Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

बुधवार, २६ जुलै, २०२३

आज आशा गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर मोर्चा

आज आशा गटप्रवर्तकांचा

 आझाद मैदानावर मोठा 

मोर्चा ! या आहेत मागण्या 



दि. २६ / ०७ / २०२३ 
मुंबई: आशा गट प्रवर्तक च्या मागणीसाठी भव्य मोर्चा धरणे आंदोलन कृती समिती च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातून मोठ्या संख्येने आशा गट प्रवर्तक उपस्थित होत्या. आशा गट प्रवर्तक ना किमान वेतन लागू करा, गट प्रवर्तक, आशा ना शासकिय कर्मचारी दर्जा , गट प्रवर्तक ना शासकिय दर्जा देयी पर्यंत त्वरित कंत्राटी कर्मचारी म्हणून सर्व लाभ त्वरित द्या. दीपावली ला बोनस द्या, दरमहा ५तारखेच्या आता एकत्रित मोबदला द्या. आदि घोषणा नी परिसर दनानला. आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत मुंबई नसल्यामुळे भेट होऊ शकली नाही . येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चात देण्यात आला. 9आगस्ट रोजी प्रत्यक जील्यात मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकार कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे. याचा निषेध करण्यात येणार आहे. असा निर्णय घेण्यात आला. व खालील मागण्या करण्यात आल्या.



 महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना खालील प्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत.
महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांत ७० हजार आशा व ४००० गटप्रवर्तक कार्यरत आहेत त्यांना कामावर आधारीत मोबदला मिळतो. तो सुध्दा अत्यंत कमी मिळतो. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्वाचे काम करीत असुन त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासनाने आयोजिलेल्या आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा मोलाचा वाटा आहे. प्रतिकुल परिस्थितीतसुदधा आशा स्वयसेविका व गटप्रवर्तक नेटाने सक्षमपणे कामे करतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांची नेमणुक भारतीय संविधानाच्या ४७ कलमातील पुर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांचे काम कायमस्वरुपी आहे. म्हणुन त्यांना मानसेवी मानधनी स्वयंसेविका समजणे अयोग्य आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची पदे कायद्यानुसार निर्माण केलेली (Statutory post) पदे आहेत. म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासनाचे कर्मचारी असुन केंद्र/राज्य सरकार त्यांचे मालक आहे व राष्ट्रीय आरोग्य अभियान ही आस्थापना आहे. त्यांना मिळणाऱ्या मानधनाला मोबदला म्हणुन संबोधणे योग्य नाही, ते वेतन आहे. म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देवुन त्यांना अनुषंनिक सर्व फायदे देण्यात यावे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या खालीलाप्रमाणे मागण्या आहेत, त्या विनाविलंब मान्य कराव्यात, ही विनंती. गटप्रवर्तकांच्या मागण्या :-
• राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचान्याइतके काम करावे लागते. तरीसुदधा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मिळत नाही. गटप्रवर्तकांना दौऱ्यावर आधारीत मोबदला मिळतो. तोही अत्यल्प आहे. त्यांना मिळणारा मोबदला बहुतांश प्रवासावर खर्च होतो. त्यांच्या प्रपंचासाठी हातात रक्कम शिल्लक राहात नाही. या बाबीचा विचार करुन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी व त्यानुषंगाने मिळणारे इतर लाभ देण्यात यावेत.
• गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धिनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धिनी अंतर्गत आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करायला सांगतात. त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करून दरमहा १५००/- रु मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा.
• गट प्रवर्तकांना डेटा एन्ट्रीकरीता प्रतिदिन रु.५० याप्रमाणे एकुण ५ दिवसांकरीता प्रति महा रु.२५०
सन २०२०-२१ च्या पीआयपीमध्ये मंजुर केल्याचे दि. २१ नोव्हेंबर २०२० च्या शासन परिपत्रकादवारे आदेशीत केले आहे. परंतु सदर मोबदला गट प्रवर्तकांना दिला जात नाही. आशा सॉफटवेअर जरी
सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा एप्रील २०२० पासुन प्रति महा रु. २५०/- गट प्रवर्तकांना त्वरीत अदा करण्यात यावेत.
• गटप्रवर्तकांना वीस दिवस दौरे करून पाच दिवस पी.एच.सी.त अहवाल तयार करावा लागतो. दुर्गम अतिदुर्गम भागात वाहनांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांना दौरे करण्यासाठी स्कुटर देण्यात यावी. गटप्रवर्तकांना दर आकरा महिन्यांनी नेमनुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमनुकीचे लेखी आदेश देण्यात यावेत.
• आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या:- ६. आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागु करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत आशा स्वंयसेविकांना दरमहा १८००० रु. व गटप्रवर्तकांना २६००० रु. मानधन देण्यात यावे. १० एप्रील २०२३ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात एप्रील २०२३ पासुन १५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी.
• आशा स्वयंसेविकांचे व गटप्रवर्तकाचे कामावर आधारीत मोबदल्याचे दर ५-६ वर्षापुर्वी ठरवलेले आहेत. त्यानंतर महागाई दुपटी-तिपटीने वाढली. परंतु त्या दरामध्ये बदल केलेला नाही. वाढलेल्या महागाईच्या
प्रमाणांत कामावर आधारीत मोबदल्याचे दर वाढवुन देण्यात यावे. केंद्र सरकारने 2019पासून आशा गट प्रवर्तक ना मोबदला वाढ केली नाही.त्वरित केंद्र सरकारने मोबदला वाढ करावी.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दर वर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्याएवढा बोनस देण्यात यावा. 
• आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी. दि. २३ जुन २०२१ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याशी कृति समितीची बैठक झाली. सदर बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्याबाबत, त्यांच्या सेवाशर्ती ठरवण्यासाठी आरोग्य विभाग, यशदा व कृति समिती पदाधिकारी यांची समिती गठीत करायचे ठरले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
• केंद्र निधी (पीआयपी) आणि राज्य निधी मधुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांचा मोबदला दिला जातो. तो एकत्रित व दरमहा नियमित पाच तारखेच्या आत देण्यात यावा.
*गट प्रवर्तक ना दररोज सक्तीने आरोग्य उप केंद्रात हजेरी व सेल्फी सक्ती करु नये. सन्मानाची वागणूक द्या 
• आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना भर पगारी प्रसूती रजा सहा महिना करता देण्यात यावी
•नागरी भागातील अशांचे महिला आरोग्य समिती (MAS) स्थापन असल्यामुळे त्यांच्या मोबदल्यात कपात केली जाते. सदर समिती स्थापन करण्याची जबाबदारी ही अधिकारी वर्गाची असुन त्यांच्या हयगईमुळे आशांचे नुकसान होत आहे. तेव्हा आशांच्या मोबदल्या काटछाट करु नये.
•आरोग्य वर्धिनी अंतर्गत थुंकी नमुना घेण्याकरीता मोबदला दिला जात नसताना सुदधा आशांना सक्तीने थुंकी नमुना घ्यायला सांगितले जाते. जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत थुंकी नमुना घेण्यासाठी आशांना सक्ती करू नये. 
*आशा ना सन्मानाची वागणूक द्या . शहरी आशा, गट प्रवर्तक रिक्त जागा त्वरित भरा. थकीत मानधन मोबदला त्वरित द्या.
•आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना विनामोबदला कामे सांगण्यात येवु नये.
•आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना एक महिन्याची आजारी रजा देण्यात यावी.
वरील प्रश्नांची सोडवणुक व्हावी, यासाठी दि. २६/०७/२०२३ रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे झाला. मोर्चास एम् ए पाटील, कॉ. राजू देसले, आनंदी अवघडे, निलेश दातखिळे, मुगाजी बुरुड, राजेश सिंग आरमती, आदिनी मार्गदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...