेली नाही.
4) आज रोजी येथील समस्यां मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. येथील सदनिकांमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तसेच सांडपाण्याची सदोष व्यवस्था असल्यामुळे वारंवार चोकअप होते. व सर्व वसाहतीमध्ये दुर्गंधी व आरोग्यास धोका निर्माण होईल अशी अस्वच्छता निर्माण झालेली आहे.
5) येथील भुयारी गटारीची व्यवस्था कोलमडली असून रहिवाशांना येथील . रहिवाशांना येथील भुयारी गटारीची देखभाल व्यवस्था करणे हे त्यांच्या आवाक्या बाहेरगेली आहे. कारण येथील रहिवाशी हे कामगार कष्टकरी हातावर पोट भरणारेअसल्याने आर्थिक खर्च करू शकत नाही. सदरच्या ड्रेनेज चोकअपमुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
6) येथील रहिवाशांनी येथे स्वच्छता अभियान मनपाने राबवावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु मनपाने त्याची दखल घेतली नाही. याउलट इंदिरानगर विभागातील उच्चभ्रूंच्या सोसायट्यांमध्ये मनपा ने स्वतःहून अनेक वेळा स्वच्छता अभियान राबविले होते व राबवित आहे. तसेच शहरातील अनेक घरकुल योजनेमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाते. परंतु सावित्रीबाई फुले घरकुल योजनेमध्ये मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासन हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहे.
यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. तसेच इथे आजाराचे प्रमाण ही वाढलेले आहे.
सबब विनंती की,
अ. सावित्रीबाई फुले घरकुल योजनेतील इमारती व सदनिकांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात यावी.
आ. येथील भुयारी गटारीची स्वच्छता व चोकप दुरुस्त करण्यात यावे.
इ. येथील घरकुल वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान मनपातर्फे राबविण्यात यावे.
वरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्यात येऊन तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा रहिवाशांतर्फे येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
हे निवेदन तथा अर्ज.

रविवार, १६ जुलै, २०२३

छत्रपती पतसंस्थाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ

 छत्रपती पतसंस्थाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ



नाशिक: छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था नाशिक शाखा वतीने 30 वर्धापदिनानिमित्त व संस्थापक अध्यक्ष कॉ. माधवराव गायकवाड यांच्या ९९ जयंतनिमित्त दि. १६ जुलै २०२३रोजी सकाळीं १० वा. संस्था सभासद, ठेवीदार गुणवंत पाल्यांना सत्कार संस्थेच्या मेघदूत शॉपिंग सेंटर नाशिक कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सुनील ढिकले व कार्याध्यक्ष पदी मा. नारायण शेठ वाजे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सभासद सुवर्णा देसले यांना पी एच डी प्राप्त पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी प्रमूख म्हणून मार्गदर्शन करताना डॉ ढिकले यांनी छत्रपती नाशिक जिल्हा पतसंस्था 30वर्षा पासून नाशिक जिल्हा मध्ये सर्वसामान्य सभासदांना पुरवठा करून विकासाला चालना देत आहे. या बद्दल अभिनंदन केले. ८ शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्या सैनिक माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांच्या कार्याला सलाम केला. संस्थेच्या हा सभासद पाल्य गुणगौरव समारंभ नक्कीच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पत संस्था फेडरेशन नवं निर्वाचित जिल्हा अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांनी केले. नारायण वाजे यांनी सहकार चळवळीतील सभासद चे महत्व सांगितले. छत्रपती पतसंस्था चांगले काम करतं आहे. या बद्दल कौतुक केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन अॅड.साधना गायकवाड होत्या. त्यांनी कॉ. माधवराव गायकवाड यांचे सहकार शेत्रातील कार्याची माहिती दिली. पुढील वर्ष कॉ.माधवराव गायकवाड यांचे 100वा. जयंती आहे. या निमित्ताने शेतकरी, कामगार, सहकार विषयावर मंधन आयोजित करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आनंद वेक्त केला.मंचावर व्हा.चेअरमन अॅड. शिवाजी जाधव, संचालक अॅड. दत्ता निकम, कॉ. राजू देसले, धर्मेंद्र जाधव, भागवत पाटील, श्याम गरुड, ओझर वेवस्थपक अण्णा गुर्गुडे, चारुदत्त पवार प्रा.सोमनाथ मुठाळ, अॅड. रिकब जैन संस्थेचे सभासद, अल्प बचत खातेदार, ठेवीदार उपास्थित होतें 
 सूत्र संचलन संचालक राजू देसले यांनी केले प्रास्ताविक चारुदत्त पवार यांनी केले. आभार शशिकिरन साखला यांनी केले. स्वागत भालचंद्र देसले, किरण मालुंजकर, राकेश वालझडे, रामदास बेंडकोली , रोहित कर्पे,
श्रीमाल यांनी केले. 
 आपले
 ॲड दत्ता निकम कॉ राजू देसले संचालक
चारुदत्त पवार वेवस्थापक
अल्प बचत प्रतिनिधि कर्मचारी कर्मचारी वर्ग

गुरुवार, १३ जुलै, २०२३

महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा

महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा 

नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०२३ आहे. यासाठी लाखोपर्यंतची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहिती पुढीलप्रमाणे:
!! *मर्यादित प्रवेश*!! *मर्यादित प्रवेश*!!
*📖महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परिक्षा.📖*
*🎖️प्रथम पारितोषिक🎖(1,00,000 रुपये.)*
*🥈द्वितीय पारितोषिक🥈(50,000 रुपये.)*
*🥉तृतीय पारितोषिक तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी (10,000 रुपये) देण्यात येणार आहे.*
*तसेच सहभागी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.*
*या स्पर्धा परीक्षेत 7वी, 8वी, 9वी, व ,10वी. च्या विध्यार्थांना सहभागी होता येईल.*
👉 *नोंदणी करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2023*
 स्पर्धेवर उभा राहिलेले युग लक्षात घेऊनच आम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत *✒" महात्मा जोतीराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा”✒*📚📖 
*ती विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, शहाणपण, वाढवेल.*
👉 *नोंदणी करण्यासाठी*-
*संकेतस्थळ:* www.ecisindia.com
*Email:* info@ecisindia.com
*Help Desk number-*  9172764707 / 8208027943.       या उपक्रमास आपण खालील प्रमाणे सहकार्य व मदत करू शकता          

  १) आपण महात्मा जोतीराव फुले यांचा विचार जागर परीक्षेची माहिती विविध ग्रुपवर अधिक अधिक विद्यार्थी यांचे पर्यंत पोहचवू शकता    २) आर्थिक अडचणी अभावी काही विद्यार्थि परीक्षेस बसू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांचे प्रायोजत्व स्वीकारून ह्या उपक्रमास सहकार्य करू शकता.                               ३) महात्मा जोतीराव फुले यांचे अनुयायी किमान १ विद्यार्थी साठी मदत करू शकता.                                        ४) स्पर्धा कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा असल्याने जिल्ह्यातील आपल्या परिचित किमान ५ शाळांना या उपक्रमा बाबत अवगत करावे 🙏🏻
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७५०/- रूपयांची नोंदणी प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. 

सुरज मांढरेंच्या नावाचे फेक इंस्टा अकाउंट !

 सुरज मांढरेंच्या नावाने फेक इंस्टा अकाउंट ? 

महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त मा.श्री. सुरज मांढरे 




महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. सुरज मांढरे यांच्या नावाने एका अज्ञाताने  इंस्टाग्रामवर फेक  अकाउंट बनवले आहे.  ह्या प्रोफाईलवर ११६ फॉलोवर आहे. हे अकाउंट पूर्णपणे बनावट असल्याचे समजते . ह्या अकाउंट वरून अनेक जणांना संदेश गेले असतील अज्ञाताचा ह्यामागे काय उद्देश आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मिडियावरचा वाढता कल लोकांच्या खासगी जीवनावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. सर्व नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. प्रशासन याबाबत एवढी निष्काळजीपणा करतात का ? कोणत्याही सरकारी अधिकारी ह्यांचे बनावट सोशल मिडियावर अकाउंट बनवणे हा फार मोठा गुन्हा आहे . 




मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...