Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, ११ जुलै, २०२३

१३ वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचे सुयश.

 १३वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिपमध्ये नाशिकचे सुयश.



नाशिक:- नुकतीच नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दि‌. ८ व ९ जुलै २०२३ या कालावधीत १३वी राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत नाशिकच्या स्पर्धकांनी अनेक पदके जिंकली. ह्यात नाशिकचा महेश देवकर , विष्णू देवकर व ओम मोरे यांनी रेगु ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले व १७ ते ४५ ह्या वयोगटात फाईट ह्या खेळाच्याप्रकारात कु. सलोनी बिडवे व दिवेश मुथा यांनी कांस्यपदक मिळविले व हर्षवर्धन जोशी ह्याने तुंगल ह्या खेळाच्याप्रकारात कांस्यपदक मिळविले. ह्या स्पर्धेत सर्व विजेत्यांचे नाशिकचे मा. खासदार हेमंत ( आप्पा ) गोडसे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री. नागेश बनसोडे व मुख्य प्रशिक्षक श्री. किशोर येवले ( मुंबई ) ह्यांचे मार्गदर्शन लाभले.



शाळा , महाविद्यालय आणि सर्व स्तरांतून सहभागी व विजेते खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदरच्या विद्यार्थ्यांचे १२ ते १५ २०२३ रोजी अखिल भारतीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा ही स्व. मीना ताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी , आडगाव नाका, पंचवटी नाशिक - ३ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शाळा , महाविद्यालय यांनी सदरच्या स्पर्धेत सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

21 जिल्ह्याचे 215 खेळाडू तसेच महाराष्ट्र पोलीस टीम उपस्तिथ होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू विभागीय क्रीडा संकुल ,नाशिक येथे 12 ते 15 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या वरिष्ठ गटातील नॅशनल पिंच्याक सिल्या ट चॅम्पियनशिप ला खेळतील. व यातून फक्त टॉप 16 नोव्हेंबर मध्ये गोवा येथे होणाऱ्या 37 नॅशनल ला खेळतील. हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ आहे. या खेळाला 5% आरक्षण आहे . या खेळाला युवक कल्याण आणी क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ ऐशिया ची मान्यता आहे.हा खेळ एशियन गेम, युथ गेम व बिच गेम, भारतीय विश्व् विद्यालय अश्या ऑफिशियल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. नुकताच 37 नॅशनल मध्ये याचा समावेश झाला आहे.

सोन्याच्या दुकानात अज्ञाताकडून लाखोंची चोरी !

(छाया संग्रहित) 

अज्ञाताकडून सोन्याच्या दुकानात लाखोंची चोरी

नाशिक:- जेल रोड येथील शिवाजीनगर परिसरातील एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात अज्ञाताकडून सोन्याचे दुकान फोडून सुमारे सव्वा आठ लाख रूपयांचे सोन्या - चांदीचे दागिने चोरले आहेत. 
या घटनेमुळे परिसरातील व इतर व्यावसायिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सागर विलास भावसार असे दुकानाच्या मालकाचे नाव आहे. दरवेळीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले यानंतर सकाळी त्यांच्या दुकानातील कामगार दर्शन दंडगव्हाळ ह्याला दुकानाचे शटर तुटलेले दिसल्याने त्यांने त्वरित हि घटना भावसारांकडे सांगितली . दुकान उघडून पाहिले व तपासणीनंतर सव्वा आठ लाख रूपयांचे दागिणे गायब असल्याचे सांगितले . नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास सुरु आहे 

सोमवार, १० जुलै, २०२३

सुवर्णा देसलेंना पीएचडी प्रदान


डॉ . सौ. सुवर्णा प्रकाश ( राजु ) देसले 

   सुवर्णा देसलेंना पीएचडी प्रदान 


नाशिक 
:- भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र चे राज्य सहसचिव , आयटक चे सचिव व किसान सभा उपाध्यक्ष श्री. प्रकाश ( राजु ) देसले यांच्या पत्नी सौ. सुवर्णा प्रकाश देसले यांना दि. १० रोजी सावित्रीबाई फुले विद्ग्रंयापीठातून ग्रंथालय शास्त्र अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाचन सवयी , सुविधा आणि समस्या ह्या विषयात यांनी पीएचडी प्राप्त केली. महिलांनी आजच्या ह्या जगात आपली एक नवीन ओळख केली आहे .आज सुवर्णा प्रकाश देसले .. डॉ सुवर्णा प्रकाश देसले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तून ग्रंथालय शास्त्र अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाचन सवयी, सुविधा आणि समस्या या विषयात आज पी एच डी प्राप्त केली. 
 सुवर्णा दसलेंनी मराठीत एम. ए., डी. सी. एम., एम.लिब. पुणे विद्यापीठ मधून केले. के. टी. एच. एम व एच पी टी महाविद्यालयातून शिक्षण घेतले. आज पी एच डी सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाली. नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले. ज्येष्ठ साहित्यिक मा. उत्तम कांबळे, लोकवाडमय प्रकाशन गृह अध्यक्ष डॉ भालचंद्र कांगो तसेच के के वाघ शिक्षण संस्था चे प्राचार्य डॉ भूषण कर्डिले, मा. सरोज जगताप, डॉ. विना ठाकरे, सार्वजानिक वाचनालय नाशिक, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक सहकार्य लाभले.

गुरुवार, ८ जून, २०२३

मुलांच्या शिक्षणात शासनाचा भेदभाव का?

 

मुलांच्या शिक्षणात शासनाचा भेदभाव का? 

      - प्रसाद भालेकर, संपादक 

___________________________________________________

 

( प्रातिनिधिक चित्र)

समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके मोफत दिले जाते. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात परंतु इयत्ता नववीपासून मुलांना शालेय पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. शासनाने शाळेतून गळतीचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करतात परंतु नववी पासूनच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. शाळेतून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण हे नववी नंतर मोठ्या प्रमाणात खालावले जाते . दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात परंतु इयत्ता नववीपासून जर मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली तर शासनास लाखो करोडो रूपयांचे नुकसान होणार नाही . 

एकीकडे प्रशासनान बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबविण्यात अव्वल असते परंतु ६ मार्च १९८६ रोजी मुलींना शासकीय शाळांमध्ये तसेच अनुदानित शाळांमध्येही मुलींकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये असे स्पष्ट करण्यात आले असले तरी शाळांमध्ये मुलींकडून शालेय शुल्क आकारले जातात असे का ?

 शिक्षण हा माणसाचा पाया आहे हे प्रशासनास माहित नसावे का ? RTE अंतर्गत ६ - १४ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. ६ वे वर्ष म्हणजे पहिलीस प्रवेश मिळतो व विद्यार्थ्याचे १४ वे वर्ष म्हणजे तो विद्यार्थी ९ वी इयत्तेत असतो . परंतु शाळा आठवीनंतर मुलांना मोफत शिक्षण देण्यास नकार देतात. 

अनेक अश्या शाळा आहेत ज्या आरटीई अंतर्गत घेतलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवतात त्यांना प्रवेश देण्यास अनेक अडचणी निर्माण करतात. ह्याचा कोणालाही फरक पडत नाही . शासनाने ज्याप्रमाणे पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तके देतात त्याचप्रमाणे ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनाही दिल्यास काहीही गैर ठरणार नाही. एकीकडे प्रशासन बालकामास विरोध करते व एकीकडे त्याच बालकांना शिक्षणासाठी अडवते. 

अनेक ठिकाणी रस्ते तयार होतात , अनेक विकास कामांसाठी अनेक खर्च होतात परंतु शिक्षणाचा खर्च हा शासनास नकोसा वाटायला लागतो का  कुणास ठाऊक? मुले ही देवाघरची फुले म्हणतात पण महाराष्ट्रातील फुले ही पाण्यावाचून व मुले ही शिक्षणावाचून कोमजतील याचे भान ना शासनाने राखले पाहिजे . महागाईच्या काळात शासनाने वह्या - पुस्तके यांचे दर वाढवले आहेत त्यावर अनेक कर लादले आहे म्हणून जर शिक्षणाचा समानार्थी शब्द हा महागाई आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक मुले शिक्षणासाठी झटणारे आहेत परंतु त्यांना यश येत नाही. आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वी पर्यंत मोफत प्रवेश असतो मग नववी दहावीचे अंत्यसंस्कार करायचे का ? जे मुले आरटीई योजनेतंर्गत , शासनाने केलेल्या शिक्षण सुविधांची मदत घेऊन शाळेत प्रवेश घेत असतील त्यांची परिस्थिती तुम्ही ओळखायला शिकले नाहीत. त्यांच्यावर तुम्ही मर्यादा आणलेली आहे. जर मुले शिकली तरच तुम्हाला विकासशील भारत मिळणार नाही. काही शाळांमध्ये शौचालये साफ नसतात त्यांना दारे नसतात तेथे पाण्यासंबंधी अनेक अडचणी उद्भवतात त्या समस्येचे निराकरण वर्ष संपेपर्यंत केले जात नाही. 

काही ठिकाणी मैदान नाही. परीपाठ हा अडगळीत ठिकाणी पार पडला जातो , संगीताचे शिक्षक नाही , संगणक आहे संगणक शिक्षक नाही मग तुम्हाला प्रगतशील विद्यार्थी मिळणार कसा ? मुलांच्या अभ्यासक्रमात अनेक गोष्टी घुसवल्या जातात मात्र ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्यांवर लक्ष दिले जात नाही. पुस्तके ही आपली मित्रे म्हणतात व मित्रांना मित्रांपासून दूर करणे असे संविधानात लिहलेले आहे का ? मुलांना त्यांचा योग्य तो हक्क मिळणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी बाल हक्क संरक्षण आयोग यांनी स्पष्ट केले होते की कोणत्याही कारणाने बालकांचे निकाल राखून ठेवल्यास शाळांवर कारवाई करण्यात येईल परंतु शाळांनी ह्यास दुर्लक्ष केले व आज अनेक विद्यार्थांचे निकाल शाळेने राखले आहेत. सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी अशा सर्व शाळा आपली मनमाणी करतात व विद्यार्थी व पालकांना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षरीत्या मानसिक त्रास देतात. शासन ज्या प्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मोफत देतात त्याचप्रमाणे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनाही द्यावे व त्याचप्रमाणे ६ - १४ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे असे न करता इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण करावे कारण काही विद्यार्थी उशीरा शाळेत प्रवेश घेतात यामुळे वयोगटामुळे हा हक्क मुलांना मिळत नाही. यामुळे पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार लागू करण्यात यावा तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कला दाखवण्यासाठी शासनाने तसेच शाळांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करावे . शासनाने व इतर कोणीही मुलांच्या शिक्षणात भेदभाव करू नये . 

मंगळवार, ९ मे, २०२३

मुलांसाठी प्रतिबद्ध शाळा कशी असावी?

  ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ मुलांसाठी शाळा निवडतांना ह्या गोष्टी लक्षात घ्या....


      ( प्रातिनिधिक चित्र) 
शिक्षण व शाळा हा आयुष्याचा फार मोठा पाया आहे हा पायाच मजबुत हवा तरच जीवनातील प्रत्येक संघर्षात जिंकली जाते. त्याकरिता चांगली शाळा व चांगले व प्रतिबद्ध शिक्षण गरजेचे आहे. आजकाल प्रत्येक गल्लीबोळात शाळा सरू झाल्या आहेत परंतु प्रत्येक शाळेत काहींना काही तरी अडचणीचा मुलांना नेहमी सामना करावा लागतो. आपल्या मुलांसाठी योग्य शाळेची निवड करावी अन्यथा आपले पाल्य मागे पडून राहतील असे विचार मनाला नेहमी टोचतात. आपण त्यांना ज्या शाळेत शिकायला पाठवतो ती शाळा त्यांच्या दृष्टीने योग्य असणे गरजेचे आहे. काही शाळांमध्ये मुलांना खेळायला मैदानी नाही तरी शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक येतात व जेवणाची सुट्टी झाल्यानंतर मुलांकडून वर्गात व्यायाम करून घेतात यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते व त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. काही शाळांमध्ये काही मुलांना कोणत्याही स्पर्धेत सहभाग घ्यायचा असल्यास ते त्यांना प्रोत्साहन देत नाही . जे मुले दरवेळी स्पर्धेत सहभाग घेतात व बक्षिसे जिंकतात त्यांच मुलांना पुढे करतात असा भेदभाव शाळांमध्ये नसावा. भरपूर अश्या शाळा आहेत ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाईट प्रकारच्या सवयी आहेत. त्या शाळेतील मुले मुलांना मारतात , घरी जात असताना कारण नसतांना धक्का - बुक्की करतात परंतु शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापिक यावर मौन धरतात. काही शाळा मुलांच्या दृष्टीने धक्कादायक बांधकाम आहेत. काही शाळेत नवीन शिक्षिका शिकवण्यासाठी येतात व वह्यांमध्ये  पाहून शिकवतात काही शिक्षिका शिकवण्यासाठी मार्गदर्शक ( गाईड ) चा उपयोग करत नाहीत व योग्य शिकवतात अश्या शिक्षिका दुर्मिळच पाहायला मिळतात. काही शाळांचे वर्ग अदुरूस्त असतात त्यांवर पत्रे असतात यामुळे पावसाळ्यात वरून पाणी गळतीचे प्रमाण जास्त असते व वर्गात पाणी येत असल्याने दमट वास येतो . आता  ऋतू बद्दल काय सांगावे कधी ऊन पडते कधी पाऊस मध्येच थंडी वाजत असते ह्यात जे पत्र्याचे वर्ग आहेत त्यांना उन्हाळ्यात गरमीचा सामना करावा लागतो. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाकडून शालेय शुल्कांवितिरक्त विविध विषयांकरीता शुल्क आकारले जातात. काही शाळांमध्ये शौचालये साफ केलेले नसतात अशा विविध समस्या काही शाळांमध्ये दिसून येतात यामुळे उन्हाळी सुट्टीत मुलांना विचारपूस करा तुमच्या‌ शाळेतील वातावरण कसे आहे ? शिक्षक चांगले शिक्षक शिकवतात का ? त्यानंतर मुलांना जी शाळा आपल्यासाठी व्यवस्थित व प्रतिबद्ध वाटते त्याच शाळेत त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून द्यावा व महत्वाचे म्हणजे शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापिकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये तसेच अप्रगत विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसोबत व मुलांसोबत चर्चा करून प्रगती कशी सुधारता येईल अश्या योजना करायला पाहिजेत.  
आपल्या पाल्याचा योग्य व प्रतिबद्ध त्या विद्यालयात प्रवेश करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे.


लेखन :- प्रसाद भालेकर 

राजर्षी शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त कवितेतून अभिवादन ..

जरी तुम्ही नसलात या जगात 
तरी आम्ही तुम्हाला तुमच्या विचारातून पाहू. 
आम्ही नेहमी तुमच्या आज्ञेच्या अधीन राहू.
तुमच्या , महात्मा फुले व डॉ.आबेडकरांच्या  प्ररेणेमुळे आज साऱ्या मुलांना शिक्षणाची गोडी 
व शिक्षणामुळे साऱ्या वाईट गोष्टी सोडी 
अस्पृश्यता व जातीभेद यांचा नायनाट करी . 
लोकराजा तु जनतेचा , जनतेसाठी जिवाचे राण केले . आज मी तुझे गुणगान गायिले 
आज सांगतो पुन्हा एकदा 
 जरी या जगात नसलात तुम्ही परंतु आम्ही तुमचे विचार धरून राहू , हे थोर लोकराजा शाहू आम्ही सर्व प्रथम शिक्षणाला मान देऊ. आम्ही सर्व प्रथम शिक्षणाला मान देऊ... 
धन्यवाद
लेखन :- प्रसाद भालेकर 
शाळेचे नाव :- म.वि.प्र संचलित, जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक - १ 

 छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन... 

मंगळवार, २ मे, २०२३

नाशिक:- मार्शल आर्ट्स फिटनेस शिबिराचे नाशकात भव्य आयोजन

 

    (प्रातिनिधिक चित्र )


 मार्शल आर्ट्स फिटनेस शिबिराचे आयोजन 

नाशिक:- आजकाल मुले मोबाईलच्या अधीन गेली आहे.कोरोनाकाळात मुलांचे स्वास्थ्य फारच अस्वस्थ झाले आहे त्यांना व्यायाम व शारीरिक व मानसिक विकासाची फारच मोठ्या प्रमाणात गरज आहे काहीमुलांना फारच लहान वयात चष्मा लागतो काहींचे वजन फारच जास्त असते , उंचीचे प्रमाण कमी असणे अश्या विविध समस्या मुलांमध्ये आढळून येतात व आता मुलांना उन्हाळी सुट्यांची सुरूवात झालेली आहे तर ह्यात मुलांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी व आरोग्य सुदृढ मार्शल आर्ट फिटनेस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ह्या शिबिरात कराटे प्रशिक्षण, सुर्य नमस्कार, भारतातील प्राचीन व्यायाम पद्धती, लाठीकाठी शिकवणार आहेत तसेच गोल्फ घोडेस्वारी व पिस्तुल रायफल शूटिंग यांची तोंड ओळख करून दिली जाणार आहे. तसेच तज्ञांचे विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे. मुलांना मंत्रशास्त्र , शरीरशास्त्र , मानवशास्त्र व भाषाशास्त्र यांची माहिती दिली जाणार आहे. मुलांची शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी व्यायाम हा फार महत्वाचा आहे व मुलांनी व्यायाम करणे फार गरजेचे असे तज्ञांकडून समजते. ह्या व्यायामाची आपल्याला फारच गरज आहे ह्यातुन कोरोना सारख्या महामारींचा सामना करणे अतिशय सोपे होणार आहे.ह्यात मुलांचा खेळातील पाया मजबूत होईल तसेच त्यांचा सार्वांगिक विकास होण्यासाठी प्रतिबध्द असे हे शिबिर आहे. शिबिराचा कालावधी ४ मे २०२३ ते १८ मे २०२३ असा असणार आहे. शिबिराचे प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी ३००/- आहे. शिबिराचे ठिकाण :- समर्थ जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी टॉवर, गंगापूर रोड, नाशिक येथे आहे. सकाळी ६:३० ते ७:३० व सायंकाळी ६:३० ते ७:३० ही शिबिराची वेळ आहे. अधिक माहितीसाठी श्री‌. अरविंद भालेकर मो. 9545979501/9529195688 ला संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...