Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, १८ जुलै, २०२३

मोठी बातमी :- नाशिक शहरात बांधलेली जवाहरलाल नेहरू घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे सदोष !

 मोठी बातमी :- नाशिक शहरात

 बांधलेली जवाहरलाल नेहरू 

घरकुल योजनेंतर्गत बांधलेली घरे

 सदोष ! ; आंदोलनाचा इशारा


नाशिक शहरातील जवाहरलाल नेहरू शहरी पुनरूत्थान अभियांनांतर्गत वडाळागावातील सावित्रीबाई फुले वसाहत घरकुल यामधील विविध समस्यांवर रहिवाशांनी दि‌. १७ जुलै रोजी महापालिकेस निवेदन सादर केले. महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित नसल्याने तसेच इन्चार्ज श्री. चौधरी हे सुध्दा दौऱ्यावर असल्याने शिष्टमंडळाला दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण विभाग उपायुक्त श्रीमती. करूणा डहाळे यांना भेटून सदर प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. सदर प्रश्न विभागाशी संबंधित नसला तरीही संबंधित विभागाला तशा प्रकारच्या सूचना देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सदरच्या तसेच निवेदकांनी सदर प्रकरणी येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप लिंगायत, अॅड. कृष्णा शिलावट, अॅड. नीलकमल सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते किरण नीतनवरे तसेच महिला रहिवासी उपस्थित होते.

नाशिक महापालिकेला दिलेल्या निवेदनात काय म्हटले ? 


प्रति 
माननीय आयुक्त
नाशिक महानगरपालिका नाशिक.
राजीव गांधी भवन, शरणपूर रोड.
नाशिक.
विषय: नाशिक शहरातील जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत वडाळा गावातील सावित्रीबाई फुले वसाहत घरकुल यामधील विविध समस्यांबाबत अर्ज तथा निवेदन.
अर्जदार तथा निवेदक: सावित्रीबाई फुले नगर वडाळा गाव. घरकुल योजना.
महोदय, 

आम्ही खाली सह्या करणारे रहिवाशी विनंतीपूर्वक अर्ज करतो तो येणेप्रमाणे;
1) नाशिक महानगरपालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत वडाळा गाव येथील सावित्रीबाई फुले नगरातील झोपडी वासियांसाठी घरकुल योजना सन 2016 मध्ये रहिवाशांना सदनिका देऊन राबविण्यात आली.
2) सदर योजनेअंतर्गत एकूण नऊ इमारतींमध्ये एकूण 720 सदनिकांमध्ये रहिवासी राहतात. सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे इमारती व सदनिका यांना तडे पडले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात सदनिकांमध्ये लिकेज झालेली आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो.
3) येथील सदनिका व इमारतीला पडलेले तळे व निकृष्ट बांधकाम त्याचप्रमाणे विविध समस्यांबाबत येथील रहिवाशांनी सन 2019 मध्ये रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्याबाबत मनपाला निवेदन देण्यात आलं होतं. परंतु त्याबाबत कोणतीही दखल मनपाने घेतलेली नाही.
4) आज रोजी येथील समस्यां मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. येथील सदनिकांमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तसेच सांडपाण्याची सदोष व्यवस्था असल्यामुळे वारंवार चोकअप होते. व सर्व वसाहतीमध्ये दुर्गंधी व आरोग्यास धोका निर्माण होईल अशी अस्वच्छता निर्माण झालेली आहे.
5) येथील भुयारी गटारीची व्यवस्था कोलमडली असून रहिवाशांना येथील . रहिवाशांना येथील भुयारी गटारीची देखभाल व्यवस्था करणे हे त्यांच्या आवाक्या बाहेरगेली आहे. कारण येथील रहिवाशी हे कामगार कष्टकरी हातावर पोट भरणारेअसल्याने आर्थिक खर्च करू शकत नाही. सदरच्या ड्रेनेज चोकअपमुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
6) येथील रहिवाशांनी येथे स्वच्छता अभियान मनपाने राबवावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु मनपाने त्याची दखल घेतली नाही. याउलट इंदिरानगर विभागातील उच्चभ्रूंच्या सोसायट्यांमध्ये मनपा ने स्वतःहून अनेक वेळा स्वच्छता अभियान राबविले होते व राबवित आहे. तसेच शहरातील अनेक घरकुल योजनेमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाते. परंतु सावित्रीबाई फुले घरकुल योजनेमध्ये मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासन हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहे.
यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. तसेच इथे आजाराचे प्रमाण ही वाढलेले आहे.
सबब विनंती की,
अ. सावित्रीबाई फुले घरकुल योजनेतील इमारती व सदनिकांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात यावी.
आ. येथील भुयारी गटारीची स्वच्छता व चोकप दुरुस्त करण्यात यावे.
इ. येथील घरकुल वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान मनपातर्फे राबविण्यात यावे.
वरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्यात येऊन तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा रहिवाशांतर्फे येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
हे निवेदन तथा अर्ज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...